STORYMIRROR

रोशनी अधिकारी

Romance Tragedy Inspirational

3  

रोशनी अधिकारी

Romance Tragedy Inspirational

द इंडियन सिंड्रेला - भाग २

द इंडियन सिंड्रेला - भाग २

23 mins
169

गाडी खालून टोमॅटो काढून ती पल्लवी जवळ आली. पल्लवी एका टेबलवर कांदा चिरत उभी होती. तिने पल्लवी समोर टोमॅटो ठेवले. पण आशाचा लक्ष पूर्णपणे समोरच्या कट्ट्यावर बसलेल्या प्रिन्सवर होता. ती गेले दोन तास त्याच्यावर नजर ठेवून होती. थोडासा संशयी, लाचार, असहाय्य, निरागस, सहानुभूती करण्याजोगा वाटला तिला.

      इकडे त्या दोन मुलांकडे पाहून प्रिन्सच्या डोळ्यातून घळाघळा अश्रु वाहत होते. आजपर्यन्त त्याच्यावर कधीच अशी वेळ आली नव्हती. ज्याने नेहमी इतरांना मदत केली त्याचेच हात आज रिकामी आहेत त्यालाच दुसर्‍यांसमोर हात पसरण्याची वेळ आली आहे याच त्याला दु:ख होत होतं.

पण रडणार्‍या प्रिन्सला पाहून आशाला मात्र नवल वाटत होत. मघापासुन आशा कुठेतरी हरवली आहे हे पल्लवीच्या लक्षात आल. न राहवून तिने तिला प्रश्न केला.

“आशु काय झालं? लक्ष कुठे आहे तुझ?”

आशा दुसरी सूरी घेवून टोमॅटो कापू लागली.

“पल्लू, तो समोरचा मुलगा, तो बघ ना ब्ल्यु कोट घातलेला.” बोटाने समोर इशारा करून तिने तिला दाखवलं.

“आयला...! कसला हॅंडसम आहे गं, आई शप्पथ! शाहीद कपूरच दिसतोय गं...” पल्लवी अति उत्साहीत झाली. 

“काय पण हा पल्लू, शाहिद कपूर म्हणे, नीट बघ, तो इंडियन दिसत असला तरी तो इथला नाही वाटत गं... बघ ना, थोडा वेगळाच दिसतोय, प्लस कपड्यांची स्टाइल इंडियन नाही वाटत यार.”

“हम्म, थोडा वेगळा दिसतोय खरा... मग काय झाल त्याच?”

“अगं, तो तुला थोडा अस्वस्थ नाही वाटत का?” तिने डोक्याला ढीगभर आटया घालून पल्लवीकडे पाहिलं.

“का? तुला का अस वाटलं?” तिने नजर रोखत उलट प्रश्न केला.

“बघ ना, हॅंडसम तर आहेच, वरून एवढे भारी कपडे, देखणा चेहरा पण पायाला हाताला जखम. प्लस तो इथलाही नाही वाटत, त्यात तो एकटा असा का बसला असेल आणि त्या भिखार्‍यांच्या पोरांना पाहून रडत का असेल? इथे त्याला कोणी त्रास तर दिला नसेल ना?”

“हा गं, पॉइंट आहे.” तिने सहमत होत मान हलवली. “पण आशु तो खरच खूप हॅंडसम दिसतोय गं.” तिने परत एकदा उत्साही होवून गालाला हात लावले.

“चक्क, गप्प बैस गं जरा... मी काय बोलतेय नि तुझ आपल भलतचं!” आशु तिच्यावर थोडीशी चिडली.

“बर बोलं !” पल्लवी गंभीर झाली

“मी गेले दोन तास त्याला निरखुन पाहतेय. तो एकसारखा रडतोय, जखमेला पाहतोय, इकडे तिकडे पाहतोय, परत रडतोय.. नुसताच विचारात तळमळतोय."

"हो का! मी नाही लक्ष दिला." तिने तिला दुर्लक्षित केलं. 

“चक! मी काय म्हणते, आपण त्याची विचारपुस करूया का?” आशाने काळजीने पल्लवीकडे पहिलं. 

“हो ना, मग मीही मघापासुन तेच सांगायचा प्रयत्न करतेय ना तुला !” तिने तिच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकला.

“हो का ! बर सॉरी चलं जावूया !”

“चल लवकर, मला तर कधी एकदा त्याला जवळून पाहतेय अस झालाय.” ती परत एकदा उत्साही झाली.

दोघीही हातातील काम सोडून त्याच्या दिशेने चालू लागल्या.  

“आई आम्ही आलो हा.” पल्लवीने चलता चलता आईला आवाज दिला. पल्लवीची आई कामात दंग असल्यामुळे तिचा लक्ष नव्हता.

“अरे हा,” त्या दोघी अचानक थांबल्या. “आपण त्याला इंग्लिशमध्ये नेमकं काय विचारायचं...?”

“आयला, ते तर मोठ लफड आहे. आशु तू जा; तू जा मी इथेच थांबते. उगीच इज्जतीचा फालूदा व्हायचा.” पल्लवीला इतकीशी इंग्लिश जमत नव्हती या तुलनेने आशाची इंग्लिश बऱ्यापैकी होती. 

“हम्म...! आशा विचारात हरवली. काहीतरी विचार करून, “बघ, मी त्याला पहिला प्रश्न विचारेन, तुम्हाला कुठे जायचं आहे ? म्हणजे इंग्लिशमध्ये उम्म… व्हेअर यु वॉन्ट टु गो ?”

“हम्म! अगदी बरोबर.” पल्लवीने चुटकी वाजवली.

“दूसरा प्रश्न उम्म,” विचार करू लागली. “हा, त्याला विचारेन, आर यु इन एनी ट्रबल?”

“हम्म! चालेल. चल”

दोघींचे चेहरे खुलले. नव्या आत्मविश्वासाने दोघी परत चालू लागल्या. बघता बघता रास्ता ओलांडून त्या त्याच्या जवळ जावून पोचल्या. अजूनही ती पोर प्रिंसच्या अवती भवती फेर्‍या घालत फिरत होती. पण प्रिन्स मात्र खरचटलेल्या गुडघ्याला एकटक पाहत विचारात हरवला होता.

“ए, निघा इथून.” पल्लवीने पोरांना दरडावलं आणि पळवुन लावलं. दोन्ही पोर तिथून लगेचच पसार गेली.

फूटपाथ वर चढत आशाने वाकून प्रिन्सच्या चेहर्‍यासमोर हात फिरवला.

“हॅलो…! एक्स्कुज मी ...!”

कोणीतरी आपल्यासमोर उभं आहे याची जाणीव होवून प्रिंसने वर पाहिलं आणि तो तिला क्षणभर पाहतच राहिला. तिचा गोरा निखळ तजेलदार चेहरा, खुललेले गुलाबी ओठ, काचेसारखे टपोरे डोळे, कोरीव भुवया, कपाळावर छोटीशी टिकली, जाडसर नाकाचा शेंडा, हवेवर उडणारे काळेभोर लांब सडक केस, डोळ्यावर खेळणारी केसाची बट, सुडौल बांधा, आणि तिच मनमोहक हसू पाहून प्रिन्सचा चेहरा उजळला. गुलाबी रंगाची तिची घागरा चोळी तिला फारच उठुन दिसत होती. इतकी सुंदर मुलगी त्याने प्रथमच पाहिली होती. तिने परत एकदा त्याच्यासमोर हवेत हात फिरवला.

“हाय…!” आशा गोड हसली. पल्लवी दात काढत बेभान होवून त्याला पाहतच बसली होती.

“हॅलो…!” प्रिन्स स्तब्द होवून एकटक तिच्याकडे पाहत उभा राहिला. तिच्या चेहर्‍याची कोमल प्रभा पाहून तो क्षणभर आपल्यासोबत घडलेल्या सगळ्या वाईट गोष्टी विसरून गेला. 

त्याच्या फॉरेन इंग्लिश टोनवरुन तिला तो परदेशी असल्याची खात्री पटली.

“व्हेअर यु वांट टू गो??” आशाने थोड घाबरतच प्रश्न केला.

जेव्हा तुम्हाला माहित असतं की, समोरच्याला आपल्यापेक्षा जास्त इंग्लिश येते तेव्हा तुम्हाला येणारी इंग्लिश ही विसरायला होते. 

“आय डोन्ट नो…” तिच्या त्या प्रश्नाने तो परत एकदा उदास झाला. 

“व्हॉट??"

आशा पल्लवीला पाहत कानाजवळ कुरकुर करू लागली. “हा काय बोलतोय ग?”

“काय माहिती, त्याला दूसरा प्रश्न विचार ना ??” पल्लवीही कानाजवळ कुजबुजली .

“ओके...!” आशाने धीर एकटवून दूसरा प्रश्न केला.

“आपको कोई तकलीफ है??” उम, आय मीन, आर यु इन एनी ट्रबल??” 

“या, अक्चुली...! आय नीड अ प्लेस टु स्टे.” आय हॅव लॉस्ट माय फ्रेंड्स अँड नाऊ आय अॅम सो अलोन. आय वान गो बॅक टु माय होम. बट हाऊ? आय डोन्ट नो. आय हॅव लॉस्ट माय मनी अँड मोबाइल अल्सो.” आणि तो रडू लागला. 

“हेय, प्लीज, लिसन, डोन्ट क्राय.” आशाने त्याला धीर दिला.

“पर तुम हो कहा से यार??” पल्लवीने मधेच प्रश्न केला.

“मतलब, व्हेअर आर यु फ्रॉम??” आशाने इंग्लिशमध्ये परत प्रश्न केला.

“आय अॅम फ्रॉम स्वीडन… धिस इज माय पासपोर्ट, व्हिसा अँड टीकेट्स…” प्रिन्सने जॅकेटच्या खिशातून सर्व बाहेर काढलं आणि आशाच्या हातात दिलं.


आशा आणि पल्लवी निरखून पाहू लागल्या.

ब्रिटिश एयरवेझ, बोर्डिंग पास 

नेम – मित्तल नील, एज – २५, एनआर (स्टॉकहोल्म) टु एमयूएम (मुंबई)


“ओह, नील मित्तल एनआरआय राइट...! प्रिन्सने होकारार्थी मान हलवली. तो इंडियनच आहे हे लक्षात येताच तिने त्याला हिन्दी येते का विचारलं. कारण तिला मोकळेपणाने बोलता येत नव्हतं.

“डु यु नो हिन्दी, क्युंकी माय इंग्लिश इज बेकार.” आशा ने पल्लवीकडे पाहिलं. प्रिन्स ओठातल्या ओठात हसला. त्याला ते फारच गोड वाटत होत. “बेकारला इंग्लिशमध्ये काय बोलणार पल्लू??”

“बेकार मतलब उम्म…. हा पुअर!” पल्लवीने विचार करून एक शब्द सुचवला.

“हा, माय इंग्लिश इज सो पुअर. प्लीज आय अॅम सो सॉरी.” आशाने दिलगिरी व्यक्त करत ओठ दाबले. 

“इट्स ओके! आय कॅन अंडरस्टॅंड, प्लीज स्पीकअप.”

“ओके, तो आपको हमारे साथ उस गाडी के पास चलना होगा.” पल्लवी हिन्दीमध्ये बोलून मोकळी झाली.

“शी सेड, यु हॅव टु कम विथ अस.” आशा ने भाषांतर करून सांगितलं.

“आय जस्ट हेट इंडिया. पिपल ऑफ हिअर आर व्हेरी मीन, देन व्हाय शुड आय ट्रस्ट यु गाईझ.” आतापर्यंत त्याला समोरून कोणीच मदतीचा हात दिला नव्हता. त्यामुळे तो अस मूर्खसारखं काहीतरी बोलुन गेला.

“यु डोन्ट हॅव एनी ऑप्शन, लेट अस हेल्प यु. फॉलो अस इफ यु ट्रस्ट अस.” आशाने त्याच्या डोळ्यात बघून त्याला विश्वास दिला.

“नाहीतर बस बोंबलत इथेच...” पल्लवी फंकारून उत्तर देत मागे फिरली. कारण तिला त्याचा राग आला होता.

एकतर आपण ह्याला मदत करायची, समोरून चौकशी करायची आणि हा महाशय म्हणतोय आमच्यावर ह्याने का विश्वास ठेवायचा? नको ठेवूस बाबा. राहा तिथेच बसून. आमच काय जातय?

पल्लवी थोडीशी चंचल आणि शीघ्र कोपी होती. आशाशिवाय तिच कोणाशीच जास्त पटत नसे. पण स्वभावाने फार उदार आणि साफ मनाची होती. दिसायला ही तेवढीच सुंदर.  

आशाही फूटपाथ वरुन उतरून मागे फिरली. काहीसा विचार करून प्रिन्सही तिच्या मागे मागे हळू हळू लंगडत चालू लागला. आशाने मागे वळून पाहिलं. प्रिन्सला मागून येताना पाहून तिला फार समाधान वाटलं. जेव्हा आपल्याला माहित असतं की आपण खऱ्या अर्थाने समोरच्याची मदत करू इच्छितो पण त्याला विश्वास देण फार कठीण होऊन बसत. काही भामट्या लोकांमुळे चांगल्या व्यक्तींनाही अविश्वासाच्या कठड्यात उभ केल जातं. मनात तीव्र इच्छा असूनही खऱ्या व्यक्तीची मदत काहीवेळा फक्त संकुचित विचारामुळे नाकारली जाते. तिघेही पावभाजीच्या गाडीजवळ आले. पल्लवीने त्याला बसायला एका साइडला टेबल ठेवले. तो त्यावर बसला. आशाने त्याला मस्त झणझणीत चीज पाव भाजी दिली.

“हॅव इट…” आशाने अजून एक टेबल आणून त्यावर प्लेट ठेवली.

“थॅंक्स ! आय वॉज सो हंग्री...” प्रिन्सचं पोट अर्ध उपाशीच होत. भुख होतीच त्याला त्यामुळे तो त्यावर तुटून पडला. आशा त्याच्या त्या निरागस चेहर्‍याला पाहत तिथेच उभी राहिली. 

आतापर्यंत त्याच्यावर कोणीच एवढे उपकार केले नव्हते. आशा त्याला देवदूतच वाटली. तीच आपल्याला मदत करेल याची त्याला खात्री पटली. कधी नव्हे ते आज त्याने देवाचे आभार मानले.

जाधव काकी आणि पल्लवी दोघे गिऱ्हाइकांना सांभाळण्यात व्यस्त होत्या.

“काय ग पल्लू, कोण हा??” पल्लवीच्या आईने तव्यावर भाजी मऊ करत प्रश्न केला.

“कोणीतरी फिरंगी आहे... हरवलाय मित्रांपासून... राहायला जागा पाहिजे…” पल्लवी ने बटर लावलेला पाव तव्यावर शेकवला.

गर्दी कमी झाल्यावर जाधव काकी प्रिन्सजवळ येवून विचारफूस करू लागल्या एव्हाना त्याची प्लेट रिकामी झाली होती.

“क्यू बेटा, नाम क्या है तुम्हारा?? और ये चोट कैसे लगी??”

पल्लवी आणि आशाही त्याच्या जवळ टेबल लावून बसल्या.

“काकू त्याला हिन्दी नाही कळत.” आशा म्हणाली.

“मेरा नाम नील मित्तल है ।”

प्रिन्सने हिन्दी बोलायला सुरुवात केल्यावर आशा आणि पल्लवी डोळे विस्फरत आ वासून एकमेकाला पाहत राहिल्या. त्याचे शब्दोच्चार बर्‍यापैकी भारतीय आणि काही अंशी परदेशी वाटत होते. त्याच्या बोलण्यात खूपच नम्रता आणि शिष्टाचार जाणवला.

“आयला, ह्याला तर हिन्दी येते.” पल्लवी पुटपुटली. दोघी एकमेकाच तोंड पाहू लागल्या.

“अच्कुल्ली, मै यहा मेरे दोस्तोंके के साथ किसिकी खोज मे आया था । हम पांच जण थे । फ्लाइट से उतरके हमने हॉटेल केलीये टॅक्सी ली । पर बीच मे किसी जगह ट्रॅफिक मे फस गये । उसी वक्त मैने उस लडकी को देखा, जिसकी खोज मे हम यहा आये थे । मै टॅक्सीसे उतर गया और उसके पिछे भागा । बाकी सब ट्रॅफिक जॅम होणे की वजह से उतर नही पाये । मैने उनको मोबाइल पे कॉल करणे को कहा और वो सब शायद आगे चले गये । मैने उस लडकी का बहोत पिछा किया पर वो निकल गयी । उसी दौरान मै सडक पर गिर गया और मुझे चोट आयी । मेरा पॉकेट और मोबाइल दोनो जेब से गिर गये और तभी कोई चोर उसे उठाके भाग गया । मै यहा बिलकुल नया हूं, मुझे यहा कुछ भी पता नही है । मुझे कुछ समझ नही आ रहा है मैं क्या करू ? मुझे बहोत डर लग रहा है ।” प्रिन्स रडू लागला.

“सुनो तुम प्लीज रो मत, क्या तुम्हे अपने दोस्तोके नंबर भी याद नही है ।” आशा सहानुभूती देत म्हणाली.

“नो !! मुझे कुछ याद नही आ राहा है ।” प्रिन्सने नकारार्थी मान हलवली.

“तुम्हारे घर का नंबर?” पल्लवीने प्रश्न केला.

“नो, वो भी याद नही ।” परत एकदा नकार दिला.

“तो यहापे तुम्हारे फ्रेंडस कहा रुके है वो तो पता होगा ना?” पल्लवीच्या आईने प्रश्न केला.

“नही, हम सब साथ थे तो पुछाही नही ।” प्रिन्सचा चेहरा उतरला.

“ये तो लापरवाही है । ऐसा कैसे कर सकते हो तुमलोग ?” पल्लवीने त्याला दम भरला.

“मतलब लापर... वो क्या है?” प्रिन्स गोंधळला.

“अम्म, लापरवाही मतलब ? SSSSS” आशा शब्द शोधू लागली. “हा, इररिसपोंसिब्लीटी.”

“ओके, अच्कुली मेरा दोस्त निक, उसका ब्रेकअप होके एक साल हो गया । फिर भी वो उस लडकीसे आज भी प्यार करता है । उससे एक बार मिलके बात करना चाहता है । इसलीये उसकी खबर मिलतेही वहा निकल पडता है । ये सब इतना घाई घाई मे हुवा की हमे कुछ जानणे का मौका ही नही मिला ।”

“इसलीये तुम लोग स्वीडन से इंडिया आये । बापरे...! भारी हो तुम लोग ।” पल्लवीला त्याच्या मित्राच भारीच कौतुक वाटलं. ह्या एवढया आधुनिक जमान्यात असं कोण प्रेम करत?  

“तो तुम्हे रिटर्न कब जाणा है??” पल्लवीने प्रश्न केला.

“ट्वेन्टी को मेरी रिटर्न फ्लाइट है ।”

“ओके! अब मै समझी, इसका मतलब तुम्हे सिर्फ पंधरा दिन के लिये खाणे और रहने के लिये घर चाहीये ।” आशा म्हणाली.

“हम्म!” प्रिन्सने निराश मनाने होकारार्थी मान हलवली.

आशाने दीर्घ श्वास घेतला. काहीतरी विचार करत “काकु, पल्लवी जरा माझ्यासोबत येता का??” तिने दोघांना बाजूला येण्याचा इशारा केला.

तिघीही तिथून उठून बाजूला आल्या.

“काय वाटत आशा तुला तो खर बोलतोय??” जाधव काकींनी प्रश्न केला.

“हो...!” पल्लवी आणि आशा दोघी एकसाथ म्हणाल्या. 

“आम्ही पाहिलीय त्याची टिकिट...” आशा म्हणाली.

 “पण प्रश्न हा आहे की ह्याला ठेवायचं कोणाच्या घरी??” पल्लवी विचार करू लागली.

“आपल्या घरी नेलं तर तुझा बाप दारुडा, उगीच ह्याला मारहाण करायचा... आधीच खाण्याचे वांदे त्यात घरही छोटं…” जाधव काकी वैतागून म्हणाल्या.

“काकु, तुम्ही नका उगीच त्रास करून घेवू, मी नेईन त्याला माझ्या घरी. आई आणि विजू थोडा रागवेल पण, मी समजावेन त्यांना...” आशाने काकींच्या खांदयावर हात ठेवला.

“बर! काही मदत लागली तर सांग मला. मी करेन, जशी जमेल तशी...” काकी खूप खुश झाल्या.

“बरं!! चला, तो वाट पाहत असेल...”

तिघिही परत त्याच्याजवळ आल्या.

“तुम मेरे घर पे रहोगे? पर, मेरा घर बहोत छोटा है । क्या तुम्हे अॅडजस्ट होगा??” आशाने प्रश्न केला.

“डेफिनेटली...” प्रिन्स खुश झाला. “सिर्फ पंधरा दिन की बात है। मैं कही पर भी रेह लूँगा ।” 

“देखो हम इतने अमीर नही है की तुम्हे पैसे देके हॉटेल मे रूम दिला दे । पर हमसे जो होगा वो कर सकते है ।” आशाने समजावलं.  

“और अपने आपको बिलकुल अकेले मत समझना । हम सब तुम्हारे साथ है ।” पल्लवीने दिलासा दिला. 

“थॅंक्स गाईझ !!” प्रिन्सला गदगदुन आल.

“तो चले...” आशाने प्रिन्सला स्माइल देत इशारा केला.

प्रिन्सचा गुडघा खूप दुखत होता. उठण्या- बसण्यास आता जरा जास्तच त्रास होत होता. तरी तो टेबलाच्या आधाराने उभा राहिला. लंगडत लंगडत चालू लागला. आशाला दया आली. तिने त्याच्या हात स्वत:च्या गळ्यात टाकला.

“थॅंक्स !!” प्रिन्स मधाळ हसला. 

“काकु पल्लू, मी निघते...”

आशा आणि प्रिन्स दोघे घरी जाण्यास निघाले.

****

रात्रीचे ९ वाजले होते. आकाशातील चांदण्यांचा लख्ख प्रकाश पडला होता पण रस्त्यावरच्या दिव्याच्या खांब्यापुढे त्याची गरज भासत नव्हती. दोघे कॉलनीत पोहोचले. मोकळं मैदान आणि समोरच एक चार माळ्याची चाळीची लांबलचक इमारत. मागे छोटया छोटया गल्ल्यामध्ये इमारतींची दाटी लागली होती. एखादी चारचाकी जावू शकेल एवढीच काय ती जागा त्या आडव्या तिडव्या इमारतींमध्ये उरली होती. बाहेर सुकण्यासाठी लटकत असलेल्या कपड्यांवरून तिथल्या लोकसंखेचा अंदाज येत होता. मध्येच कुठे कुठे कुंडयामधील रोपटी झूला झुलत होती. अजूनही येणार्‍या जाणार्‍यांची रहदारी चालूच होती. मेनगेटने दोघे आत शिरले. खालच्या मजल्याच्या चार पाच पायर्‍या चढून उजव्या बाजूच्या तिसर्‍या खोलीकडे थबकले. प्रिन्सचा खांदयातील हात सोडवत त्याला तिथेच थांबण्याचा इशारा करत चप्पल काढून ती आत शिरली. आईला आवाज देत किचनमध्ये आली.

“आई ए आई !!”

“आलीस तु, जा जावून पकटन हात पाय धुवून घे. जेवून घेवूया, मी विजुला आवाज देते.” आई भांडी घासत म्हणाली.

“आई, बाहेर चल ना तुला काही दाखवायचं आहे.” तिने हात पकडून ओढत तिला बाहेर आणल.

“अग, काय झाल सांगशील का??” आईने दारावर उभ्या असलेल्या प्रिन्सला पाहिलं.

“विजु, जरा बाहेर ये ना.” तिने पार्टिशन खोलीचा दरवाजा ठोकला.

तसा थोड्यावेळाने विजय बाहेर आला.


विजय

“आशु, कोण गं हा राजकुमार?? एवढा देखणा...!!” आशाच्या आईने आवक होवून गालाला हात लावला. “आणि हा बाहेर का उभा आहे?? आत ये बाळा, किती लागलय याला?”

आशाने त्याला हाताने आत येण्याचा इशारा केला. तसा तो आत शिरला. कावरा बावरा प्रिन्स खूपच अवघडुन उभा होता.

“ओह हॅलो, कौन हो भाई??” आशाचा भाऊ त्याला आत येताना पाहून अरेरावी करू लागला.

“ए विजु, बस हा. जास्त आवाज नको तुझा.” आशाच्या एका रागाच्या कटाक्षाने तो शांत झाला.

“तुम बैठो आराम से…” आशाने घाबरलेल्या प्रिंसला बसायला सांगितलं. तो टीव्ही समोर असलेल्या सोफ्यावर हळू हळू पाय सावरत बसला.

“आई, विजु. हा नील मित्तल. स्वीडन वरुन आलाय, आपल्या घरी त्याला पंधरा दिवसांसाठी जागा हवी आहे...” आणि आशाने घडलेली सारी हकीकत दोघांना समजावून सांगितली.

दोघे विचारात पडले. प्रिंस मात्र त्यांना एकटक पाहत होता. त्याला काही कळत नव्हतं. 

“नाही हा आई, असं कस कोना अनोळखी व्यक्तीला घरी ठेवायचं?? विजुने नकारर्थी घंटा वाजवली.

“हो, त्यात आपल्याच खाण्याचे वांदे ह्याला काय देणार??” निराश होवून आईने डोक्याला हात लावला.

“आई मी आहे ना, मी सगळा विचार केलाय अगं! मी ओवर टाइम करीन. आपण करू काहीतरी. फक्त १५ दिवस आई, मी रिटर्न टिकिट पहिली आहे त्याची, तो खर बोलतोय, त्याला गरज आहे गं... प्लीज आई!! प्लीज विजु !! खूप गरजू आहे ग तो.” आशाने तळमळून दोघांना विनंती केली.

आशाच्या चेहर्‍यावरील आर्जवी भाव पाहून दोघांनीही संमती दर्शवली. कारण आशाने कधीच कोणत्या गोष्टीसाठी एवढा हट्ट धरला नव्हता. त्या दोघांना ती कुठल्याच गोष्टीची कधी कमी पडू देत नसे. जेव्हापासून घराचा भार तिने आपल्या खांदयावर घेतला होता तेव्हापासून तिने स्वत:साठी जगणं सोडून दिल होत. आज प्रथमच ती इतक्या हट्टाने काहीतरी मागतं होती आणि तिला नकार देवून नाराज करनं दोघांनाही अशक्य होतं. तिच्या आनंदाची भरती डोळ्यातून वाहू लागली. तिने आपल्या आईला आणि भावाला गच्च मिठी मारली.

“नील, हेय नील !!” आशाने आवाज दिला.

प्रिंसला नील ऐकायची सवय नव्हती. त्याने बेसावधपणे ओकार दिला.

“अहं!! येस!!”

“तुम हमारे साथ रह सकते हो ।” आशा प्रसन्न होवून ओरडली.

“व्हॉट?? रियली!! थॅंक यु गाइझ... थॅंक यु सो मच!!” प्रिंसला भरून आल. तो गदगद होवून हात जोडू लागला. 

“बाय द वे, ये मेरी आई है गायत्री देसाई । मेरा भाई विजय देसाई और मै आशा देसाई.” तिघांनीही त्याला वेलकम केल.

“और तुम्हारे पापा??” प्रिंसने प्रश्न केला.

“मै जब सोला साल की थी तब मेरे पापा गुजर गये ।” तिचा चेहरा पडला.

“ओह, अॅम सॉरी!!” त्याने खेद व्यक्त केला.

“नो, इट्स ओके!!” 

“बर, मी ह्याच्यासाठी थोडासा भात टाकते.” आई किचनमध्ये निघून गेली.

“तुम बाथरूम मे जाके फ्रेश हो जावो. मै कपडे लाती हूं ।” तिने त्याला बाथरूम दाखवला.

“मी माझे कपडे देणार नाही.” विजुने तिरक्या नजरेने आशाला पाहत रुबाबात उत्तर दिल. जणू काही त्याला माहितच होत की दीदी आपल्याचा बळीचा बकरा बनवणार आहे.

“तू काय, तुझा बाप पण देईल.” आणि आशाने टीव्हीच्या खाली असलेल्या कपाटातून भराभर सगळे कपडे बाहेर ओढले.

“दीदी नो... नो...!! मी देणार नाही... नो.... माझ्या कपाटाला हात लावायचा नाही...” विजुने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. टॉवेल, शर्ट, पॅंट सर्व गोळा करून तिने बाथरूमच्या दरवाजाला लटकवले आणि दरवाजा ठोकून प्रिन्सला घेण्यासाठी आवाज दिला. 

“आणि हो, ती रूमही आजपासून त्याचीच असेल.” बाहेर येवून सर्व कपडे परत कपाटात लावत तिने विजयला झटकाच दिला.

“काय? दीदी, हे रॉन्ग आहे. माझा अभ्यास??” विजू ने एवढस तोंड करून आशाला पाहिलं.

“राहू दे, इतक्या वर्षात दिवे नाय लागले ते पंधरा दिवसात शक्य तरी आहे का ??”.

“दीदी, पुढच्या वर्षी माझी बारावी आहे...!”

“आधी ह्या वर्षी पास तर हो मग बारावीला जाशील ना...”

 “आई, तू दिदीला काहीच बोलणार नाही आहेस का??” चिडून त्याने जेवण वाढण्यात मग्न असलेल्या आईला चुगली केली.

“अरे विजू फक्त पंधरा दिवस ना बाळा... बरं, ही ताट बाहेर मांडून घे बघू...”

“म्हणून, म्हणून हे असे गोरे लोक येतात आणि आपल्यावर राज्य करून जातात...” पाय आपटत विजू किचनमध्ये गेला. एवढयात कूकरने ही शिट्टी दिली. “बघितलं त्या कूकरला कळल, पण तुम्हाला नाही कळणार ते ...” आणि मग एक एक ताट आणून बाहेर मांडू लागला.

एवढ्यात प्रिन्स ओल्या केसांवर टॉवेल फिरवत बाहेर आला. ब्ल्यु टी शर्ट आणि व्हाइट शॉर्ट्स मध्ये तो खूपच हॅंडसम दिसत होता. त्यात त्याची गुलाबी स्माइल सर्वांनाच मोहित करायची. आशा तर क्षणभर त्याला पाहतच राहिली. 

“अरे, तुम्हे तो विजू के कपडे एकदम बराबर बैठ रहे है ।” आईने आश्चर्याने तोंडावर हात घेतला. आशाही त्याला पाहून खुश झाली.

“आओ चलो खाना खाते है ।” आशाने त्याला बसायला सांगितलं.

“थांब, मी टेबलवर जेवण देते. खाली बसता येणार नाही त्याला.” आईने त्याला एका टेबलावरती जेवण वाढलं.

प्रिन्स हळूच पाय सांभाळून जेवायला बसला. ताटात आमटी भात दिसत होता. भात फोडून त्याने आमटी भातावर पेरली. तो प्रथमच अश्या जेवणाचा आस्वाद घेत होता. आशा मात्र ताटावर बसून त्यालाच निरखून पाहत होती. जेवण आवडेल की नाही याची तिला धास्ती लागली होती.

एक घास तोंडात टाकताच त्याचा चेहरा फुलून निघाला.

“वॉव, इट्स सो डीलीशीयस!! ऐसी टेस्ट पुरे दुनिया मे नही मिलेगी ।”

आशा आणि आईचा चेहरा उजळला. विजुने मात्र तोंड वाकड केल. "आयत मिळालं की सगळंच भारी वाटतंय."

आईने त्याच्या मांडीला चापट मारत जेवण्याचा इशारा केला.

“बेटा, तुम्हारे मा बाप क्या करते है?” आईने एक घास तोंडात टाकत प्रश्न केला.

या प्रश्नाने प्रिन्स थोडासा बैचेन झाला. काय उत्तर द्यावं हेच त्याला सुचेना. ही माणस खूप चांगली आहेत. यांना फसवण योग्य नव्हे. म्हणून तो खरं सांगणारच होता की अचानक त्याला निकचे शब्द आठवले, “ प्रिन्स, कभी भी पराये लोगोंको अपनी असली पेहचान मत बताना, तुम अमीर बाप के बेटे हो इसका कोई भी फायदा उठा सकता है । शायद तुम्हारी जान को भी खतरा हो सकता है । जब तक किसीपे पुरा भरोसा ना हो तब तक अपनी असलीयत मत बताना ।” त्याच्या भल्यासाठी निक ने त्याला ताकीद देवून ठेवली होती. कारण खुप वेळा स्वीडनमध्ये त्याच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला होता. मरणाच्या दारातून तो परत आला होता. भानावर येवून त्याने एक नजर आशावर टाकली ती त्यालाच पाहत होती.

“मेरे मॉम डॅड एक मिडल क्लास फॅमिली से है । पापा नौकरी करते है और मॉम बूक स्टोअर चलाती है ।”

“और तुम्हे भाई बहण ??” आईने प्रश्न केला.

“मै अकेला हूं ।” अक्चुली, मेरा दोस्त निक ऊसकी गर्लफ्रेंड इंडिया मे है, हम उसे खोजणे निकले थे ।”

“अच्छा ।”

एव्हाना चौघांचीही जेवण आटोपली होती. सर्व आवराआवर करून आशाने बिछाना टाकला. विजू टीव्ही पाहत हॉलमध्ये बसला होता. तिने प्रिन्सला आतल्या रूममध्ये झोपायला जागा केली. त्या तीन बाय सातच्या छोट्याश्या रूममध्ये एक माणूस झोपेल एवढाच छोटासा बेड होता. तिने बेडशीट बदलली, उशी ठेवली, वॉलला असलेला फॅन चालू केला, भिंतीला जोडलेल अभ्यासाचं फोल्डिंग टेबल बंद करून इकडे तिकडे पडलेली पुस्तक आवरून त्याच्यावरतीच असलेल्या कपाटात एकावर एक मांडली. प्रिन्सला आत बोलावून रूम दाखवली. 

“आजसे तुम यहा सोओगे ।”

“नो, प्लीज!! मुझे कोई स्पेशल ट्रीटमेंट देणे की जरूरत नाही है आशा । मैं सोफ़े पे भी सो सकता हूँ ।”

“आय नो, पर मै जितना तुम्हारे लिये कर सकती हूं उतना करणे की कोशिश जरूर करूंगी ।”

“पर, इसकी कोई जरूरत नही है आशा ।”

“ जरूरत है ।”

त्याने नाइलाजाने मान हलवली. “थॅंक्स आशा मुझे हेल्प करने के लिए । मैं तुम्हारा ये एहसान कभी नही भुलुंगा । वैसे तो मैं गॉड को नहीं मानता, पर तुम किसी गॉड से कम नही हो मेरे लिए । मेरा तुम्हारे साथ चलने का डिसीजन राइट था।”

त्याच्या ह्या वाक्याने आशाचा चेहरा उजळला. ती लाजुन गोड हसली. एखादयाला मदत केल्यावर त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून आपल्याला एक वेगळच समाधान मिळत. तस तिला वाटत होत.

"अब सो जावो." आशाने रूममधून बाहेर येवून सरकता दरवाजा बंद केला.


प्रिन्सने एकवार रूमवर नजर फिरवली. इतकी वर्ष त्याच्या त्या नऊ हजार चौरस फूटाच्या घरात जो आनंद मिळाला नव्हता तो ह्या हाताने मोजण्या इतक्या जागेच्या घरात लाभला होता. अधून मधून रंग गेलेली, चिरा पडलेली भिंत, पायाखाली सिमेंट भरून त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या लादयांचे छोटे छोटे तुकडे वापरुन चिटकवलेली फारशी, अधे मधे ते तुकडे निघालेही होते. सूर्यप्रकाश यावा म्हणून एक छोटीशी खिडकी तिलाही नुसत्या लाकडाच्या पट्ट्या अडकवलेल्या, यावरून ते खूप जुण बांधकाम असल्याचं दिसत होत. त्यातच भिंतीत रोवलेल फ्लोडिंगचं एक अभ्यासासाठी टेबल, बरोबरवरती छोटसं पुस्तक ठेवण्यासाठी रचलेल लाकडी कपाट, अगदी बाजुला हॅन्गरला बरेचसे कपडे लटकलेले, अचानक त्याची नजर एके ठिकाणी थांबली. आशाचे, विजयचे खूप सारे फोटो बेडच्या वर लाकडी भिंतीला मध्यभागी चिकटवलेले दिसले. कुतूहल म्हणून तो पुढे सरकला. बेडच्या बाजुला एक माणुस उभा राहिलं एवढी जागा होती त्यातून आत शिरला. झपझप फोटो वरुन नजर पुढे सरकू लागली. विजयचे आणि आशाचे बालपणापासून ते अगदी आतापर्यन्तचे सर्व फोटो त्यावर लावलेले होते. त्याची नजर आशाच्या एका सुंदर फोटो वर खिळली. एका वेलीला पकडुन तिने एक गोड स्मित करत पोझ केली होती. डोळ्याला काजळ, ओठाला लिपस्टिक, कानात झुमके, डोक्याला टिकली अश्या दक्षिणी लोकांच्या स्कर्ट टॉप मध्ये ती फारच वेगळी दिसत होती. प्रिन्स क्षणभर तिथेच खिळून राहिला.          आशा बाहेर येताच आईने तिच्या हातात प्रिन्सच्या पायाला लावायला हळदीचा लेप ठेवला आणि मग विजयच्या डोक्याला तेल चोळु लागली.

“थॅंक्स आई!! मी विसरलीच होती.”

आई गोड हसली. आशाने परत एकदा दरवाजा उघडला. नील अजुनही तसाच त्या फोटोला पाहण्यात दंग होता. आशाच्या चाहुलीने तो भानावर आला.

“तुम सोए नही ?”

“नही, तुम्हे ही देख रहा था ।” त्याने फोटोकडे हात केला.

“ओह, ये मेरी सोसायटी के फंक्शन की फोटो है । छव्बीस जानवरी को हमारे यहा बहोत सारे प्रोग्राम रहते है । तो मैंने भी ग्रुपडांस मे हिस्सा लिया था । उस वक्त शिवा ने निकाला था ।”  

“ओह…! वेरी नाइस...!! तुम्हें डान्स आता है ?”

“अरे नहीं, वो तो कोई सिखायेगा तो कर लेती हूँ ।”

“ओह !! बाय द वे, यू लूक्स मार्वलस...!! द बिन्दी अँड द कॉस्टूम.... इट्स सो प्रीटी...”

ती स्वत:शीच लाजली.

“थॅंक्स...!”

“सॉरी, अगर मैंने कुछ जादा बोल दिया हो तो । मै बहोत स्ट्रेट फॉरवर्ड हूं । यु नो, जो अच्छा लगता है वो मुँह पे बोलता हूँ और जो बुरा लगता है उसे दिल मे रखता हूँ ।” 

“ओह...!!” ती गोड हसली.

“ये तुम्हारे हाथ मे क्या है ?”

“अरे हा, मै तो भूल ही गयी । तुम बैठो यहा ।”

तो थोडासा गोंधळला. तरीही ती काय करणार हे पाहाण्यासाठी उत्सुकतेने बेडवर बसला. लगेचच ती खाली बसली. वाटीतला लेप थोडासा बोटावर घेवुन ती त्याच्या पायावर फिरवणार एवढ्यात, 

“अरे, अरे, ये क्या कर रही हो??” तो झटकन उठून उभा राहिला.

“इससे तुम्हारा दर्द कम होगा और घाव कल तक भर जायेगा ।” 

“उम, ठीक है तो मै खुद करता हूँ । तुम जाके सो जाओ ।” त्याला तिच्या त्या वागण्याने फारच संकोचल्यासारख झाल.

“तुमसे नहीं होगा तुम बैठो । मैं करती हूँ ।”

काहीसा विचार करून मान हलवत तो बेडवर बसला. तस तिने परत एकदा लेप लावायला सुरुवात केली.

लेप जखमेवर बसताच प्रिन्सला नाचता भुई थोडी झाली. त्याचा पाय ठणकू लागला. आकाशातील सगळे तारे त्याच्या डोळ्यासमोर नाचू लागले. न राहवून त्याने आशाचा हात पकडला. अचानक झालेल्या त्याच्या स्पर्शाने काही क्षण ती स्तब्द झाली. असह्य कळांसोबत त्याची पकड घट्ट घट्ट होत जावू लागली. तिच्या हृदयाचे ढोके वाढू लागले. डोळे बंद करून “नो आशा इट्स हर्टिंग” म्हणणार्‍या प्रिन्सकडे ती एकटक केविलवाण्या नजरेने पाहत राहीली. ती त्याला प्रथमच एवढया जवळून पाहत होती. गोराचिट्टा पातळ चेहरा, गुलाबी ओठ, नाजुक नाक, छोटी बारीक दाढी, कोरीव भुवया, सुंदर सळसळीत केस, एकंदरीत त्याचा तो देखणा चेहरा तिच्या हृदयाला हिंदोले देत होता. आशाचे हात थांबलेले जाणवून प्रिन्सने डोळे उघडले. ती त्यालाच पाहण्यात दंग होती हे त्याच्या लक्षात आल. त्याने डोळे उघडले आहेत हे पाहून ती सावध झाली. नजर चोरत पायाला पट्टी बांधायला सुरुवात केली. तसा तो स्वत:शीच गोड हसला. फॅनच्या हवेसोबत उडणारे तिचे केस आणि निरागस चेहरा यावर त्याचीही नजर आपोआपच स्थिरावली. पट्टी बांधून झाल्यावर तिने त्याच्याकडे एक नजर टाकली. “हो गया” याअर्थी मान हलवून गोड हसली. तो ही मधाळ हसला. त्याच हसणं कोणालाही सहज मोहित करेल एवढं प्रेमळ होत. मग ती त्यातून कशी सुटणार होती? तिने त्याच्या हातालाही लेप लावला. 

“अब तुम सो जावो, कल आराम से उठना... ओके!! बहोत थक गये हो ।”

“ओके!! थॅंक्स फॉर एव्रिथिंग... अँड यु आर सो प्रिटी...”

ती लाजून गोड हसली. “कुछ जरूरत पडे तो आवाज देना ।”

“ठीक है ! गुड नाइट !”

“हम्म, गुड नाइट !” आशा वाटी हातात घेवून बाहेर आली आणि दरवाजा बंद केला.

हॉलमध्ये तिघेही सर्व आवरून झोपी गेले.

****

      

      सकाळचे दहा वाजले. प्रिन्स अजूनही झोपला होता. सूर्याची कार्टी प्रभा, देखील त्याचा देखणा चेहरा पाहाण्यास लिलाईत झाली होती. आशाच्या घरी कोण आलाय हे पाहण्यासाठी वाकून वाकून खिडकीतून डोकावत होती? त्याच्या चेहरा दिसताच स्वत:शीच लाजून झाडाआड दडत होती. तो काही केल्या उठत नाही म्हणून मग अगदी आपलं लक्ख तेज त्याच्या डोळ्यावर सोडत खिडकीच्या समोरच धीटपणे येवून उभी राहिली. शेवटी त्याला उठवण्यात तिला यश आलेच. बिचारा डोळे चोळत बिछान्यातून उठला. मन लावून त्याला पाहून घेवून ती मात्र पुढे सरकली. त्याने आपला मोठा आळस देत दरवाजा उघडला आणि समोरील दृश्य पाहून तो चकीतच झाला. चाळीतील सात – आठ मुली त्याला पाहायला जमा झाल्या होत्या. त्यात पल्लवीपण होती. तो दिसताच सर्वजणी त्याला आवासून पाहतच राहिल्या. तो भयंकर हॉट दिसत होता. पांढर्‍या शुभ्र बनियानमध्ये हातचे बायसेप्स उठून दिसत होते. त्याच्या झोपाळलेला चेहर्‍यात आणि विस्कटलेल्या केसातही त्याचं हसणं घायाळ करणार होतं. तोंडावर उसन हसू आणत अवघडून तो बाहेर आला. सर्वांवर एक नजर फिरवली आणि पल्लवी वर थांबवत हाताची दोन बोट आणि भुवया किंचित उंचावून गोड स्माइल करत हाय चा इशारा केला. पल्लवीच्या मनात तरंग उठले. खुश होवून आपली बत्तीशी दाखवत तिने मोठा हाय केला.

“हाSSSSSय, कैसे हो नील??” पैर ठीक है ना ।” पल्लवी उत्साहित होवून म्हणाली.

“हा, बेटर है । थॅंक्स फॉर येस्टरडे ।”

“वेलकम...।”

एवढया मुलीमध्ये त्याने आपल्याला मान दिला याने तिची कॉलर जरा टाईट झाली.

त्यांच्या मधून अवघडुन बाहेर निघत तो किचनमध्ये शिरला. आशाची आई त्याच्यासाठीच नाष्टा बनवत होती.

“गुड मॉर्निंग आँटी !!”

बाथरूम जवळ असलेल्या बेसिनमध्ये त्याने तोंड धुतले.

“अरे, उठ गया बेटा । निंद अच्छी आयी ना??”

“हा आँटी!! आशा और विजू नजर नही आ रहे है??” त्याची नजर फक्त आशाला शोधत होती. 

“विजू कॉलेज गया है और आशा यही मंदीर गयी है और साथ मे बाजू की बिल्डिंग मे, काम भी करके आयेगी ।”

“काम?? क्या काम ??” 

“ये लो ।” आईने नवीन ब्रश आणि टुथपेस्ट त्याच्या हातात दिला. “अरे वो बाजुके टिफिन सेंटर मे चपाती बेलने गयी है ।”

“अच्छा, कब तक आयेगी??” टुथपेस्ट ब्रशवर ओढत त्याने दात घासायला सुरुवात केली.

“अभी आ जाएगी, तुम्हारा पैर ठीक है ना ??”

“हा, अभी थोडा दर्द कम है । वैसे बाहर इतनी सारी लड़कियाँ क्यु है ??”

“वो सब तुमसे मिलने आयी है ।” आई खुदकन हसली.

“क्यु?” आवक होवून त्याने डोळे मोठे केले. “मैं क्या कोई एलियन हूं ??”

“अरे ये पल्लवी ने पुरे मोहोल्ले को जमा किया है । देखो, नाराज मत करो उन्हे! जाके दो चार बाते कर लो । कुछ पुछना चाहती होगी तुमसे? जाओ बैठो, मै चाय लेके आती हूं ।” तिने चहा कपात गाळला. 


त्याने नाखुष होवून मान हलवली. तोंड धुवून तो बाहेर सोफ्यावर येवून बसला. तसा सगळ्या मुलींनी त्याच्या पायाखाली घोळका केला. त्यांची आपसात कुजबूज चालू होती. “आयला कसला हॅंडसम आहे ना हा...!! किती भारी दिसतो…!! आणि स्माइल पण किलर आहे यार…!! बॉलीवुडचे हीरो पण फिके आहेत याच्यासमोर....” प्रिन्सला फारच अवघडल्यासारख झालं होतं. तो बसताच सर्वांनी एक एक प्रश्न विचारायला सुरुवात केली. 

“तुम स्वीडन से आये हो ??” - एक मुलगी

“हम्म...!!” प्रिंसने दरवाजात पाहिल.

“तो वहा इंडियन भी है ??” - दुसरी

“हम्म...!!”

एवढ्यात लगबगीने आशा आली. ती त्याच्यासाठीच पळत पळत आली होती. कामावरपण तिने आज नीलसाठी दांडी मारली होती. आत जाण्याआधी आतला नजारा पहावा म्हणून बाहेरच थबकली. तिला अवघडलेला प्रिन्स, मुलींच्या प्रश्नाची उत्तर देताना दिसला. गालातल्या गालात हसत ती आतल्या दृश्याचा आनंद घेत थोडा वेळ तिथेच घुटमळली.

“तुम कहा तक पढे हो ??” - तिसरी

आईने चहा आणि उपमा आणून त्याच्या हातात दिला.

“एमबीए फ्रॉम ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी, इंग्लंड….” आईला स्माइल देत त्याने एक चमचा उपमा तोंडात टाकला. 

“आयला, तुम ऑक्सफोर्ड से पढे हो ।।” पल्लवी आश्चर्यचकीत झाली.

आशालाही नवल वाटलं.

“हम्म...!!” प्रिन्सने दरवाजात पाहिल.

आशाला पाहण्यासाठी त्याचे डोळे तडफडत होते. तो अधून मधून दरवाजकडे पाहत होता.

“इसका मतलब तुमने इंग्लंड भी देखा होगा??” - चौथी 

“हम्म...!”

“और क्या क्या देखा है??” – पाचवी.

“अमेरिका, कॅनडा, लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क, फ्रांस, जपान, स्वीझर्लंड अम्... बहोत कुछ ।” उपमा खात प्रिन्स म्हणाला.  

नकळत सर्वांच्या तोंडून “बापरे” हा शब्द निघून गेला. आशाही थक्क झाली.  

“और तुम करते क्या हो??” – सहावी मुलगी

“अम् ... कुछ नही । अभी तक बेकार हूं ।” स्माइल देत त्याने चहाचा घोट घेतला.

सगळ्या जणी खुदूखुदू हसल्या.  

आशाला त्याचा नम्र स्वभाव खूपच भावला. त्याच्या बोलण्यात कुठेच मोठेपणा नव्हता. विशेष म्हणजे कोणाला आकर्षित करण्याचा प्रयत्न सुद्धा नव्हता. याउलट किती कमी बोलता येईल याच प्रयत्नात वेळ घालवत बापड्या सारखा बसला होता. नील आपलीच वाट पाहतोय हे जाणून चप्पल काढून ती आत शिरली.

प्रिन्सचे डोळे तिलाच शोधत होते. हिरमुसलेला त्याचा चेहरा गुलाबाप्रमाणे खुलून उठला. एवढा वेळ तहानलेल्या मनाला तिला पाहून एक वेगळीच तृप्तता मिळाली. कालच्या पेक्षा आज ती खूपच वेगळी दिसत होती. क्लचरमध्ये अडकवलेले केस, तिच्या स्पर्शला आसुसलेली चेहर्‍यावर रूळणारी एक बट, डोक्याला पिवळी टिकली, हातात फुलांची परडी आणि अंगात निळ्या रंगाची घागरा चोळी तिला जरा जास्तच उठून दिसत होती.

“चोट कैसी है??” आशाने हलकेच केसाची बट कानमागे टाकली.

“अब दर्द थोडा कम है ।” प्रिन्सने प्रसन्न होवून उत्तर दिल.

आशा त्याच्या हातातील रिकामा कप आणि प्लेट घेण्यासाठी जवळ आली.

“और तुम्हारी कोई गर्लफ्रेंड ??” पल्लवीने मध्येच प्रश्न केला.

ह्या प्रश्नाचं उत्तर फक्त आशासाठीच आहे या आविर्भावात त्याने तिच्यावर नजर टाकली. आशाही त्या प्रश्नचं उत्तर ऐकण्यास उत्सुक होवून नजर रोखून त्याला पाहू लागली.

“नही, अभितक तो कोई नही ।” तिच्या रोखलेल्या नजरेला उत्तर देत त्याने कप आणि प्लेट तिच्या हातात ठेवली. 

“क्यु...??” आशाला नवल वाटलं.

“कोई मुझे समझे ऐसा मिलाही नही ।” प्रिन्सने त्याच दुख: व्यक्त केल.

आशा उसन हसू आणत मान हलवीत किचनमध्ये निघून गेली. आईने तिच्या हातात चहाचा कप दिला. तो घेवून ती बाहेर आली आणि जमिनीवर एका कोपर्‍यात टेकून बसली. प्रिन्सने तिला “प्लीज सेव मी” या नजरेने इशारा केला. तिनेही त्याला डोळ्याची पापणी हलवून “मी करते काहीतरी” असा इशारा दिला.

“कुछ भी, इतने हॅंडसम हो और कोई गर्लफ्रेंड नही, हो ही नही सकता । हम नही मानते ।” त्यातली एक जण म्हणाली.

“हा यार...! कोई फर्स्ट लव भी नही ?” लगेचच दुसरीने उचलून धरलं.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance