आज केंद्रातील व राज्यातील संघप्रणित भाजप सरकारच्या कार्यपध्दतींचा विचार केला तर असे निदर्शनास येईल की, भाजप सरकारचे 'खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे' आहेत.
महाराष्ट्रात आतापर्यंत मराठा, मुस्लिम, धनगर समाज तर राज्याबाहेर पटेल, गुर्जर, जाट समाजाकडून आरक्षणाची मागणी होत होती. मराठा समाज मोठ्या संख्येने एकत्र येऊन रस्त्यावर उतरला त्यांनी ५८ मुकमोर्चे काढले त्या मोर्चोची जगभरातील दैनिकांनी नोंद घेतली पण महाराष्ट्रात शिवरायांचे नाव घेऊन सत्तेत आलेली शिवसेना व त्यांचे मुखपत्र दैनिक सामना मधून मराठा समाजाच्या 'मुक मोर्चा' ला व्यंगचित्राच्या माध्यमातून 'मुका मोर्चा' हे शिर्षक देऊन मराठा समाजाची चेष्टाच केली होती. तर केंद्रातील भाजपा सरकारने संविधानाच्या परिच्छेद १५ आणि १६ मध्ये घटनादुरूती करून कधीही, कुठेही मोर्चे न काढणा-या सर्वणांना 'आर्थिकदृष्ट्या मागास' म्हणून केंद्रांत व राज्यात १० टक्के आरक्षण दिले. मराठा समाजातील काही तरूणांनी आरक्षण मिळावे म्हणून आत्मबलिदान दिले होते. याविषयी मसेसं चे अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर म्हणतात की, 'मरायला मराठे आणि चरायला मनुवादी सराटे'.
संपुर्ण देशासह व राज्यातील शेतकरी संकटात असताना सुध्दा शेतक-यांसाठी ठोस उपायोजना न करता हे संघप्रणित भाजपा सरकार शेतक-यांच्या जनावरांना 'चारा छावणी ऐवजी लावणी' वरील बंदी उठवते. म्हणजेच यांना शेतक-यांपेक्षा बार मालकांचा प्रश्न म्हत्वाचा वाटतो.
तरूणांना उच्च शिक्षण देऊन नोकरीच्या प्रवाहात आणण्याऐवजी भाजपच्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या २० हजार तरूणांना कुंमभेळ्यात घेऊन जातात. त्यामुळे प्रयागराज येथिल कुंभमेळ्यात इंजिनिअरपासून एबीए पदवीधारकांपर्यत दहा हजार तरूण - तरूणींनी नागा साधू होण्याची दिक्षा घेतली. आज एकीकडे तरुण, महिला व शेतकरी सुरक्षित नाहीत ते दररोज मरत आहेत तर दुसरीकडे प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यातील साधुवर कोट्यावधी रूपये उधळले जात आहेत. तेथिल साधूना राहण्यासाठी आलिशान तंबू उभारण्यात आले होते त्या तंबूचा एका रात्रीचा खर्च तब्बल ३५ हजार रूपये होता. या तंबूत अशा काही सुविधा होत्या की ज्या, फाईव्ह स्टार हाँटेलमध्येही नसतील. म्हणजेच भाजप सरकार हे 'कृषीप्रधान देशाला ऋषीप्रधान' बनवत आहे.
महाराष्ट्राचे महसुल मंत्री हे कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात सांगली येथे सांगतात की, तरूण - तरुणींनी सरकारी नोकरीचे खूळ डोक्यातून काढून टाकले पाहिजे. सरकारी नोकरी लागतेच कशाला ? तर राज्याचे मुख्यमंत्री हे नागपूर येथिल एका कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत सांगतात की, सर्वाना आरक्षण दिल्यावरही ९० टक्के युवकांना नोक-या मिळणार नाहीत. तर मग प्रश्न निर्माण होतो की, पंतप्रधानांनी निवडणुकीपुर्वी दोन कोटी तरूणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ ही अफवाच होता का ?
मेळघाटातील कुपोषणामुळे होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी सरकार मांत्रिकांची मदत घेणार व त्याचा मोबदला म्हणून त्या मांत्रिकाला एका रूग्णामागे २०० रूपये देणार आहे. अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दिली.
संघप्रणित भाजपा सरकारने २६ जानेवारी रोजी अनेक विभूतींना भारतरत्न, पद्मविभुषण, पद्मभूषण या पुरस्कारांनी सन्मानीत केले ही चांगली गोष्ट आहे. पण ब.मो.पुरंदरे यांना 'पद्मविभुषण' ने सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमावर मीठ चोळण्याचे कार्य सरकारने केले आहे. पुरंदरे यांनी संपुर्ण देशासह महाराष्ट्राची आस्मिता असलेले छ. शिवाजी महाराज यांच्याबद्दल विक्रुत लिखाण केलेले आहे. त्यांना 'पद्मविभुषण' ने सन्मानित करणे म्हणजेच सरकार पण पुरंदरेंच्या विचारांचे आहे. प्रश्न पडतो की, मग निवडणुकीपुर्वी 'शिवछत्रपतींचा आर्शिर्वाद अन्
चला देऊ मोदींना साथ' हे कशासाठी होते. म्हणजेच पंतप्रधानांना छ. शिवराय हे फक्त निवडणूकीपुरतेच पाहिजे होते.
दरवर्षी जून महिन्यात केंद्र व राज्यसरकार कडून कोट्यावधी रूपयांची उधळण करूध वृक्षांची लागवड केली जाते तर पंतप्रधान हे ओडिशा दौ-यावर असताना त्यांचे हेलिकाँप्टर लँडींग होण्यासाठी जागा करताना तिथे तब्बल हजार झांडाची कत्तल करण्यात आली. मग प्रत्येक वर्षीची वृक्ष लागवड ही गुत्तेदारांचे खिसे भारण्यासाठी असते का ?
स्वतः ला धर्माचे ठेकेदार समजणारे पण देवांची जातिनिहाय गनणा करताना दिसतात त्यात श्रीराम हे मुस्लिमांचे पूर्वज; होते असे बाबा रामदेव म्हणतात तर काहींनी हनुमानाचीही जात शोधली गेली हे ऐकताना नवलच वाटते.
डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जातिवादी वर्णव्यवस्था असलेल्या मनुस्मृतीचे रायगडाच्या पायथ्याशी दहन केले होते. त्यांनी लिहलेल्या जगातील सर्वात मोठ्या भारतीय राज्य घटनेमुळे या देशात सर्व जातीधर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत असून राज्यघटनेमुळेच अखंडता राहिली आहे. मात्र ही राज्यघटना बदलण्यासाठीच आम्ही सत्तेत आलो आहोत असे भाजपाचे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे म्हणतात तर त्यांच्याच काही पिलावळींनी दि.०९ आँगस्ट, २०१८ रोजी दिल्ली मधील जंतर - मंतर येथे संविधानाच्या प्रतिंचे दहन केले. हा दिवस बहुजनांसाठीचा काळा दिवस आहे.
स्वबळाचा 'चोकामोळा' पुन्हा 'गळ्यात गळा' करणारे सत्तेतील राजकारणी एकमेकांना
आधी घर सांभाळा, मग देश असे त्यांचेच मंत्री म्हणतात तर कधी पुर्ण होणारीच स्वप्ने दाखवा असे बोलतात. म्हणजे आतापर्यत सामान्यांना दाखवलेली सर्व स्वप्न बोगस होती का हा प्रश्न पडतो. युवा सेनेचे अध्यक्ष हे नांदेड जिल्ह्याच्या दौ-यावर असताना ते 'दुष्काळामुळे जळालेल्या कापूसाला बघून म्हणतात की, कापूस किती सुकला आहे.' ज्यांना कापूस सुकला आहे की, वाळला हेच समजत नसेल तर मग त्यांच्या हातात सत्ता कशी व ते आपले राजकीय पुढारी कसे हा प्रश्न आमच्या तरूणांना आता पडला पाहिजे.
मुंबईत नँशनल गँलरी आँफ मॉडर्न आर्ट च्या कार्यक्रमात जेष्ट अभिनेते अमोल पालेकर यांनी संघप्रणित भाजपा सरकारच्या सांस्कृतिक आणि कलाविषयक धोरणावर प्रहार केले त्यावेळी त्यांचे भाषण थांबवण्यात आले होते तर माजी न्यायमुर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या पुणे येथे सभांना परवानगी नाकारली होती. जर का सरकारच्या कार्यपध्दतीवर कोणी प्रश्न निर्माण करत असेल तर त्याला भाजप सरकार देशद्रोही ठरवत आहे.
भारतात निवडणुकीपुर्वी जातीय दंगली भडकतील आणि त्यातून तणाव वाढेल अशी भिती अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे तर राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही सांगितले आहे की, भाजप सरकार निवडणूकीच्या तोंडावर किंवा मध्यात एखादी मोठी घटना घडवेल त्यामुळे तुमचे लक्ष त्याकडे वळवले जाईल. जेणेकरून मागिल चार - पाच वर्षातील सरकारचे सर्व कारनामे विसरून जाताल.
काल परवातर भाजपचे आमदार साक्षी महाराज म्हणतात की, ही शेवटची निकडणूक असेल यानंतर २०२४ ला निवडणूक होणार नाही. तर राज्यस्थानचे मुख्यमंत्री पण म्हणाले की, आता जर का २०१९ च्या निवडणूकीत संघप्रणित मोदी, शहा व भाजपा यांचा विजय झाला तर यानंतर निवडणूका होणार नाहीत. कारण संघप्रणित भाजपला संविधान मान्य नाही. या सरकारचे खायचे दात अन् दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता तरी आमचा झोपलेला बहुजन तरूण जागा होणार आहे की नाही. आज संविधानामुळे स्वातंत्र्य, बंधूता, न्याय व धर्मनिरपेक्षता आहे. आता ही निवडणूक म्हणजे एक प्रकारे संविधान बचावासाठीच आहे. त्यामुळे मतदान करतेवेळी आपल डोकं आपल्याच धडावर ठेऊन योग्य उमेदवाराला मतदान करा व या सरकारचे खायचे अन् दाखवायचेही दात पाडा अन्यथा संपाल.