STORYMIRROR

रोशनी अधिकारी

Romance Tragedy Inspirational

3  

रोशनी अधिकारी

Romance Tragedy Inspirational

द इंडियन सिंड्रेला

द इंडियन सिंड्रेला

19 mins
174

भारत…

      

      सकाळचे 9 वाजले तरी आशा उठली नव्हती म्हणून आई ने दरवाजा ठोकायला सुरवात केली...


“आशा अगं ए आशा! आता उठ ना, किती वेळ झोपणार अजून ? 9 वाजले, उठ लवकर चल...”

“फक्त पाच मिनिट आई, प्लीझ!” आशाने रूम मधून आवाज दिला.

आज तिचा वीक ऑफ होता, त्यामुळे ती मस्त ताणून झोपली होती, पण तिच्या आईला तिच एवढ्या उशिरापर्यंत झोपण परवडत नव्हतं. त्यांच्या त्या छोट्याश्या दहा बाय पंचवीसच्या खोलीत किचन शेजारी लाकडची फळी टाकून बनवलेली तीन बाय सातची एक छोटीशी पार्टीशन रूम होती, त्यात फक्त एक माणूस झोपेल एवढीच बेड टाकून बनवलेली जागा. एवरी तिचा छोटा भावू त्या रूममध्ये ठाण मांडून बसलेला असतो पण वीक ऑफच्या दिवशी ती रूम तिची असते. कारण इतर दिवशी भावाला अभ्यास करता यावा यासाठी ती त्या रूमचा त्याग करते...

एवढयात रूमचा स्लायडिंग वाला दरवाजा उघडला गेला... अंगात नाईट सूट घातलेली, केस मानेवर मोकळे सोडलेली आशा, डोळे चोळत, जांभया देत बाहेर आली...

“गुड मॉर्निंग आई!” किचनमध्ये घुसत आशाने आईला मागून मिठी मारली.

“माझी मॉर्निंग तुझ्याशिवाय गुड होवू शकत नाही. तू पटकन आवर पाहू. त्या शिंदे काकू आल्या होत्या, तुला चपात्या लाटायला बोलवलयं” आईने कढईतल्या पोहयांवर कोथंबीर पेरली.

“चक, आई आज नको ना गं, मला कंटाळा आलाय” तिने चेहरा वाकडा केला.

“अस करून कसं चालेल बाळा? माझा हात दुखतोय, पाय दुखतोय म्हणून मी त्यांना म्हटलं तुला पाठवेन.”

आशाने टुथपेस्ट ब्रशवर ओढली आणि ब्रश तोंडात कोंबल. 

“आई, आपल्या आयुष्यातील कष्ट कधी संपतील गं?”

“लवकरच संपतील बाळा, तू आवर बघू पटकन, खावून घे आणि निघ पाहू... त्या वाट पाहत असतील. संध्याकाळी तुला गाडीवर पण जायचं आहे.” आईने चहा कपात गाळला. 

आशाने नाराज होवून पटापट दात घासत तोंड धुतले. कावळ्याची आंघोळ करून लगबगीने बाथरूम बाहेर आली. तिने अंगात लांब स्कर्ट आणि टॉप घातला होता. आरश्यासमोर उभं राहून तिने केसाची साधीशी एक पोणी घातली. पावडर तोंडाला फासत, टिकलीचा एक तुकडा डोक्याला चिटकला. थोडसं काजल डोळ्याला ओढत, लिपस्टिकची लाली ओठावर चढवली. एवढयात आईने कांदेपोहे आणि चहाची प्लेट खाली ठेवली. तिने तिथेच किचनमध्ये बसून पटापट ती प्लेट रिकामी केली. टेबलवर ठेवलेली पर्स खांदयाला अडकवत हॉलमध्ये आली. दरवाज्याच्या मागच्या स्टँडवर ठेवलेली चप्पल पायात रेटत दरवाजा उघडून बाहेर पडली.

“आई मी येते. जेवायला घरीच येईन.”

“हो बाळा, नीट जा!” आईने दरवाजा लावला.

आशाचा हफ्त्यामधल्या एका दिवसाच्या सुट्टीचा दिनक्रम हा ठरलेलाच असायचा. सकाळी उठून चपात्या लाटायला जायच्या. खानावळी चालवणार्‍या माणसांना अश्या बायकांची नेहमीच गरज लागे म्हणून तिच्या आईने ते काम घेतलं होत. नंतर तिथल्या टॉवरच्या दोन तीन रूममध्ये धुनी भांडी करायची. इतर दिवशी ही सर्व काम आई करायची मात्र सुट्टीदिवशी तीच जायची. जेणेकरून आईला थोडा आराम मिळावा. या शिवाय बाकीचे दिवस अंधेरीला एका मॉलमध्ये आठ तास काम करून मैत्रिणीसोबत संध्याकाळी सहाला पाव भाजीच्या गाडीवर उभी राहायची. हा त्या दोघींचा जोड धंदा होता. मुळातच आशा खूप कष्टाळू आणि समजुतदार मुलगी. वडील नसल्याने घरची सारी जबाबदारी आपोआपच तिच्या खांदयावर येवून ठेपली. त्यातच आईची तब्येत वरचे वर बिघडायची त्यामुळे आईला सगळ्याच कामात तिचा हातभार व्हायचा. अगदीच लहान वयात तिच्या खांद्यावर हा एवढा मोठा डोलारा येवून पडला होता.      


स्वीडन...

      “टर्र्न टर्र्न टर्र्न टर्र्न”... अलार्मचा घडयाळ जोरजोरात खणखणत होता. अगदी पूर्ण घरात त्याचा कर्णकर्कश आवाज घुमत होता, पण प्रिन्स काय बेडवरून उठायला तयार नव्हता. त्याने उशी कानावर घेतली आणि कूस बदलून परत झोपी गेला. त्याच्या त्या एवढ्या मोठया- नऊ हजार चौरस फूट घरात तो कठोर आवाज घुमत होता. सगळी नोकर मंडळी त्या कर्कश आवाजाने त्रस्त होवुन बेडरूमच्या बाहेर जमा झाली होती. माना लांब करून आत डोकावून डोकावून कुजबुजत होती, पण दरवाजा उघडून आत जाण्याची परवानगी नसल्यामुळे त्यांना काहीच करता येत नव्हते. एवढ्यात दरवाजावर “ठण” करून आवाज झाला आणि घडयाळ बंद पडले. बाहेरचे सर्वजण दचकून जरासे मागे सरले.

“लगता है, एक ओर घडी तूट गयी है...” एक नोकर हळूच दुसर्‍याच्या कानात कुजबुजला.

“प्रिन्स कुमार को शायद कल मॅडम से वापस डांट पडी है, इसलीये गुस्से मे अब तक सोए है ।” त्यातल्या सगळ्यात जुन्या नोकराने त्याच्या सवयीचा अंदाज बांधला. 

“अब उन्हे जगायेगा कौन ?”

“हा...!! और उनके के दोस्त भी नही आये आज !”

सगळे हताश होवून एकमेकाकडे पाहत बसले. एवढ्यात चार देखणे तरुण त्यांच्यासमोर येवून उभे राहिले.                   

त्यांना पाहताच सगळे समाधानाने आपापल्याला हसत कामाला निघून गेले. तसे ते चौघे युवक आपापसात खोडकरपणे हसले आणि दरवाजा उघडून आत शिरले. पायाखाली मृत अवस्थेत पडलेल घडयाळ पाहून त्यांनी परत एकमेकावर ओझरती नजर फिरवली. आता त्यांनी आपला मोर्चा झोपलेल्या प्रिन्सच्या बेडकडे वळवला. चौघेही दोन्ही बाजूला विभागले. दोघेजण डाव्या बाजूला आणि दोघेजण उजव्या बाजूला समोरासमोर उभे राहिले. डोक्यापासुन पांघरून ओढून झोपलेल्या प्रिन्सवर नजर टाकत एकमेकाला पाहून मंदहास्य देत मानेनेच इशारा केला. 

“फाइव्ह, सिक्स, सेवेन गो...!” चौघांनी एका स्वरात आक्रमण कराव तसं अंगावरील चादर क्षणात बाजूला केली.

प्रिन्स दचकला पण उठला नाही. त्याला त्याच्या मित्रांच्या खोडसाळ वृत्तीचा अंदाज होताच. त्याने चिडून बाजूला पडलेली उशी तोंडावर दाबली. “उफओ गाईझ, इट्स हॉलीडेइस …”

“प्रिन्स, इट्स टाइम टू वेक अप ब्रो…” एकजण कानात जवळ जावून म्हणाला.

“गो अवे गाईझ…! प्रिन्सने परत चिडून उत्तर दिल.

“हम हॉर्स रायडिंग पे जा रहे है...” त्याला डिवचवत एकजण जोराने ओरडला.

“नॉट इंटरेस्टेड…!” प्रिन्सने कूस बदलून कानावर उशी दाबली. 

“हम कार रेसिंग पे जा रहे है...” त्याला त्रास देण्यासाठी दूसरा अजून जोराने ओरडला.

“नॉट इंटरेस्टेड…!” प्रिन्स ने परत एकदा कूस बदलून उशी कानावर दाबली. 

“हम डेटिंग पे जा रहे है...” तिसरा अजून त्याला डिवचवत ओरडला.

“नॉट इंटरेस्टेड…!” प्रिन्सचाही आवाज वाढला.

“ओके...!” सगळे शांत होत एकमेकाला पाहत जोरात ओरडले. "हम टूर पे जा रहे है sssss...” चौघे एकसाथ ओरडले.

“व्हॉट? व्हेन...? व्हेअर...? हाऊ...?” प्रिन्स खडबडून जागा होत उठून बसला.                                  

चौघेही एकमेकाला पाहून मिश्किलपणे हसले.

“रॉनी, निक, मॅक्स, लकी, व्हेअर आर वी गोइंग…?” प्रिन्सचे डोळे चमकले. त्याचा आळस एव्हाना पळून गेला होता.

 “गाईझ, बट ही इज नॉट इंटरेस्टेड राइट…” रॉनी ने निक ला डोळा मारला.

 “याह…! मॅक्स यार, तुमने इसे खामखा जगा दिया...” निकने मॅक्स च्या खांदयावर हात ठेवला. मॅक्स ने भुवया उंचावून डोळे मोठे करत चकित होवून निक ला पाहिलं. निकने डोळा मारला. तसा तो पूर्ववत झाला. 

उठवल तर सगळ्यांनीच त्याला, पण बिचारा मॅक्स नेहमीच गोत्यात यायचा. ग्रुपमध्ये काहीही वाईट घडलं तर ते मॅक्स मुळे घडलं. कारण तो ही तसाच होता, मुलींची छेड काढ, टिंगल टवाळी कर, मारामारी, विशेष म्हणजे तो सरळ कधी चालायचाच नाही. रस्त्यावर चालणार्‍या माणसाला देखील उगीच एखादी उंगली करून पुढे जायचा, त्यामुळे त्याचे नसते उपद्याप जास्त. साहाजिकच त्याने चांगलं जरी केल तरी संशय मात्र त्याच्यावरच यायचा.  

बेडवर दोन्ही गुडघ्यांवर बसलेला प्रिन्स नाक फुगवून डोळे वटारून त्या चौघांना पाहत राहिला. 

“अच्छा तू सो जा बच्चा, हम जा रहे है...” लकीने ही त्याला दुजोरा दिला.

“अच्छा, तो हम चालते है...” विनोदी स्वभावाचा मॅक्स त्याला हात हलवत निरोप घेत गान म्हणू लागला. 

चौघांनीही दरवाजाच्या दिशेने चालण्यास सुरुवात केली.

“हे ssss हे sss हे sss …! व्हेअर आर यु गोइंग, हा ? प्रिन्सने बेडवरून चक्क उडी मारली आणि त्यांच्या समोर जावून कंबरेवर हात ठेवून विठ्ठालासारखा उभा ठाकला.

“लेट्स टॉक...!” शरणागती पत्करलेल्या प्रिन्सने कपाळाला ढीगभर आटया घालुन डोक खाजवत सोफ्याकडे हात दाखवला. 

पाचही जणांनी एकमेकाला हँड बंपिंग केली आणि सोफ्यावर येवून बसले. त्याच्या त्या आलीशान बेडरूम मध्ये बटन दाबताच सगळ्या गोष्टी हजर होत होत्या. त्यामुळे अगदी काही सेकंदात त्याच्या समोर पाचही जणांना कॅफेचीनो आला. सर्वांनी एकमेकाला चीयर्स करत कप तोंडाला लावले. 

“सो व्हाट्स द प्लान गाईझ…?” प्रिन्सने एक घोट घेत विचारलं.

“प्लान, आय लव माय इंडिया, वतन मेरा इंडिया, गर्लफ्रेंड मेरी इंडियन...” मॅक्स ने अगदी हातवारे करत गान गावून त्याला शॉर्टकट मध्ये सांगितलं.

मुळातच विनोदी स्वभावाचा मॅक्स नेहमीच अस काहीतरी बोलत राहायचा त्यामुळे ग्रुपमध्ये करमणुकीचा माणूस म्हणून त्याची ख्याति होती. मॅक्स ने तोंड उघडल म्हणजे सर्वांचे दात दिसलेच पाहिजेत. स्वत:पेक्षा तो इतरांच्या दातांची जास्त काळजी घ्यायचा.  

“व्हॉट…? आय डोन्ट अंडरस्टँड...”

“अरे यार, अपने निखिल, एकेए (उर्फ) निक को उसकी गर्लफ्रेंड का पता चल गया है... और वो इंडिया मे, मुंबई मे है...” रॉनी शांतपणे उतरला.

रॉनी हा थोडासा गरम डोक्याचा मुलगा होता आणि त्यातल्या त्यात पहलवान देखील. मारामारीत उतरल्यास बाकीचे सगळे आरामात बसून पाहत राहायचे. पण हा मात्र एकटा दहा जणांना भारी पडायचा. 

“तो...?” प्रश्नार्थक नजरेने प्रिन्स ने सर्वांना पहिलं.

“तो, हम इंडिया जा रहे है...” लकीने कप खाली ठेवत उदास होवून उत्तर दिल.

“व्हॉट…?” प्रिन्स चिडला. “नो वे गाईझ…” दॅट स्मेली अँड डर्टि प्लेस… यु वांट टू गो देयर, सिरीयसली… वी काँट ऍडजस्ट देयर … नो…वहा हमेशा गरमी रहती है गाईझ... अँड वी ऑल हेट इंडिया… राइट... अँड इसे वही जाणा है... इम्पॉसिबल...” प्रिन्सने सरळ आपला नकार दर्शवला. भारताबद्दल कित्येक परदेशीयांनी हा भ्रम आहेच आणि तो दूर होण म्हणजे जरा मुश्किलच. खरतर त्या पाचही जणांची भारताबद्दल काहीशी चांगली मत नव्हती. त्यासाठी त्यांची आपापली अशी कारण होती. त्यांचे आजी आजोबा किंवा आई वडील हे भारतातूनच होते पण मुळात त्यांचीच मत भारताबद्दल योग्य नव्हती तर त्यांच्या मुलांची किंवा नातवांची कशी असतील?  

“यार प्रिन्स, वी आर “शॉडोझ” ऑफ इच अदर, राइट…!” हिरमुसलेल्या निकने त्याचा हात हातात घेत विनंतीच्या नजरेने पाहिलं[R1] [R2] .

त्याचा तो निराश चेहरा पाहून प्रिन्स शांत झाला.

“पता नही, और क्या क्या सहना पडेगा इन दोनो लवबर्ड्स के लिये?” रॉनी नाराज होत म्हणाला.

“इसकी गर्लफ्रेंड के चक्कर मे हमने तो दुनिया घुम डाली...” मॅक्सने नाराजी व्यक्त केली.

“हा, और अब तो ऐसी कंट्री मे जाणा है. जिसका हमे झीरो नॉलेज है...” लकी ने आपल मत मांडल.

“और प्रिन्स ग्रुप ऑफ कंपनी के वारीस, के मॉम डॅड को पता चल गया तो उसका घर से बाहर निकलना बंद । शायद हमारे मॉम डॅड इसे इग्नोर कर दे पर, द ग्रेट प्रिन्स..., उसका क्या...?” लकीने टोला मारला.

“हा, वैसे भी इसके मॉम डॅड तो हमे बिलकुल पसंद नही करते...” रॉनीने ही दुजोरा दिला.

“ऐसा नही है की हमारे पास पैसा नही है... हा, बस स्वीडन के टॉप रिच लिस्ट मे नही आते... पर पैसा तो है ना...” लकीने चिडून उत्तर दिल.

एवढा वेळ शांत बसून विचारात मग्न झालेला प्रिन्स, चिंताग्रस्त चेहर्‍याने बसलेल्या निकवर एक नजर टाकत उभा राहिला. 

“गाईझ, कॅन यु प्लीज स्टॉप युवर नॉनसेन्स.”

त्याने इतरांना शांत केल. कारण ते उगीचच निरर्थक बडबड करत आहेत याची त्याला खात्री होती.

“ऐसा नही है की तुम लोगों को ये सब बाते पता नही है, बट स्टिल वी आर शॅडोज ऑफ इच अदर्स ... पिछले १५ साल से हम दोस्त है, पर कुछ बदला क्या...? नही ना...” 

“नही...” सर्वांनी एकसाथ नकारर्थी मान हलवली...

“हम कल भी एक थे, आज भी एक है, और हमेशा रहेंगे... राइट...! प्रिन्स सर्वांकडे पाहून गोड हसला.

सर्वजण आनंदाने एकसाथ उभे राहिले... प्रिन्स जिथे उभा होता तिथे ग्रुप करत हँड बंपिंग करुन जोराने ओरडले... “राइट...!”

काहीवेळाने प्रत्येकजण परत आपल्या जागेवर येवून बसला. प्रिन्सने आपल्या चेअरच्या बाजूचं बटन दाबलं... दरवाजा उघडून एक व्यक्ति लगबगीने आत आला. त्याने पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळी पॅंट घातली होती. प्रिन्सची विशेष काळजी घेण्यासाठी या व्यक्तीची नेमणूक केली होती. अगदी लहानपणा पासून ते त्याच्या मागे संवरक्षक भिंत म्हणून उभे होते.

“मिस्टर जो, var är min mamma pappa (माझे आई वडील कुठे आहेत)?” प्रिन्स ने स्वेडीशमध्ये त्याला प्रश्न केला...

“बॉस, han är på Japan Business Tour (ते जपानच्या बिजनेस टूर वर आहेत) मिस्टर जो स्वेडीशमध्ये म्हणाला...

“när kommer de (ते कधी येणार आहेत)?” प्रिन्सने परत प्रश्न केला

“kanske om 15 dagar (कदाचित १५ दिवसांनी) मिस्टर जो स्वेडीश मध्ये उतरला.

“ओके, थॅंक्स…! यु मे लिव नाउ…” प्रिन्सने त्याला जाण्यास सांगितलं.

तो निघून जाताच त्याने आपली योजना मित्रांसमोर मांडली.

“लुक गाईझ, कुछ भी हो जाए हमे १५ दिन मे रिटर्न आणा है... व्हिसा रेडी है ना...?”

“व्हिसा क्या, टिकिट भी रेडी है…!” निक ने ब्लेजरच्या खिशातील टिकिट आणि व्हिसा दाखवला...

“ओह माय गॉड, टिकीट भी रेडी है... और मुझे पता भी नही...” प्रिन्स आश्चर्यचकित झाला.

“बिकॉझ वी नो यु, जहा भी हम जायेंगे वहा तु बिना सवाल किये जरूर आयेगा...” निक गोड हसला.

“हम्म, अॅक्च्युअली राइट!” प्रिन्सने डोक खाजवत उत्तर दिल. “बट फ्लाइट कब है गाईझ?”

“टुमॉरो मॉर्निंग नाइन ओ क्लॉक…” लकीने मध्येच उत्तर दिल.

प्रिन्स हा स्वीडन मधील टॉप टेन श्रीमंत व्यक्ति मधल्या पाचव्या नंबरच्या एलेन मित्तलचा मुलगा होता. पैस्याची त्याला कसलीच कमतरता नव्हती. तरीही श्रीमंतीचा जराही माज नव्हता. उमर्टपणा, उद्धटपणा हे जणू त्याला ठावूकच नव्हतं. नम्र, विनयशील, मधाळ बोलणं, आणि त्याच ते सुंदर हास्य याने तो सर्वांना क्षणात आपलस करून घ्यायचा. त्याची व्यक्तिरेखा एवढी प्रभावी होती की कोणीही सहज त्याच्या प्रेमात पडेल. कष्ट माहीत नसले तरी संघर्ष अनुभवला होता.


      दुसर्‍या दिवशी सकाळी प्रिन्स लवकर उठला. आंघोळ करून बाथरोब घालून बाहेर आला. त्याच्या सेवेसाठी त्याचे सर्व सेवक तत्परच होते. एकाने पुढे होवून भिंतीमध्ये लपलेला दरवाजा उघडला. त्यात आयतकृती असा एक भला मोठा, लांबलचक आधुनिक पद्धतीचा कपाट रचलेला होता. त्यात एका बाजूला खूप सारे कपड्यांचे हँगर अडकवले होते. दुसरीकडे शुजचे काचेचे कपाट तर त्याच्याच शेजारी टायचा आणि घडयाळाचा ड्रॉवर. अलीकडेच खूप सारे परफ्यूम आणि कॉस्मेटिकच्या वस्तु. एका सेवकाने पटकन आत जावून एक - दोन टी शर्ट आणि पॅंटस काढून त्याला दाखवली. प्रिन्सने त्यातील एक टी शर्ट आणि पॅंट पसंद करून ती परिधान केली. एका सेवकाने पुढे येवून त्याच्यासाठी शुजचं कपाट उघडलं. त्या कपाटात कमीत कमी हजारच्या आसपास तर्‍हेतर्‍हेचे चप्पलचे जोड दिसत होते. प्रिन्सने बरोबर मॅचिंग करून एक जोड निवडला. त्याचबरोबर सेवकाने तो जोड त्याच्या पायात चढवला. एकाने पुढे होवून त्याला जाड मऊ असा निळ्या रंगाचा कार्डिगन (लोकरीच लांब जॅकेट) चढवला. एकाने त्याच्या हातात घडयाळ चढवलं. प्रिन्स परफ्यूम मारून रेडी झाला. त्याची कमालीची सहा फुट ऊंची त्याला फारच रुबाबदार बनवत असे. त्याने पांढरा टी शर्ट, निळी पॅंट आणि हिपच्या लांबीचा निळ्या रंगाचा कार्डिगन घातला होता. डाव्या हातात पांढरा घडयाळ, बारीक दाढी, बोलके डोळे, नाजुक नाक, गुलाबी ओठ, जिममध्ये कमवलेली रुंद छाती, अशी त्याची शरीरयष्टी फार आकर्षक दिसू लागली. 

