Vijay Gokhale

Horror

3.5  

Vijay Gokhale

Horror

डरना मना है

डरना मना है

4 mins
233


भूत हा असा विषय असा आहे कि अनुभव आल्याशिवाय आपण त्यावर विश्वास ठेवत नाही. मी पण विश्वास ठेवत नव्हतो पण अशा काही घटना घडल्या कि त्यावर विश्वास ठेवावा लागला. त्याला भूत म्हणतात कि नाही मला माहित नाही- पण आलेले अनुभव खूप भीतीदायक आणि चमत्कारिक होते.


मी जेव्हा कॉलेजला होतो तेव्हाच्या आहेत या घटना . कॉलेज मजा मस्ती तसच होत सगळं माझ्याही बाबतीत. देव दानव भूत प्रेत यावर विश्वास ठेवणं दूरच होत पण या सगळ्याची टिंगल करणे हाच उद्योग होता आमच्या टीम चा. पण अशा काही घटना घडल्या कि या सगळ्यावर विश्वास ठेवणं भाग पडलं. कॉलेज मजा मस्ती रात्रीचा भटकण हे तर सगळेच करतात आम्ही पण तेच करायचो. रात्रीचे सिनेमे उशिराने घरी जाण आणि मग शिव्या खाण.


घटना १

असच एक दिवशी रात्री सिनेमाला गेलो होतो. ७ - ८ जणांचा ग्रुप होता सिनेमा संपून सिगारेट मारत मारत आम्ही चोकपर्यंत पोहोचलो जिथून ग्रुप वेगळा झाला आणि आम्ही दोन मित्र वेगळीकडे म्हणजे आमच्या घराकडे जाऊ लागलो. मागून आवाज आला तंबाकू हाय का पोरांनो आम्हाला वाटलं कोणीतरी असेल आम्ही मग पाहिलं एक माणूस होता आम्ही तंबाकू दिली पुडित थोडीच शिल्लक होती, म्हणालो बाबा घ्या पुडीच आम्ही जातो. पुडी देऊन आम्ही निघालो जवळपास ७ ८ फुटापर्यंत गेलू असू मागून आवाज आला चुना कोण तुमचा बाप देणार का? विचार करा जवळपास ७-८ फुटापासून त्याने हात लांब केला होता आणि आमच्या जवळ त्याचा हात पोहोचला होता. चुना पुदी फेकून आम्ही टिम्ब टिम्ब ला पाय लावून वाट मिळेल तिकडे पळत सुटलो आणि एका गल्लीत जाऊन थांबलो. सकाळपर्यंत जीव मुठीत धरून तिथेच होतो जग आली तेव्हा घरी झोपलो होतो. घरात कोणीच काही बोलत नव्हतं त्यानंतर रात्रीचे सिनेमे बंद केले त्या चौकातून पण जाण बंद केलं.


काय होत हे भूत, पिशाच, डाकीण पण घरारक अनुभव होता तो. कोणी म्हणत चुना नाही दिलात ते बर केलात नाहीतर जीवावर बेतल असतं

घटना २ -

तोच ७ ८ जणांचा आमचा ग्रुप. कधी कधी नदी खालच्या बाजूला जायचो. अर्थात करू प्यायला. त्यामुळं कातकरी लोक ओळखीची झाली होती. कधी मढी त्यांना दारू पाजायचो, ते बाटलीभर मध द्यायचे फुकट आम्हाला. परीक्षा संपल्या होत्या. कामधाम काही नसायचं, बोंबलत हिंडणे हाच उद्योग. त्यावेळची हि घटना. ग्रुप मधला एक मित्र सकाळपासून गायब. संध्याकाळी शोध शोध सुरु. सगळेच घाबरलो अचानक हा गेला कुठं. सगळ्या म्हणजे नाही त्या ठिकाणी पण शोधून झालं पण पत्ता लागत नव्हता 


एकानी सांगितलं अरे संध्याकाळी नदीच्या बाजूला चालला होता काहीतरी विचारात होता.

