STORYMIRROR

Prashant Shinde

Action Inspirational

3  

Prashant Shinde

Action Inspirational

छत्रपती संभाजी राजे...

छत्रपती संभाजी राजे...

1 min
411

8...आवडते ऐतिहासिक व्यक्तिमत्व....

छत्रपती संभाजी राजे...


ऐतिहासिक व्यक्तिमत्वावर चार ओळी लिहायच्या

म्हणते तर इतिहास जमा झालेले सर्वच डोळ्यासमोर उभे राहतात. काही इतिहास घडवतात,काहींच्या मुळे इतिहास घडतो. काही विचारांनी आचारांनी तर काही कृतींनी स्मरणात राहतात.काहींच्या मुळे आपण घडतो. त्यामुळे आवडते व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्या जीवनाचा माझ्या जीवनावर प्रभाव पडला आणि माझे जीवन घडले ते व्यक्तिमत्व म्हणजे संभाजी राजे. आता तुम्ही म्हणाल का..?त्याचे कारण ही तसेच आहे कारण संभाजी राजे हे एक सर्वर्थांनी परिपूर्ण सर्वगुण संपन्न असे व्यक्तिमत्व होते यात तिळमात्रही शंका नाही.


सं ग ज्यासी ज्याचा लागला

भा ग्य त्याचे फळफळले समजा

जी का शिदोरी लाभली तीच

रा ज्य जन्मभर करते नक्की

जे चांगले ते हेच मनी उमजा...


अवगुणाचा लवलेशही जिथे नाही ते संभाजी राजे म्हणून मला प्रिय...


Rate this content
Log in

Similar marathi story from Action