Sandhya Kadam

Others Romance

4.8  

Sandhya Kadam

Others Romance

कृष्णमय राधा !!!

कृष्णमय राधा !!!

3 mins
1.6K


तो कृष्ण तिच्या मनातला

आणि ती कृष्णमय राधा !! 

कृष्ण तिच्या मनात, कणांकणांत,

तरीही ती जाणून होती त्याचे कृष्णत्व..

त्याची एक गडद कृष्ण छटा

ज्याने तिचं मन झाकोळून जायचे..

एकदा कृष्णाला ती हलकेच म्हणाली

"कृष्णा तु किती रुक्मिणीचा? किती गोपींचा? आणि किती माझा"?

कृष्णाला अनपेक्षित प्रश्र्न

Googly.. percentage विचारतेय ??

कृष्णाचा silence

आणि impatient राधा...

म्हणाली " बोल ना कृष्णाSS.."


"राधे तसा खरा तर मी रुक्मिणीचा,

पण काय करू?

गोपी येतात स्वेच्छेने रासक्रीडेसाठी.

त्यांनाच धुंद व्हायचं असतं माझ्याबरोबर

आणि मग मी ओढला जातो

तूच सांग ना नदीच्या प्रवाहात झोकून दिल्यावर स्वत:ला

कशा कोरड्या राहणार त्या आणि मीही?

आणि चिंब भिजवल्या शिवाय पाठवत नाही मी ही कोणाला. माहीती आहे ना तुला ..

तु उभी रहा नुसतीच काठावर कृष्णा कृष्णा करत.."

कृष्ण थोडा रागात आला


राधेने रोखून बघितले कृष्णाला, विचारले

" आणि रूक्मिणी?"

कृष्ण हसला " तिचं काय? ती माझी सहधर्मचारिणी. ती मला आवडत नाही म्हणून गोपी नाहीत माझ्या जवळ.

मी त्यांचा असणं ही त्या गोपींची गरज."

राधेचे मन उदास झाले.

खरं तर वाईट वाटलं तिला कृष्णाच्या अशा

Practical आणि manipulative वागण्याचे.

वाटलं विचारावं त्याला " कृष्णा तु असा कसा? निष्ठुर?

पण ती काहीच बोलली नाही.

दुसऱ्याच क्षणी सावरुन स्वत:ला

मान्य केले तिने त्याचे कृष्णत्व पुन्हा एकदा!

हीच त्याची गडद छटा, inevitable,

जी जपली त्याने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर

आयुष्याला नवे वळण देण्यासाठी..


तिचे मुक रुदन जाणवले कृष्णाला..

"राधे??" त्याचे प्रश्नाथर्क संबोधन

तिने होकारार्थी डोलावली मान नकळत,

कदाचित तिला मान्य असल्याचे अनुमोदन देत,

कृष्णाने ताडले आणि पुन्हा तिला छेडले

" काही जणींना व्हायचे असते रुक्मिणी".

खरंतर राधेने उगीच डोळे विस्फारले

" मग? तु काय करतोस?"

राधेच्या गालावर हळुवार हात फिरवून तो म्हणाला

" त्यांना सांगतो ठासून..

भूमिकेत बदल नाही, मी कृष्ण, ती रुक्मिणी आणि तुम्ही गोपीच! आणि नाहीच ऐकलं त्यांनी तर.."

" तर काय कृष्णा?" राधेच्या अधीर प्रश्न आणि त्यावर कृष्णाचे सहज उत्तर

मंद स्मित करत कृष्ण म्हणाला" मी बंद होतो. Full stop!"


राधेचा काळजाचा ठोका चुकला. 

दु:खी राधेला गोपींपेक्षा रुक्मिणीचाच सल अधिक जाणवला.

या सर्व खेळामध्ये तिचा काय दोष?

आणि मी कुठे? 

माहिती होते तिला ती रूक्मिणी नाही. पण फक्त गोपी म्हणून रहाणे तिला अमान्य होतं. 

कृष्ण हवा होता तिला सखा सोबती म्हणून.

डोळ्यात तिच्या असे कृष्णाचेच प्रतिबिंब.. 

तिचे हृदय ही गाई कृष्णधुन. 

तिचा उजळ रंग त्याच्याच विचारांनी होई निळाशार..

तोही तिच्या शिवाय अपुर्ण..

अद्वैत आणि काही तरी अलौकिक नातं..

तिला माहीती होतं..


पण तरीही...

न राहवून तिने कृष्णाला विचारलेच 

" कृष्णा माझे स्थान कोणते? 

तु हवा असतोस मला एकांतात..,

समुद्राच्या लाटा हलकेच पायाला जशा स्पर्शुन जाव्यात ना तसा!

पुन्हा पुन्हा! तु यावंस आणि अपुर्णतेची ओढ लावून जावंस!

तुझा सहवास हवाहवासा पण तरीही limitations येतातच ना रे!

कारण तु जवळ आलास की आठवते रुक्मिणी

आणि भानावर आणते reality..

म्हणून प्रेम आहे पण समर्पण होत नाही.

आणि तु म्हणतोस मी काठावरच उभी रहाते.

मी नाही होऊ शकत गोपी उत्छृखल.

फक्त जाणिव रहाते ती माझ्या कृष्णमय असण्याची"

कृष्णाने राधेला मिठीत घेतले. तिच्या अश्रूंचा अभिषेक झेलत तो म्हणाला

" राधे आज असं काय? "

राधेने स्वत:ला सावरले

" कृष्णा एक सांगू, एवढं करशील? 

जेव्हा नको असेन मी तुला

तेव्हा सांगशील मला..

निघून जाईन मी कायमची 

काहीही न बोलता

नको बंद करुन घेऊ स्वत:ला.

फक्त सांगशील मला.."

कृष्ण कळवळला

" राधे..,"

तिच्या गालावर चे अश्रू त्याने अलगद टिपले. 

तिला हृदयाजवळ घेऊन तो उसासे टाकत म्हणाला 

"असं काहीही कधीच होणार नाही कारण तु मला हवी आहेस कायम. जशी आहेस तशी. "

राधा निश्चिंत झाली आणि कृष्ण हृदयी सामावली.

त्याचेही हृदय म्हणत होते राधा राधा. 

आणि राधेला तिचे स्थान समजले..

ती रुक्मिणी नव्हती पण ती सामान्य गोपीही नव्हती.

ती राधा होती...

कृष्णमय राधा !!!

आणि राधेचा कृष्ण...


Rate this content
Log in