आम्ही सगळे नदीच्या दिशेने धावलो. कातकरी लोक होते तिथे त्यांना विचारलं. पण ते म्हणाले नाही बा दिसलं नाही ते बेणं २ ३ दिस झाल नाहीतर येत असत ते ओढाया चिलीम . . आमच्यातला एक म्हणाला चला घाटावरून चक्कर मारून येऊ बघू काहीतरी कळेल. आम्ही घाटाच्या बाजूला गेलो त्याच्या चपला दिसल्या. मी विचार केला चप्पल न घालता कुठे गेला असेल. तसेच आम्ही पुढे गेलो. प्रत्येकाच्या मनात धुकधुक होत होत. बरंवाईट तर करून घेतलं नसेल त्यानी

थोडे पुढे गेलो तर त्याचा शर्ट आणि पॅन्ट दिसली सगळे म्हणाले नदीत जीव दिला बहुतेक. अंधार झाला होता, बॅटरी लावली आणि आम्ही पुढे निघालो. नदीवर एक छोटा पूल होता त्यावरून दुसऱ्या वस्तीत जाण्यासाठी. त्या पुलाच्या मध्यभागी नदीत वाकून हे बेणं कोणाशीतरी बोलत होता. खूप जवळ गेलो नाही आम्ही तो म्हणत होता येऊ येणार नाही पाण्यात मला पोहोत येत नाही मला नको आग्रह करू. आमच्या मध्ये एक त्यातली माहिती असलेला एक माणूस होता. तो म्हणाला बाळांनो काहीतरी वेगळं आहे जवळ जाऊ नका. आम्ही सगळे मागे हटलो. त्यानेच दुसऱ्या माणसाला सांगितले मोठ्या पुलावरून जा आणि तालमीत सांग असं झालाय ते आणि ५ - ६ पैलवान घेऊन ये त्यांना पण हे बेणं आता आवरणार नाही.

पलीकडच्या वस्तीतून ५ - ६ पैलवान आले आणि त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्या सगळ्यांना एका दमात ढकलून दिले. कुठून आणली एवढी ताकद. काय होत ते सुन्न अवस्थेत सगळं फक्त आम्ही विस्फारलेल्या नजरेने बघत होतो. कसातरी त्या पैलवानांनी त्याला तिथून पकडून तालमीतल्या खोलीत डांबलं तिथले काहीजण बोलत होते झपाटलंय बहुतेक तिथला एक जण आहे त्यांनी सांगितलं शेजारच्या गावातून देवऋश्याला बोलवायला लागेल. काही जण देवऋषाला बोलावलं गेली. त्याला घेऊन आलो त्यांनी काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. आणि ,एका काठीने गोल तयार केला आणि म्हणाला सांगितलं आणा त्याला बाहेर. खोलीतून त्याला बाहेर आणले आणि त्या रिंगणात उभं केलं. तो थयथयाट करत होता. त्यांनी त्याच्यावर काठी उगारून विचारलं हे झाड का पकडलास. दुसर्यांनी सांगितलं तुमच्या मित्र पकडल्यानं त्याला तो झाड म्हणतोय. बराच वेळ माझ्या मित्र तो मंत्र म्हणून, काठीने मारून विचारात होता. शेवटी माझ्या मित्रांनी म्हणजे त्या झपाटलं होत त्यांनी सांगितलं माझ्यावरून पाय देऊन चालला होता म्हणून मी पडलं त्याला आता मी नाही सोडणार त्याला. बऱ्याच प्रयत्नांनंतर तो तयार झाला माझ्या मित्राला सोडायला. पण तो म्हणाला कि नदीच्या पलीकडच्या झाडाखाली ४ अंडी आणि एक कोंबडी ठेवा मी ठाया सोडून जाईन. पण तो देवऋषी हुशार होता. त्यांनी विचारलं आम्ही कसा विश्वास ठेवायचा तो म्हणाला मी मागितलंय ते त्या जागेवर ठेवलं कि मी या झाडाची फांदी तोडून जाईन सगळे भिलेलेच होते. मग चार पाच जण तयार झाले. अंडी कोंबडी घेतली आणि त्या झाडाकडे निघाले. सगळे भिलेलेच होते. त्यावेळी मोबाइलला नव्हते म्हणून घड्याळे लावली आणि ते निघाले. बरोबर १५ मिनिटांनी त्यांनी तिथं जे सांगितलं होत ते ठेवलं आणि आम्ही बघत होतो त्याच वेळी आमच्या समोरच्या झाडाची फांदी कापल्यासारखी खाली पडली आणि आमचा मित्र त्या सांगल्यातुन जागा झाला.


काय होते ते सगळं. पण आम्ही खूप घाबरलो होतो.


डरना मना है


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror