Sandhya Kadam

Tragedy Inspirational

5.0  

Sandhya Kadam

Tragedy Inspirational

बस कुछ लोगों की फिल्में रिलीज़

बस कुछ लोगों की फिल्में रिलीज़

4 mins
989


"डॉक्टर नेटवर तुमच्या बद्दल वाचून मी तुमच्याकडे आलोय. My case is little different. Doctors wonder how I am alive". एवढं बोलून निहालने माझ्याकडे बघून एक गडगडाटी हास्य  केलं. " मला डॉक्टर विचारतात, अरे तू अजून जिंदा कसा काय ?" 


आपल्या तुटक्या-फुटक्या मराठीमध्ये निहाल उगीच उसनं हसू आणून माझ्याशी संवाद साधत होता गोष्ट. खरंतर हातातले केस पेपर चाळताना माझ्या लक्षात येत होतं की,ही केस खूपच क्रिटिकल आहे. नव्हे हा तर जणू "आनंद" सिनेमाचा रिमेक आहे. 


हो अगदी दुसरा आनंदच. उंच आणि बारीक शरीर. तोच दिलखुलास, हसरा स्वभाव, तोच sense of humor, तसाच त्याचा चाललेला आटापिटा " all is well " आहे हे दाखवण्यासाठी. पण तरीही सिनेमातल्या आनंद पेक्षा कैक पटीने उजवा !! कारण निहालकडे असलेली असामान्य इच्छाशक्ती आणि लढवैया वृत्ती त्याचं वेगळेपण दाखवून देत होती. त्याने कधीच give up केलं नव्हतं. जबरदस्त fighting spirit च्या जोरावरच तो असाध्य आजाराशी लढत होता. त्याच्या बोलण्यातुन त्याच्या विचारांची उंचीही जाणवत होती.


दोघांमध्ये अजून एक मोठा फरक होता. सिनेमातल्या आनंदवर काही जबाबदाऱ्या नव्हत्या. त्याने स्वत:वर त्या येऊही दिल्या नव्हत्या. त्याला जेव्हा वाटेल तेव्हा exit मारायला तो मोकळा होता. पण निहाल वर मात्र त्याच्या संसाराची जबाबदारी होती. शिकणारी दोन लहान मुलं आणि बायको यांचं कसं होणार याची काळजी, त्याने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होती . 


त्याचे केस पेपर मला सांगत होते की निहाल कडे फार जास्त वेळ उरलेला नाही." रिनल सेल कार्सिनोमा " ट्रीट करण्यास अत्यंत कठीण असा कर्करोग. आणि त्याच्याशीच निहाल गेली दोन वर्षे झगडत होता.  


निदान झाले तेव्हाच निहालच्या शरीरामध्ये कर्करोग अस्ताव्यस्त पसरला होता. एवढ्या मोठ्या आजाराशी दोन हात करता करता निहालला आपले अर्धे यकृत, एक किडनी गमवावी लागली होती. त्याच्या मणक्यांमधे ही आजाराने आपले हातपाय पसरले होते. उरलेल्या किडनीमध्ये आणि adrenal gland मध्ये कर्करोगाने आपले अस्तित्व निर्माण केले होते. अगदी inferior vena cava मध्येही रोगाने बस्तान बसवले होते. 


त्याच्याच शब्दांत सांगायचे झालं तर " मी डॉक्टरांसाठी फक्त guinea pig आहे. निरनिराळ्या औषधांचा प्रयोग माझ्यावर चालू असतो. " पुन्हा एकदा एक भयाण हास्य. ह्रदय भेदक.. पण कितीही प्रयत्न केला तरी चेहऱ्यावरून वेदना लपून राहत नव्हत्या. निहाल पेक्षाही त्याच्या बायकोच्या चेहऱ्यावर त्या ठळक पुणे जाणवत होत्या.

पण मी त्या कडे दुर्लक्ष केले आणि मी सुद्धा निहालच्या हास्या मध्ये सामील झाले. त्याच्या गडगडाटी हास्याला मी स्मित हास्याने प्रतिसाद दिला. खरं तर कुठल्याही डॉक्टर साठी ही परिक्षेची वेळ असते. समोर बसलेला रूग्ण किती गंभीर रित्या आजारी आहे आणि हे त्याला जाणवू ही न देणं ही खूप कठीण गोष्ट असते. प्रत्येक पेशंटचा मुड बघून स्वत:ला त्या प्रमाणे mold करून, प्रत्येक वेळी वेगळ्या भूमिकेत डॉक्टरला शिरावं लागतं. इथे स्वतःच्या भावना व्यक्त करण्याची मुभा कधीच मिळत नाही.


रिपोर्ट बघून मला कळत होतं की निहाल ची केस खूपच डिफिकल्ट आहे पण चेहऱ्यावरून ते दाखवून देणेही मला शक्य नव्हते.


निहाल पुढे म्हणाला" डॉक्टर मला माहिती आहे की माझी एक्सपायरी डेट जवळ येत चाललीय. My five year survival rate is low. पण एवढेच करा ना प्लीज.. मला एक तीन चार वर्षाचे extension देता आलें तर बघा ना. तीन-चार वर्षात माझा मोठा मुलगा अठरा वर्षांचा होईल आणि आणि जगात कसं वागावं याची त्याला जाणीव होईल. धाकटा मुलगाही कॉलेजमध्ये जायला लागेल. दोघे मिळून आपल्या आईची काळजी घ्यायला लागतील. मग नंतर माझी exit झाली तरी चालेल. जास्त नाही तीन चार वर्ष मिळाली तरी पुष्कळ".


मी हसले. फक्त एवढंच म्हणाले ," I don't make tall claim. We will try." स्वत:ला थोडे safe ठेवून मी हे म्हणाले. लगेच treatment सुरू झाली. औषध पथ्य आणि पंचकर्म या उपचारांनी त्याच्यामध्ये हळूहळू फरक पडत होता. त्याच्या वेदना थोड्या कमी झाल्या. जिथे चालणे त्याच्यासाठी खूप वेदनादायक होतं, तिथे तो आता हळूहळू आत्मविश्वासाने पावले टाकत होता. धन्वंतरीच पावला म्हणायचं! आणि त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे निहाल ची प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द. जोपर्यंत आपल्या मुलांना व्यवहार ज्ञान कळत नाही तोपर्यंत मला कुठेही जाण्याचा अधिकार नाही असं प्रत्येक भेटीत सांगायचं. 


हळूहळू ट्रीटमेंट करता करता त्या कुटुंबाशी आमचे म्हणजे अगदी माझ्यासकट माझ्या स्टाफचे सुद्धा घरोब्याचे संबंध निर्माण झाले. त्यांच्या प्रत्येक सुख दुःखात आम्ही सहभागी होऊ लागलो. आणि नंतर आमच्या लक्षात आले की त्याच्या या असामान्य इच्छाशक्तीचे कारण त्यांची मुलं आणि त्याला प्रत्येक वेळी साथ देणारी त्याची प्रेमळ बायको हेच आहे. हीच त्याची शक्ती स्थानं ज्यांच्या जोरावर तो दैवाशी लढतोय. हळूहळू दोन वर्ष कशी निघून गेली ते कळलंही नाही. 


आणि अचानक एक दिवस दोन वर्षानंतर निहालला पुन्हा एक विचित्र pain सुरू झालं. पुन्हा तपासण्या. विशेष नवीन असं काही नव्हतं पण मणक्यात आजार थोडा बळावला होता. त्यामुळे मणक्यापासून पायापर्यंत निहालला वेदना जाणवायच्या. यावेळी त्याचे tension त्यांच्या वागण्यात जाणवत होते. पण त्याची विनोद बुद्धी अजूनही शाबूत होती. तो हसून मला म्हणाला " Doctor, don't worry, still my brain is working perfectly and my sense of humor is intact. तुम्ही काळजी करू नका. I will be alright." निहालनेच माझी समजूत काढली.


मी पुन्हा एकदा केसचा नव्याने विचार केला आणि त्याला नव्याने ट्रीटमेंट सुरू केली. यावी पूर्वीपेक्षा कडक पथ्य आणि जास्त extensive पंचकर्म उपचार. पण हे सर्व निहाल नीट जिद्दीने सुरू ठेवलं. सर्वात महत्वाचा होतं ते त्याचं fighting spirit. निहालने हे ठरवलं होतं हार मानायची नाही. हेच killing spirit प्रत्येक वेळी उपयोगी पडायचं. आणि तो प्रत्येक वेळी आपल्या आजारावर मात करायचा. 


आणि यावेळीही तसं झालं. निहालच्या वेदना कमी झाल्या. तो पुन्हा चालू फिरू लागला. पुन्हा एकदा आलेल्या तुफानाला परतवून लावले. एका सिनेमातल्या hero प्रमाणे. पुन्हा एकदा!!

अशा अजून किती तुफानांशी त्यांचा भविष्यात सामना होईल हे माहीत नाही. पण भगवान धन्वंतरी चरणी माझी एकच प्रार्थना आणि मागणे आहे" देवा या सर्व संकटातून तरून जाण्याची ताकद त्याला दे. त्याच्या प्रयत्नांमध्ये त्याला यश दे. कारण माझ्या मते असाध्य आजाराशी हसतमुख राहून चार हात करणारा निहाल हाच खरा हिरो.


असे किती तरी निहाल या सारख्या असाध्य आजाराशी झगडत आहे. खऱ्या आयुष्यातले हेच ते real hero!!


किसी ने क्या खुब कहां है- 

"हर आदमी अपनी जिंदगी में हिरो है,  

बस कुछ लोगों की फिल्में रिलीज़ नहीं होती ।


Rate this content
Log in