      त्याचे मित्र हॉलमध्ये त्याची वाट पाहत बसले होते. त्याच्याप्रमाणे त्याचे मित्रही फार हॅंडसम होते. तो बाहेर येताच सर्वजण एकसाथ बाहेर निघाले. त्यांच्यासाठी आधीच बाहेर एक मोठी लिमो कार उभी होती. तो कार जवळ आला. तसा एका सेवकाने दरवाजा उघडला. सर्वजण आत बसले. कार थेट एयरपोर्टला थांबली. सर्व औपचारिकता पूर्ण झाल्यावर विमानाने उडान भरली. ७ तासांनी ते भारतात उतरले. प्रायव्हेट जेट ने जाणं म्हणजे सर्वांना उगीचच खबर लागते. त्यामुळे ते गुपचूप इतर प्लेन ने निघुन जातं. जेणेकरून प्रिन्सच्या आईवडिलांना देखील कानोकान खबर लागु नये. त्यांचे जगभर चालणारे दौरे हे असेच गुपित असत. प्रिन्सला इतर सगळ्या गोष्टीपेक्षा जगभर यात्रा करणं खूप आवडायचं.


भारत...


 चेकआऊट करून ते बाहेर आले तेव्हा दुपारचे २ वाजले होते. इंडियाबद्दल त्यांना आधीच चीड होती. त्यात थंडीच्या दिवसातही रखरखत्या ऊणाने केलेल्या स्वागताने त्यांना खात्रीच पटली. सर्वांनी डोळ्याला गॉगल चढवले. ट्रॅवल बॅगा घेवून बाहेर रोडवर आले. एयरपोर्ट सोडला तर ठिकठिकणी रांगोळीचा सडा टाकावा तसा इतस्त कचरा पडलेला होता. यावरून तर त्यांना अधिकच खात्री पटली. दुपारची वेळ असल्यामुळे रहदारी मात्र थोडी कमी होती. पण मुंग्यांनी रांगा लावल्या तश्या गाड्यांच्या लांब लचक रांगा लागल्या होत्या. त्यांनी दोन टॅक्सी थांबवल्या. डीक्कीत समान टाकून एका टॅक्सीमध्ये दोघेजण आणि दुसर्‍यामध्ये तिघेजण बसून हॉटेलला जाण्यासाठी निघाले. काही अंतर पार झाल्यावर टॅक्सी वांद्र्याला येवून ट्रॅफिकमध्ये अडकल्या. एका लेनमध्ये भरमसाट ट्रॅफिक जाम होत. तर दुसर्‍या साइडच्या गाडया सुरळीत चालू होत्या. कार, बस, टॅक्सी, व्हॅन, रिक्षा, स्कूटर्स, टेम्पो सर्व एका जागेवर गेली १५ मिनिट खिळून जसाच्या तश्या उभ्या. इतका वेळ एका जागेवर बसून अवघडलेल्या काहींनी आपल्या सुपीक मेंदूला थोडे कष्ट द्यावे आणि पुढे कसं जाता येईल का हे पहाण्यासाठी चक्क गाडींच्या टपाचा आधार घेतला. काहींनी तर एसटी महामंडळांच्या टपावर झेप घेतली. तरीही पुढे काय झालं असेल याचा अंदाज कोणालाही लावता येत नव्हता. काही महाभाग तर बाइक, सायकल सारख्या छोटया वाहनांना उचलून दुसर्‍या लेनमध्ये कस जाता येईल यासाठी धडपडत होते? तर काही बाइकस्वार रिक्षात बसलेल्या पोरींना पटवण्याच्या प्रयत्नात स्टाइल मारत होते. तर कुठे रिक्षाच्या, टॅक्सीच्या मागे, बसलेली, प्रेमात हरवलेली जोडपी उफाळून फुटणार्‍या कामवासनेला बाह्यस्पर्शाने उपभोगत होती. प्रिन्स आणि त्याचे मित्र फार वैतागले. एव्हाना ते भारताला शिव्या देवू लागले होते. “आधीच हौस आणि त्यात पडला पाऊस” अशी काहीशी त्यांची परिस्थिति झाली होती. टॅक्सी ड्रायवरच्या शेजारी बसलेला प्रिन्स डोळे वटारून मागे बसलेल्या निकला पाहू लागला. टॅक्सी ड्रायवरला ते सर्व लक्षात आल असावं म्हणूनच तो मोडक्या तोडक्या इंग्लिश मध्ये त्याच्याशी बोलू लागला.

“डोन्ट वरी सर…! इट्स हॅपन्ड एवरीडे...” बट यू, फ्रॉम व्हेअर…?” 

“स्वीडन...!” प्रिन्सने त्याची मोडकी तोडकी इंग्लिश समझून घेत प्रेमाने उत्तर दिल. 

“अच्छा! गाणा सुनेंगे... सॉन्ग …! सॉन्ग….!”

“ओके…!” वैतागलेल्या प्रिन्सने त्याला एक सुंदर स्मित करत होकार भरला. 

भारतातं विशेष म्हणजे मुंबईत, एक मात्र खासियत नक्कीच आहे. मोडक तोडक का होईना समजण्यावढं इंग्लिश अगदी हॉटेल कामगारापासुन ते ड्रायव्हरपर्यंत सर्वांना येत. त्यामुळे लगेचच टॅक्सी ड्रायवरने आपल्या म्यूजिक सिस्टम वर एक छानस हिन्दी गान चालु केल.


ये दुनिया एक दुल्हन, ये दुनिया एक दुल्हन,

दुल्हन के माथे की बिंदिया, ये मेरा इंडिया

आई लव माई इंडिया, आई लव माई इंडिया


टॅक्सी ड्रायवरने अगदी त्याच्या आवडीचं गान लावलं. बहुतेक तो महिमा चौधरीचा फॅन असावा. मात्र गाण्याचे बोल ऐकताच हे तिघेही जोर जोरात हसू लागले. ड्रायवर बिचारा बुचकळ्यात पडला. आपण चुकीच गान लावलं की काय अस त्याला वाटून गेलं. पण खर म्हणजे ते मॅक्सवर हसत होते. त्याने जे गान गावून भारताचं वैशिष्ट सांगितलं होत. नेमकं तेच गान ऐकून त्यांना हसू आवरेना. दोघेही मॅक्स ची चेष्टा करू लागले. त्या निमित्ताने थोड्यावेळासाठी का होईना तिघेही अंगातील थकवा विसरून गाण्याचा नव्याने आस्वाद घेवून डोलू लागले. अचानक प्रिन्सचा लक्ष पलीकडच्या लेनच्या बाजूला असलेल्या फूटपाथ वर गेला. त्याला तिथे एक ओळखीची मुलगी दिसली. त्याने मागे बसलेल्या निकला आणि मॅक्सला बाहेर पाहण्यास सांगितले.

