nilesh morade

Horror

4.0  

nilesh morade

Horror

भय

भय

3 mins
222


मध्यरात्री ची वेळ

पुस्तक वाचता-वाचता निशा तिच्या सोफ्यावर झोपून गेलेली असते.

तिच्या उजव्या बाजूला बेसीन असते.

तिला तिथं नळ चालू असल्याचा आवाज येतो,ती डोळे किलकिले करून पाहते

तर तिथे

कोणीतरी उभे असते हातात

चाकू घेऊन चाकू ला चाटत असते,

एव्हाना तिचे डोळे अंधाराला सरावतात

तिला दिसून येते कि ती व्यक्ती चाकूला लागलेले रक्त चाटत असते,

त्या व्यक्तीचे डोळे अंधारात चमकतात.

जेव्हा तिला त्या व्यक्तीचा चेहरा स्पष्ट दिसतो,

तेव्हा ती नखशिखांत हादरते

कारण

ती व्यक्ती

दुसरी तिसरी कोणी नसून...

निशाचं असते.

रक्त चाटत असलेली निशा तिच्या कडे पाहून विकृत स्माईल करते

निशा किंचाळून डोळे बंद करते

भयाण शांतता पसरते,

नळाचा आवाजही बंद झालेला असतो.

निशा डोळे खोलून पाहते तर तिथं

कोणीचं नसते

ती मोठा श्वास घेवुन सोडते

हुश्श.... मला भास झाला असेल

असा विचार करतचं असते कि

एक थंडगार हात तिच्या खांद्यावर पडतो

ती मागे वळते तर

कोणीचं नसते,

ती खुप घाबरून जाते आणि बेडरूममध्ये जाते तर....

तर....

तर तिथे....

डोक्यावर पांघरूण कोणीतरी झोपलेले असते.

निशाला घाम फुटतो,हात पाय थरथर कापू लागतात.

मी तर आज घरी एकटीचं आहे,

मम्मी पप्पा तर बाहेरगावी गेले आहेत, मग हे कोण असेल

असा ती विचारणं करत असते कि, तिच्या कानाजवळ

अगदी जवळून आवाज येतो

घाबरलीस का ??

हि हि हि हि हि हि....

निशा म्हणते,

को...को...कोण आहे

अगं कोण आहे काय विचारतेस

मी निशा...

हि...हि...हि...हि...हि...

पुन्हा आवाज येतो

निशा मागे वळून पाहते

पण

पण मागे कोणीचं नसतं.

ती वळून पुन्हा पुढे पाहते तर

बेड वर ही कोणी झोपलेलं नसतं.

निशा लाईटचे स्वीच ऑन - ऑफ करते पण लाईट लागत नाही. ती सावकाश चालत चालत बेड जवळ जाते.

ती बेडरूम वर चौफेर नजर फिरवते पण तिच्या खेरीज बेडरूम मध्ये कोणीही नसते.

अचानक बेड खालून एक सडका हात बाहेर येतो व तिचा

पाय पकडतो, ती मागच्या बाजूला पडते, तो हात तिचा पाय बेडखाली खेचायला पाहतो पण निशा दुसऱ्या पायाने त्या हातावर लात मारते व उठून रूम बाहेर धाव घेते.

तिचा श्वास फुलून आलेला असतो,तिच्याचं श्वासांचा आवाज तिला ऐकू येत असतो.

तिचा घसा कोरडा पडतो पण तिची पाणी पिण्यासाठी किचन मध्ये जाण्याचे धाडस होत नसते.

पण जावे तर लागणारचं ना...

ती हळूहळू सावकाश किचन कडे जाते

अचानक तिला आवाज येतो

निशा बेटा तहान लागली का ?

तो आवाज..

तो आवाज... किचन मधुन येत असतो

जो तिच्या आई चा असतो.

निशा प्रचंढ थरथर कापते.

ती बाहेरून डोकावून आत पाहते

एक बाई आत मध्ये पाठमोरी उभी असते.

अगं अशी वेंधळ्या सारखी काय उभी आहेस, पाणी पितेस ना.

पुन्हा ती बाई मागे न वळताचं बोलते.

निशा धाडस करून म्हणते,

कोण आहेस तु ?

अगं मी तुझी आई,काय झालंय तुला ?

ती बाई जशी मागे वळून निशा कडे पाहते

तिचा चेहरा पांढरा फटक असतो

केस मोकळे सोडलेले,एक विचित्र हसू चेहर्यावर पसरलेले

तिच्या हातात ग्लास असतो

अचानक तिचे हात लांब-लांब होतात व निशा जवळ पोहचतात

घे हे पी असं ती बोलते

त्या ग्लासामध्ये मानवी रक्त असते

निशा किंचाळत जागी होते

ती सोफ्यावरचं असते.

तिचा चेहरा घामाने ओला झालेला असतो.

बापरे काय भयंकर स्वप्न पडले होते...

निशा स्वतः शी चं बोलते व चेहरा

पुसते

हे सर्व ना ह्या भयकथेच्या पुस्तकामुळे झाले,तरीचं आई ओरडत असते, अशा भयकथा रात्री च्या वाचत जाऊ नको

पण मीचं मेली नेहमी तिचं बोलणं

हसण्यावारी घेते.

इतक्यात तिला त्या पुस्तकावरच्या शेवटच्या पानावरची एक टिप्पणी आठवते

"हे पुस्तक वाचू नका...... वाचल्यास जीवाला धोका आहे"

हे आठवताच निशा नखशिखांत शहारते

तिच्या एका पायाला वेदना जाणवतात, ती तो तो पाय बघते तर त्यावर नखाने ओरखडल्याचे निशाण असते.

हे मला कधी लागले, ती स्वतः शी चं पुटपुटते.

निशा आपल्याचं विचार चक्रात अडकलेली असतांना

इतक्यात

एक हात तिच्या खांद्यावर पडतो

ती मागे वळते तर

तिचं मगासची किचन मधली बाई, तिच्या शेजारीच सोफ्यावर बसलेली असते

ती आपल्या घोगर्या आवाजात निशाला बोलते,

बघ बरं......आता तरी माझं म्हणणं

पटतंय ना

हि...हि...हि...हि...हि

आणि तिचे दोन्ही हातांनी निशाचा गळा आवळते

बंगल्या बाहेर निशाची किंचाळी ऐकू येते

आणि त्या भयाण शांततेत विरून ही जाते.

To be continued....


Rate this content
Log in

More marathi story from nilesh morade

Similar marathi story from Horror