Sandhya Kadam

Others

5.0  

Sandhya Kadam

Others

सखी

सखी

3 mins
830


प्रिय सखी,


तू पाठवलेले पत्र आणि गिफ्ट मिळाले.

पत्र पाठवणं आपला फार पूर्वीपासूनचा आवडीचा छंद! मी लगेच पत्र वाचले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. किती छान आठवणी! एकमेकांना घट्ट धरून ठेवणाऱ्या! 


खरंतर पूर्वीसारखं पोस्टाने पुन्हा एक लखोटा पाठवावा असं मला वाटलं. पण पण माझ्या भावना तुझ्यापर्यंत लगेचच पोहोचाव्यात म्हणून व्हाट्सअप चा पर्याय निवडला.


तुझं पत्र वाचल्यानंतर तुझ्या आठवणीं बरोबरीने मला पण काही गोष्टी आठवल्या. 


कॉलेजमध्ये सर्व आपल्याला बहिणी-बहिणी समजायचे. तुही लहान बहिणीप्रमाणे माझी काळजी घ्यायची आणि माझी चूक असेल तर मला ओरडायचीस. मला चष्मा वापरायला आवडायचा नाही. तु आणि दादा सतत पाठी लागलात म्हणून मी माझ्या पहिल्या contact lenses बनवल्या. आणि जग clearly बघु लागले. 


मी बरेच वेळा (खरं तर बहुतेकदा) डबा आणायचे नाही. माझ्यासाठी तु नेहमी extra चपात्या आणायचीस. आणि डबा न आणल्या बद्दल ओरडायचीस सुद्धा. अर्थात त्यामुळे मला कधी कधी तु बनवलेले नवीन पदार्थ ही मुकाटपणे खावे लागत. आणि मला guinea pig असल्या सारखे वाटे. तुझ्या ते लगेच लक्षात यायचे माझा कसनुसा चेहरा बघून. मग तुझा ओरडा पडायचा" खा गपचूप. मिळतय ते गिळ. नाटकं नकोत". पण खरं सांगू? तु डब्यात आणायची त्या बटाट्याची पिकनिक भाजी आणि खोबरं पापड यांची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय.


अभ्यास करण्यासाठी जेव्हा आपण तुझ्या घरी जायचो, तेव्हा तुझी सर्व कामं आटपल्यावर ( आंघोळ, कचरा, लादि इ.) तु मला उठवायचीस. तुला माहिती होते मला पडल्या पडल्या लगेच झोप लागत नाही. "झोप हं गपचूप आत्ता. नाटकं नकोत" हे वाक्य तुझं ठरलेलं असायचं.


मी कधीही विसरू शकणार नाही एक किंवा आपण ठरवून केस कापायला जाणार होतो आणि मी आले नाही. तु solid रागावली होतीस. " तुझी ही नेहमी ची नाटकं आहेत". पण दादा चे operation आणि त्यानंतर चे complications त्यामुळे मी आले नाही हे कळल्यावर तु सिद्धी विनायकाला नवस बोलली होतीस. तो बरा झाल्यानंतर आपण लगेच हा काय सिद्धिविनायकाला जाऊन तो फेडला होता.


माझ्या डोळ्यात hard contact lense असायच्या. त्यामुळे मी डोळे मिटून रस्ता क्रॉस करायची. तुझी माझी काळजी घेणे,   रस्ता क्रॉस करताना माझा हात धरून क्रॉस करून देणे आणि इतरांनी मला गांधारी चिडवणे हे सर्व आठवतं मला. मला खूप भूक लागायची तेव्हा मला भस्मक झाला म्हणून तुम्ही मला चिडवायचा. आणि एकदा मी खूप रडवेली झाली होती मग तू सगळ्यांना चांगलीच ओरडली होतीस. खरच तु अगदी शेंडे फळाप्रमाणे माझी काळजी घ्यायचीस. 


अभ्यास करताना तुझं आणि माझं ट्यूनिंग खुप छान जमायचं. किती पटापट आपण श्लोक पाठ करायचो, खिडकीकडे बघून! 


आपण दोघीही vernacular medium च्या. तुला आठवतं का? कधी कधी आपल्याला इंग्रजी भाषेत बोलण्याची हुक्कि यायची. इतर मैत्रीणी लगेच आपला उद्धार करायच्या " मोठ्या आल्या" असं म्हणून. पण आपण आपला हट्ट न व प्रयत्न सोडायचो नाही. आणि मग अनेक गमतीजमती घडत असतं. मला खात्री आहे तु आत्ता नक्कीच अस्खलीत इंग्रजी बोलत असशील. 


आपलं पाच जणींच एक वेगळं स्थान होतं, एक वेगळं वलय होतं college मध्ये असताना. सर्व जण चार हात दूर रहायची आपल्या पासून. आपल्या ग्रुपशी मैत्री करण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. पण तुझ्या दऱ्याऱ्यामुळे फारसं कोणी आपल्या वाटेला यायचं नाही.  तुझ्या प्रेमळ धाकात रहाणं मला नेहमी आवडायचं. तसं आत्ताही तुझा अप्रत्यक्ष प्रेमळ धाकात असतोच.


सखे तु म्हणजे खुप साऱ्या गोड आठवणींचा झरा. तुझे पत्र वाचले आणि त्या आठवणीं ना पुन्हा पाझर फुटला. College चे दिवस पुन्हा एकदा नव्याने जगले मी! किती सुंदर दिवस होते ते! फक्त मजा आणि फालतूपणा नाही तर खुप प्रेम आणि आपुलकी होती त्या जगण्यात. नंतर काळाच्या ओघात आपण एकमेकांपासून लांब गेलो तरी ते प्रेम आणि आपुलकी तशीच कायम राहीली. 


तू दिलेलं गिफ्ट हि मला खूप आवडलं. उघडून बघितले तेव्हा घड्याळात पाच वाजले होते आणि सेकंद काटा पुढे पुढे जात होता आणि सांगत होता की गेलेली वेळ पुन्हा येणार नाही. तु तू म्हणालीस ते खरं आहे, गेलेली वेळ पुन्हा येत नाही पण आठवणींना कसलेही बंधन नाही, त्या सारख्या येतात. 


Birthday party मध्ये मला तुम्हा सर्वांची especially तुझी खुप आठवण आली. मी खरच तुला खूप मिस केलं. 


आयुष्य फार unpredictable आहे गं, म्हणूनच लवकरच भेटू पुन्हा. पूर्वीसारखा फालतूपणा, मजा पुन्हा एकदा करू. पुन्हा एकदा college चे दिवस जगु. 

नक्की !!


तुझीच 

मैत्रेयी

 


Rate this content
Log in