“निक, इज शी वेनेसा …?

“व्हाट? व्हेअर ?” निकचे डोळे चमकले. आतुरतेने तो बाहेर पाहू लागला.

“सी, इन फ्रंट ऑफ दॅट सिटी प्लाझा... इन ब्ल्यु ड्रेस...” त्याने खिडकी खोलून बाहेर हात दाखवला. 

“ओह येस, शी इझ वेनेसा.” निक अगदी भान हरपून त्या दिशेला पाहू लागला.

आनंदाच्या भरात त्याने आपल्या डाव्या बाजूचा टॅक्सीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या लक्षात आल की समोर भला मोठा ट्रक उभा आहे दरवाजा उघडता येणार नाही, हे पाहून निराश होवून त्याने हात मागे घेतला. त्याने आता मॅक्सच्या बाजूच्या दरवाजाला हात घातला. पण मॅक्सच्या उजव्या बाजूलाही एक बाइक टॅक्सीला अगदी चिटकुन उभी असल्याने त्याची तीही खटपट व्यर्थ ठरली. प्रिन्स हे सर्व पाहत होता, त्याच्या लक्षात आल की त्याच्या बाजूचा दरवाजा बर्‍यापैकी उघडू शकतो. कारण तिथे थोडी मोकळी जागा आहे.

“यु गाईझ गो अहेड, आय फॉलो हर.” प्रिन्सने कारचा दरवाजा उघडला. छोट्याश्या फटीतून अंग बारीक करत तो बाहेर पडला. दरवाजा बंद करत त्याने अंगठा दाखवला.    

“बट प्रिन्स, इट्स अ न्यु कंट्री फॉर यु.” मॅक्सने काळजी व्यक्त केली.

“डोन्ट वरी अबाऊट मी, आय विल कॉल यु. ओके…! घाईगडबडीत उत्तर देत तो त्या दिशेने एक एक गाडी पार करत निघाला सुद्धा.

"बी केअरफुल...." निकचे पुढचे शब्द ऐकायला तो तिथे थांबलाच नव्हता. रप रप पावलं टाकत त्याने डिव्हायडर गाठला. उडी मारून पलीकडचा रस्ता वाहन थांबवत लगबगीने पार केला. एव्हाना वेनेसा फारच दूर निघून गेली होती. तो फूटपाथ पकडून तिच्या मागे पळू लागला. धावता धावता तो बराच दूर आला होता. इकडे ट्राफिक मोकळं होवू लागलं, जनावरांना गोठ्यातुन सोडव तश्या सर्व गाडया भरधाव वेगाने सुसाट सुटल्या. मॅक्स आणि निकला प्रिन्सची काळजी वाटू लागली. त्यांची नजर कार बाहेरच्या फूटपाथवर प्रिन्सला शोधत होती, पण तो कुठेच दिसेना. बहुतेक तो खूप दूर निघून गेला असावा त्यामुळे हॉटेलवर सामान ठेवून परत त्याला घ्यायला येवू या उद्देशाने सगळे तसेच पुढे निघुन गेले. प्रिन्स धापा टाकत गल्ली गल्लीतील रस्त्यावरून वेनेसाच्या मागे धावत होता. त्याने दोघांमधील अंतर बर्‍यापैकी कापल. तो तिला आवाज देणार एवढयात एक बाइक वेनेसा समोर येवून उभी राहिली आणि बघताच क्षणी ती त्या बाइकवरुन निघूनही गेली. थकलेला प्रिन्स अजून जोर काढून बाइकच्या मागे पळू लागला. आवाज देवू लागला. “वेनेसा...! वेनेसा....स्टॉप...! वेनेसा लिसन...!” शेवटी धावता धावता एका खडड्यात अडकून त्याला ठेच लागली आणि तो धाडकन रस्त्यावर कोसळला. त्याच्या गुडघ्याला आणि मनगटाला बर्‍यापैकी खरचटलं. छातीलाही मुका मार बसला, “आऊ... च…!” खिशातून पॉकेट आणि मोबाइल सरळ रस्त्यावर उडाला. हे सगळं मघापासुन दुरून पाहणारा एक भुरट्या चोर काळ्या हुडीझ ने डोक झाकुन झपाझप सायकलवर स्वार होवून मोबाइल आणि पॉकेट उचलून फरार झाला. प्रिन्सच्या ते पाहतच राहिला. त्याच्या अंगात उठून त्याचा पाठलाग करण्याचाही त्राण उरला नव्हता. तो फक्त एवढच पुटपुटत राहिला, “आह...! आऊच...! अटलिस्ट, गिव्ह मी माय मोबाइल बॅक, प्लीज…!” वेदनेने त्याचे हात पाय थरथरू लागले. चेहरा धुळीने माखला. केस अस्तावस्त विखुरले. तो कसाबसा धडपडत उठला आणि जवळच्या एका पब्लिक बेंचवर जावून बसला. जखमेने त्याचा जीव कासावीस होवू लागला. भुख आणि तहानही त्यात त्रास देवू लागली. कुठे जावं, काय करावं काही सुचत नव्हतं, किंबहुना भुकेने त्याच डोकच चालत नव्हतं. त्याचा तो रुबाबदार, देखणा चेहरा क्षणात निस्तेज, खिन्न, उदास आणि हतबल झाला होता.. विचारांचं वादळ त्याच्या डोक्यावर थाय थाय नाचु लागलं. त्याने एकवार सगळीकडे नजर फिरवली. मोठ मोठ्या बिल्डिंग, रस्ते, वाहने, जाणार्‍या येणार्‍या लोकांची वर्दळ आणि झाडे याशिवाय आजूबाजूला कोणीच ओळखीचं दिसत नव्हतं. मित्रांचे नंबरही आठवेनासे झाले. परत मागे त्याच जागेवर जायचं तर रस्ताच आठवेना. कुठे आलोय हे ही माहीत नव्हतं. कुठे जायचय हे ही विचारलं नव्हतं. टॅक्सी सोडलेलं ठिकाणही जाणून घेतलं नव्हतं. एकंदरीत आपण इथे हरवलोय याची त्याला खात्री पटली. ते ही त्याच्या मूर्खपणा मुळेच. कारण, इतर देशात फिरण्यासाठी तोच सगळी माहिती काढायचा आणि व्यवस्था ही करायचा. पण भारताबद्दल विशेष रुची नसल्याने त्याने कसल्याच बाबतीत रस घेतला नव्हता. त्यातच निकने प्लान केलाय म्हणजे सगळं नीटच असणार म्हणून तो ही बेभरवसी राहिला.

 गुडघा आणि कोपर जरा जास्तच ठणकू लागला म्हणून त्याने जखमेकडे पाहिले आणि त्याच्या डोळ्यातून टचकन पाणी टपकल, ओठ थरथरू लागले. त्याला तीव्र जखम झाली होती. पॅंट फाटून गुडघा पूर्ण सोलून निघाला होता. रक्तही हळू हळू वर येवू लागलं होत. मनगटालाही बरचसं खरचटल होत. कार्डिगनचे (लोकरीचे जॅकेट) हात कोपरपर्यंत दुमडल्यामुळे ते तेवढं सुरक्षित होत. छातीलाही बर्‍याचश्या वेदना होत होत्या. तो काही वेळ तसाच त्या बेंचवर बसून खिशात एक रुपया नसताना कोणी आपल्याला काही खायला देईल का? हा विचार करत राहिला. पण भुख असह्य होत होती म्हणून त्याने आजूबाजूला पाहिलं काहीसा विचार करून बेंच वरून उठला. हळू हळू चालत फूटपाथ वरून उतरून रोडवर आला. इकडे तिकडे चालणार्‍या लोकांपैकी एका पुरुषाला थांबवून,

“एक्सक्यूज़ मी सर, कॅन यु प्लीज लेंड मी सम मनी फॉर लंच… आय अॅम सो हंग्री… प्लीज…” 

इंग्लिश ऐकून तो माणूस काहीच न बोलता दुर्लक्ष करून निघून गेला. कारण भारतात मुळात इंग्लिश म्हणजे कोणीतरी योद्धा घोड्यावर बसुन आपल्याशी आता युद्ध करणार आहे आणि आपण त्याला प्रतिघात करू शकत नाही त्यामुळे शरणागती पत्करून पळुन जाणे हाच काय तो एकमेव बचाव अशी धारणा.

इंग्लिश बोलण्यामागे कोणी आपल्याला चोर किंवा भिखारी समझणार नाही तर एक सुशिक्षित व्यक्ती समझेल हीच प्रिन्स ची धारणा होती. पण इथे इंग्लिश कळत नसावं म्हणुन त्याने परत एका महिलेला थांबवलं आणि हात जोडून हिंदीमध्ये विनंती केली. 

“एक्सक्यूज़ मी मॅम, मुझे बहोत भुख लगी है… मुझे खाना खाने के लिये कुछ पैसे दे सकती है… प्लीज…!” 

त्या बाईने त्याला वरून खालपर्यंत पाहिलं. मदत तर केली नाही वरून चार उपदेशाचे डोस मात्र पाजले.

“इतने हट्टे - कट्टे जवान हो और भीख माँगते शरम नही आती । कुछ काम धंदा क्यु नही करते ??” 

ती बाई निघून जाताच त्याने दोन जोडप्यांना थांबवून विनंती केली.

“एक्सक्यूज़ मी सर, कॅन यु प्लीज लेंड मी सम मनी फॉर लंच… आय अॅम सो हंग्री… प्लीज…!” 

त्या दोघांनीही त्याला वरून खालपर्यन्त पाहिलं आणि आपसात कुजबूज करत निघून गेले.

“बापरे, भिखार्‍यांची पण भीख मागायची स्टाइल बदलेली दिसतेय. एवढा धडधाकट पोरगा आहे, कामं करायला काय होतं ह्यांना. चरशी मेले !”

मुळात मुंबईत इतके भिखारी रोज वेगवेगळ्या तर्‍हेने भिख मागत असतात की गरजू व्यक्तिला ओळखण फारच मुश्किल. त्यात जर एखादया इज्जतदार घराण्यातल्या व्यक्तीने चांगले कपडे घालून हात पुढे केले तर सभ्य लोकांच्या मनात अजूनच प्रश्न, चांगला घरंदाज दिसतोय तरी भिख मागायला का जातय? कोणीतरी भूल घालून लुबाडाल तर? गोड बोलून पॉकेट मारून नेल तर ? गळ्यातले दागिने ओढून पाळला तर ? त्यामुळे अश्या व्यक्तींच्या वार्‍यालाही लोक उभे राहत नाहीत. जेवढ मोठ शहर तेवढीच गुन्हेगारी प्रवुत्तीही जास्त.     

प्रिन्सने खूप जणांना थांबवून आपली लाचारी सांगितली पण कोणीच त्याला वीस रूपयाच्या वर मदत केली नाही. सुट्टे पैसे एकत्र करून फक्त वीस रुपये तो मिळवू शकला होता. त्याला ते पैसे पुरेसे वाटले म्हणून तो समोरच असलेल्या एका हॉटेल मध्ये शिरला. काऊंटरपाशी जावून त्याने पैसे पुढे केले.

“मुझे बहोत भुख लगी है, इसमे जो भी आयेगा प्लीज दे देना ।”


हॉटेल मालकाने त्याला अगदी वरुन खालपर्यन्त न्याहाळल. त्याची फाटलेली पॅंट, विस्कटलेले केस, धुळीने माखलेला चेहरा, मळलेले कापडे पाहून त्याच्या मनात पाल चुकचुकली. कोणीतरी मवाली- गुंडा किंवा मग चरशी - गर्दूल्ला असावा.

“गांजा पियेलाय क्या? वीस रुपये मे कुछ नही आता है, चल भाग यहा से।”

प्रिन्सने दचकून ते पैसे उचलले आणि निराश होवून तिथून पुढे चालू लागला. एव्हाना त्याला कळलं होत की ही रक्कम फारच कमी आहे.

तो लंगडत होटलच्या बाहेर आला एवढ्यात त्याच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका छोट्या मुलाने त्याला आवाज देवून थांबवलं म्हणाला,

"अब्बे तेरे दिमाग मे लोचा हैं क्या? या फिर खंबा पियेलाय | बीस रुपया देके, दो सौ का चिकन प्लेट मंगता तेरे को | दु क्या एक रख के! सामने वाला गाडी नही दिखा क्या वडापाव का? चल, उधर से लेले. भाग..!

"इसमे आयेगा?"

"अब्बे आयेगा बे ! निकल...! नया आयेलाय क्या मुंबई मे?"

प्रिन्स ने होकारार्थी मान हलवत हात जोडले.

पण त्या छोट्याच्या ते काय डोक्यात शिरलं नाही. तो आपला पार्सल पोचवण्याच्या गडबडीत निघुन गेला.

      प्रिन्स परत लंगडत हळू हळू चालत त्या वडापावच्या गाडीपर्यन्त पोहोचला. तिथल्या भैया ला होते तेवढे पैसे पूढे केले. त्याने त्याच्या चेहर्‍याचा एकवार संभ्रमित नजर टाकून गुंगा समजुन त्याला दोन वडापाव बांधून दिले. त्याने ते गपागप खायला सुरुवात केली. खुप भुकेलेला होता तो. त्यामुळे त्याने ते अगदी सेकंदातच संपवले. पोटाला थोडासा आधार मिळाला. तरीही भुख पूर्णपणे मिटली नव्हती. पण थोडं बरं वाटलं त्याला. इकडच फास्टफूड त्याला नक्कीच एवढस रुचकर नाही जाणवलं. पण आता काय करणार? भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा अशी त्याची अवस्था झाली होती. तिथल्याच पाण्याने त्याने आपला चेहरा, हात स्वच्छ धुवून घेतले. जखमेतून गळणार रक्त पाण्याने धुवून घेतलं. केस परत एकदा हातानेच नीट बसवून भैयाचे आभार मानत तो तेथुन बाहेर निघाला.वाट मिळेल तिकडे चालत राहिला. आता तो जरा पूर्वी सारखा टवटवीत तजेलदार दिसत होता. हळू हळू चालत एका बीच जवळ आला. त्याने आजूबाजूला पाहिलं तर तो जुहू भागात पोहोचला होता. तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते. समोर दिसणारा लाल भडक सूर्य, समुद्राच्या उसळणार्‍या लाटा, मंद मंद वाहणारा वारा पाहून त्याला फार प्रसन्न वाटलं. तो तिथेच असणार्‍या एका लांबलचक काठड्यावर जावून बसला. मागे भला मोठा समुद्र आणि समोर भला मोठा रस्ता या दोघामध्ये तो उभा होता. कुठे राहावं, कोणाची मदत घ्यावी, त्या वडापाववाल्या माणसाकडे जावून मदत मागावी का? हे प्रश्न वारंवार मनात आदळत होते. त्याची नजर गरगर फिरत होती. लोकांची वर्दळ, वाहनांची रेलचेल, फास्टफूडच्या गाडया, फेरीवाले, छोटी मुलं एवढी गर्दी असूनही तिथे तो एकटाच हरवला होता. गाड्यांचे हॉर्न, छोट्या मुलांचा कल्ला, येणार्‍या जाणार्‍या लोकांचे संवाद, पक्ष्यांची किलबिल, फेरीवाल्यांच्या आवाजाची वरचढ एवढा कलकलाट असूनही त्याला काही ऐकू येत नव्हतं. त्याच लक्ष हातातील घड्याळावर केन्द्रित झाल होत. गुडघ्यातील कळा जाणवत होत्या पण त्याच त्याला भान नव्हतं. दोन तीन फेरीवाले त्याच्या जवळ येवून गेले. “ये भेळ घ्या, भेळ....” “शेंग चणा....” पण त्याच्या स्तब्ततेने ते दूर निघून गेले. दोन छोटी, फाटके कपडे घातलेली भिखार्‍याची पोरं त्याच्या जवळ येवून हाताला हात लावत भिख मागू लागली. त्यांच्या त्या स्पर्शाने तो भानावर आला.

                                              

      समोरच्या रस्त्यावर आशा, मैत्रीण पल्लवी आणि तिची आई, पाव भाजीच्या गाडीवर उभ्या होत्या. आशा रोज संध्याकाळी पल्लवीच्या आईला मदत करायला गाडीवर जात असे. जाधव काकी पाव भाजी बनवायच्या आणि बाकी छोटी- मोठी कामं ह्या दोघी मिळून करायच्या. असा रोजचा त्यांचा दिनक्रम चालत असे. आजही तशी बर्‍यापैकी गर्दी होती.

“ही घ्या तुमची बटर पावभाजी, आणि ही चिझ पाव भाजी.” एका ग्राहकाच्या टेबलवर ठेवून आशाने प्रिन्सवर परत एक नजर टाकली.

“आशु, जरा टोमॅटो पास कर.” पल्लवीने तिला आवाज दिला.

                            


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance