Vijay Gokhale

Comedy

3  

Vijay Gokhale

Comedy

मामा भाचा नॉन स्टॉप फालतूपणा

मामा भाचा नॉन स्टॉप फालतूपणा

4 mins
282


(मामा आतल्या खोलीतून गाणं म्हणत येतो, 'तेरी आखोके दारियाक उतरना भी जरुरी था,मोहोब्बत भी जरुरी भी जरुरी थी बीछडना भी जरुरी था)

मामा- आयला आजकाल कशात पण उतरतात लोक. डोळे आहेत का मोठं भगदाड पडलय- उतरत आहेत बीछडतात लोक. काय चाललंय काय गाणं काय अर्थ लागतोय

भाचा - अरे मामा काय बडबडतोयस- तसा अर्थ नाही त्याचा

मामा - एक पोरगी पटत नाही याला आणि हे घ्या, हे शिंगरू समजवणार अर्थ मला. ओसाड रानातला उनाड बोका

भाचा - अरे मामा गाणं खूप चांगलं आहे आणि अर्थ खूप वेगळा आहे त्या गाण्याचा

मामा - हं सांगा आता हे तत्वज्ञान शिकवणार. FYBSC ४ सबजेक्ट फेल फिलॉसॉपी

भाचा - जाऊ दे तू ऐकण्याच्या मूड मध्ये नाहीस. मामीशी भांडलास का रात्री-

मामा - नाही रे भांजा आजकाल भांडण्याइतकी पण जवळ येत नाही माझ्याजवळ. पण ती येते ना तुझ्याजवळ निदान बाय म्हणायला

भाचा - मामा त्याचा इथं काय संबंध.

मामा - भांजे संबंध या विषयावर बोलायला तू इतका मोठा झालेला नाहीस. तुला काय माहित संबंध काय असतात आणि आशा संबंधातून नंतर गैर संबंध होतात. वाद वेडा आहे वेडा

भाचा - मामा काय चाललंय आजकाल तुझं. मी वेडा झालोय को तू वेडा झाला आहेस त्या ऑंटी साठी

मामा- अरे गप माकडा भीतीला पूर्वी कां असायचे आजकाल भिंतीपण ब्लू टूथ आणि कॅमेरापण वापरतात त्यामुळं हळू बोल. उगाच काहीतरी बोलू नकोस. ती ऑंटी नाही झाली आजून. जस्ट ४५ ची झालीये कालच कोणाला सांगू नकोस कालच फ्रेंडशिप मागितलीये मी तिला.

भाचा - तुझ्याशी फ्रेंडशिप, तुझ्या टाकालाच्या प्रेमात पडली कि तुझ्या पडलेल्या १२ दात्यांच्या प्रेमात पडली अरे पन्नाशीचा झालास तू काही शरम. जनाची नाहीतर मनाची

मामा- पन्नास पूर्ण झालीत माझी. . माझी मूलपण सज्ञान आहेत. मग काहेकि शरम बे. आमच्यावेळी असं नव्हतं फ्रेंडशिप etcएक आवडली होती डायरेक्ट विचारलं तिला आणि तिनेपण डायरेक्ट कानाखाली मारली मला बसस्टोप वर. तिचं काल ४५ ची झाली

भाचा - मग तू पण सूड घ्यायचास ना.

मामा- नाहीरे खूप गोंडस आहे ती. तिचा नवरा इकडे नसतो फिर शोचा मैने दोस्त बनके काम हो शकता है तो दुश्मनी क्यू बढाये. आणि आमचं रडार तुझी मामी देवे देव करत हिंडत असते जगभर. तेवढंच अफफैर वगैरे करू का विचार करतोय. बुडत्याला काठीचा आधार बाकी सगळे निराधार

भाचा- आता कशाला विचारतोस मला. FYBSC ४ सबजेक्ट फेल फिलॉसॉपी


मामा- बस का भांजे हीच का कदर मामाची. आपण पण ऐन टायमाला मदतीला येऊ ना. मग सांग सकाळी सकाळी कोणाला ओरडून सांगत असतोस ७ ३० पर्यंत आहे मी बसस्टोपवर मला काय कळत नाही असं वाटत का तुला

भाचा - अरे मामा ,एवढं जोरात ओरडतो तेव्हा रस माझं फुलपाखरू डोळे किलकिले करून या दुनियेमध्ये परत येत आणि मोबाइल ऑन करत आणि मलाच विचारात 'सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाही का' मी आलेच दोन मिनिटात आंघोळ न करता पावडर लावून.

मामा - अरे तुझी मामीपण अशीच होती खात्यापित्या घरची फुलपाखरू होती. तो सुरवंट माझ्या जिंदगीत आला आणि माझ्या जीवनाचा वाळवंट झाला. त्या सुरवंट आणि वाळवंटामधून एक उंट जन्माला आला. अरे मस्त जमतंय यमक सुरवंट, वाळवंट, उंट- ते जाऊ दे, मग सकाळी सकाळी एकदम तोंडओळख का-

भाचा - अरे कसलं काय ते फुलपाखरू येताच नाय, डायरेक्ट क्लास ला जात. च्यायला रागावता पण येत नाही- नाहीतर लगेच स्त्री जन्म हि तुझी कहाणी हृदयी अश्रू नयनी पाणी. तुझ्या जिंदगीच वाळवंट झालं आता आमच्या जिन्दगीचा बहुतेक तलाव होणार. लेक साईड view.

मामा - मग तुझ्या तलावातील थोडं पाणी माझ्या वाळवंटात आणू आणि मग वलहव रे नाखावा वलहव रे रामा

भाचा - अरे मामा तिच्या बापाच पण तुझ्यासारखं अफेयर आहे. प्रकरण आता लग्नापर्यंत गेलेय. आता या वयात लग्न झालं तर माझं फुलपाखरू पोरकं होईल पानी बिना मछली नृत्य बिना विजली

मामा - अरे हा काय फालतूपणा मुलगी लग्नाला आली आणि हेच आधी लग्न करतायेत. आता या वयात काही झेपणार आहे का ? मग काय googleवरून मुलं download करणार आणि whats app वर upload करणार आणि status ठेवणार feeling awesome with google . अरे या वयात बाकी काही जमत नाही म्हणून फक्त प्रेमच करतात

भाचा - नाहीतर काय यार, चारावर चार एकेचाळीस. मास्तरांनी विचारलं आंब्याच्या झाडाला किती भेंड्या येतात, तर तो मुलगा म्हणाला मी डब्यात पोहे आणलेत

मामा - म्हणून मला ती ऑंटी आवडते. मी तिला म्हणतो मी तुझा अडकित्ता तू माझी सुपारी, उन्हात भेटू सारसबागेत तुतारी. कारण दुपारी नसतात तिथे प्रेमाचे व्यापारी.

भाचा - अरे नसतात व्यापारी पण असतात ना मोकळ्या कपारी.

मामा - कपारी काय चाटायच्यात या वयात. हे वयच असं असत, काही करता येत नाही म्हणून फक्त प्रेमच करतात. असो परत भेटू रडार आलं आमचं, subject स्टॉप-

(पुढे चालू)


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy