nilesh morade

Horror Thriller

4.0  

nilesh morade

Horror Thriller

भय : भाग ~ २

भय : भाग ~ २

12 mins
239


बघ बरं.......आता तरी माझं म्हणणं

पटतंय ना

हि....हि....हि....हि...

आणि तिचे दोन्ही हातांनी निशाचा गळा आवळते

बंगल्या बाहेर निशाची किंचाळी ऐकू येते

आणि त्या भयाण शांततेत

विरून जाते.

******************************

१ वर्षांनंतर.....

******************************

वेळ संध्याकाळ ६ ची

"हाच तो बंगला आहे मॅडम,


मि.वेलणकर यांनी आमच्या बिल्डर्स साहेबांना विकण्यासाठी सांगितलाय."

एजंट नुकत्याच शहरात नवीन आलेल्या सुमित्राबाई यांना माहिती देत असतो.

पण...ते हा बंगला का विकत आहेत?, किती छान आहे - सुमित्रा बाई

त्याचं काय आहे ना मॅडम या बंगल्यात त्यांची मुलगी निशा मृतावस्थेत आढळून आली होती,

बिचारे वेलणकर, त्यांची एकुलती एक मुलगी होती निशा, मिसेस वेलणकर वर्ष होत आले तरीही अजुन या धक्क्यातून सावरू शकलेल्या नाहीत.

पोलिस पण हैरान आहेत या गुढ मृत्युमुळे, घरात कुणी नसतांना तिची गळा आवळून हत्या झाली.

कोणी केली?

का केली?

हे अद्याप ही पोलिस या सर्वांचा सुगावा लावू शकले नाही.

हे सर्व प्रश्न एक गुढ बनूनचं राहिले आणि या मर्डरची केस क्लोज झाली, तुम्हाला तर माहितीचं असेल या किचकट केस बद्दल - एजंट

हो, १० दिवस तर ह्याचं बातमीला न्यूज वाले ब्रेकिंग न्यूज म्हणून मसाला लावून सांगत होते, प्रत्येक न्यूज वाले - सुमित्रा

मग तुमचा विचार अजुनही कायम आहे ना हा बंगला घेण्याचा कि दुसरा दाखवू - एजंट

मला बॅन्केत लवकर रूजू व्हावे लागणार आहे, मुलाचे कॉलेज अॅडमिशन ही झालं आहे पण वेलणकरांनी बंगला विकण्याचे कारण सांगितले असणार ना ? - सुमित्रा

त्याचं काय आहे मॅडम कि इथे या बंगल्याने त्यांच्या एकुलत्या एक मुलीला गिळलं,तिच्यांत आवडीनुसार हा बंगला तयार केलेला होता. तिच्या आठवणी त्यांना व मिसेस वेलणकर यांना सतावतात इथं असं त्यांचं म्हणणे आहे.

त्यांचं म्हणणे आहे की ज्या घराने त्यांच्या लाडक्या मुलीचा जीव घेतला,त्या घरात ते क्षणभर ही थांबू शकत नाही

आमचे साहेब हे वेलणकरांचे बालमित्र म्हणुन हा बंगला विकण्यास साहेबांना वेलणकर यांनी विनंती केली - एजंट

अच्छा हरकत नाही,तुमच्या साहेबांना कळवा हा बंगला मी विकत घेत आहे - सुमित्रा

येस मॅडम, उद्या मी सकाळीचं कामगार घेऊन येतो आणि दुपार पर्यंत बंगला साफ करून घेतो, तुम्ही संध्याकाळ पर्यंत शिफ्ट झालेले असणार - एजंट

बंगला खरेदीचे सर्व व्यवहार पूर्ण करून सुमित्रा आपला मुलगा राजन सोबत संध्याकाळी त्या घरात शिफ्ट होतात.

राजन बंगला पाहुन खुप खुश झालेला असतो.

राजन २४ वर्षाचा एक महत्वाकांक्षी मुलगा असतो, भयपट पहायची त्याला भारी हौस.

राजनला सुमित्रा बाई बंगल्या बद्दल सर्व सांगतात.

पण राजन म्हणतो,

आई घरात किती लोक मरतात, प्रसंगी मारल्याही जातात म्ह्णुन घर सोडावे, हे मला पटत नाही,असो हा ज्याचा त्याचा खासगी विषय आहे.

राजन दुसर्या दिवशी आईला सांगुन कॉलेजला जातो.

राजनची पहिल्याचं दिवशी विकी नावाच्या मुलाशी छान गट्टी जमते.

यार राजन तू राहतोस कुठे ? - विकी

त्यावर राजन त्याला नवीन घराचा पत्ता सांगतो.

अरे त्या घरात निशा वेलणकर नावाची मुलगी मृतावस्थेत सापडली होती,

पोलिस सुद्धा तिचा मारेकरी शोधू शकले नाही - विकी

हो रे आईने सांगितलंय मला सर्व - राजन

त्या घरात जपून राहा हं...बाबा - विकी

कोणापासून निशाच्या भूतापासून की तिच्या मारेकर्या पासून - राजन

( राजन जोरजोरात हसू लागतो )

तसं नाही रे लोकं विचित्र चर्चा करतात त्या हॉन्टेड हाऊस बद्दल, त्या बंगल्यात एक म्हातारी वरच्या खिडकीत दिसते,

रात्री बेरात्री एका मुलीची किंचाळी ऐकू येते,

त्या भितीने त्या बंगल्या च्या आसपास कोणी फिरकत सुद्धा नाही - विकी

गप रे काहीही लॉजिक लावतात लोकं, हा तो बंगला आहे जरा आडबाजूला बाकीचे बंगले त्यापासून जरा दूरचं आहे,

तिथं जायचं कोणाचं कामचं नसणार, तर मग कशाला कोण फिरकेल - राजन

बघ बाबा मी तुला सावध केले बाकी तू आता राहातचं आहेस तर सांभाळून रहा - विकी

त्यांच्या लेक्चरचा टाईम झाल्याने ते वर्गात जातात.

राजन बंगल्यावर येतो.

सहज त्याचं लक्ष वरच्या मजल्यावर जाते तर

त्याला पांढरेशुभ्र केस असलेली म्हातारी

त्याच्याकडे विकृत नजरेने पाहत असल्याचे दिसून येते.

उन्हाची तिरीप डोळ्यांवर आल्याने तो डोळ्यांवर हात ठेवून बघतो तर

तिथं कोणीचं नसते.

च्यायला या विक्याची गोष्ट डोक्यात गेल्याने मी हि इमॅजिन करायला लागलो की काय ?

आणि तो स्वतःशीचं हसतो.

तो चावीने डोअरलॉक उघडतो,

आई बॅन्केत गेलेली असते.

तो बॅग ठेवून खात्री करून घ्यावी म्हणुन तडक वरच्या मजल्यावर जातो.

तर ती रूम लॉक असते.

तो चावी शोधून रूम उघडतो.

सर्व रूममध्ये धुळ आणि जाळी जळमट असते.

च्यायला एजंटने तर ही रूम साफचं केली नाही,

साले कामचोर.

तो खिडकीकडे बघतो तर ती बंदचं असते.

मला भासचं झाला असेल, खिडकी तर आतुन बंद आहे.त्याच्या शेजारी एक झुलणारी खुर्ची असते व मागे कपाट असते.

अरे हे तर वेलणकर फॅमिलीचं कपाट दिसतंय, तो कपाटाकडे वळतो.

तो हाताने कपाटाचा आरसा एका बाजूने साफ करतो,

त्यावर स्टिकर ने बनवलेले Nisha हे नाव असते.

अरे हि तर निशाची रूम आहे वॉव...

तो कपाटाचे दार उघडण्याचा प्रयत्न करतो पण ते जाम झालेले असते.

लॉक आहे बहुतेक, जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे.

त्याची नजर आरशावर जाते तर तो नखशिखांत शहारला जातो,

कारण त्या झुलणार्या खुर्चीवर ती म्हातारी मागे पुढे झुलत असते.

तो झटकन मागे वळतो तर त्या खुर्चीवर कोणीही बसलेले नसते

पण खुर्ची मात्र मागे पुढे होत असते.

त्याला दरदरून घाम फुटतो.

तो पुन्हा आरशात बघतो पण तिथे देखील रिकामीचं खुर्ची हालत असते.

तो शर्टच्या बाहीने चेहर्याचा घाम पुसतो व एक एक पाऊल खुर्ची कडे हळूहळू टाकतो.

तो जसा खुर्ची जवळ पोहचतो, अचानक खुर्ची हलण्याची थांबते.

त्याचा श्वास फुलून आलेला असतो, तो सुस्कारा सोडतो.

या विक्याच्या निरर्थक गोष्टींनी डोक्याचे भुस्कट पाडले.

चला राजन साहेब खाली चला, नाही तर इथं या धुळीने तुमचा जीव गुदमरून जायचा.

तो जेवण वगैरे करून बेडरूम मध्ये झोपायला जातो.

टिंग टॉन्ग बेलच्या आवाजाने त्याला जाग येते.

तो मोबाईल मध्ये बघतो ४:३० झालेले असतात.

तो दाराजवळ जाऊन दार उघडतो तर आई असते.

कायरे झाली का झोप - सुमित्रा

हो झाली गं आई, ती वरची जी रूम आहे ती किती धुळीने भरलेली आहे,

साफ करून घ्यायची ना - राजन

अरे एजंट बोलला कि त्या रूमचं लॉक उघडत नाही,

आता काय दरवाजा तोडून साफ करायची का - सुमित्रा

अगं आई दुपारीचं त्या रूममध्ये गेलो होतो, तेव्हा बरे डोअरलॉक उघडले - राजन

काय...? चल बरं बघु - सुमित्रा

दोघे वर जातात,

सुमित्रा चावी लावून फिरवून बघते पण चावी जागची हालत सुद्धा नाही,

मग राजन प्रयत्न करून बघतो तरीही उघडत नाही.

हे तर आता उघडतचं नाही आहे

असं म्हणुन तो मागे वळतो तर मागे कोणीही नसते.

त्याला आश्चर्य वाटते तो आईला आवाज देतो पण प्रतिसाद मिळत नाही, तो संपूर्ण पॅसेज बघतो.

अचानक दाराची बेल वाजते.

राजन खाली जाऊन दार उघडतो

तर बाहेर आई असते.

हे पाहून त्याला धक्काचं बसतो.

आई तु आता येत आहे - राजन

हो तुझ्यासमोर उभी आहे ना - सुमित्रा

अगं तु आता थोड्या वेळापूर्वी माझ्या सोबत वरच्या मजल्यावर होती - राजन

तुला भास झाला असेल रे - सुमित्रा

अगं आपण बराचं वेळ गप्पा ही मारल्या ना गं - राजन

मग मी खोटे बोलत आहे का ?

आई रागावून बोलते.

तसं नाही गं... जाऊ दे सोड तो विषय,

मी चेष्टा करत होतो असं बोलून राजन वेळ मारून नेतो.

रात्री माय-लेक जेवण करून झोपतात.

मध्यरात्र वेळ १ वाजेची...

वरच्या रूमचा दरवाजा

कर..कर..कर..कर वाजत उघडतो.

राजनची झोप या आवाजाने उघडते.

टक...टक...टक...टक...असा विशिष्ट आवाज वरच्या मजल्यावरून येत असतो.

जसे कोणी काठीचा आधार घेऊन चालत आहे.

जिन्याच्या लाकडांचा चर्र चर्र आवाज येतो.

एवढ्या रात्री कोण जिना उतरत आहे ?

राजन स्वतः शी पुटपुटतो.

त्याला जाणवतं कि दाराबाहेर कोणी तरी उभे आहेत.

त्याला थंड आवाज येतो.

राजन...राजन...

वरचा रूम उघडलाय

खिहिहिहि...खिहिहिहि...

राजन थरथर कापतो.

दारावर थापा पडू लागतात.

मी आत येऊ का ?

तोचं थंड आवाज....

जणु तो आवाज राजनच्या होकाराची अपेक्षा करत आहे.

आणि अचानक एका मुलीची किंचाळी ऐकू येते.

राजन मोबाईल घेऊन आईला कॉल करतो.

आई मोबाईल च्या रिंगने मोठ्या मुश्किलीने डोळे उघडते व मोबाईल पाहते तर

राजन कॉलिंग दिसते.

ती रिसिव्ह करते.

पलिकडून आवाज येतो.

हॅ...हॅ...हॅलो आई लवकर बाहेर ये, कोणी तरी माझ्या रूम बाहेर

विचित्र हसत आहे आणि दार वाजवत आहेत.

आई ताबडतोब बाहेर येते पण बाहेर तर स्मशान शांतता असते.

आई बाहेरून राजनला आवाज देते,राजन दरवाजा उघडून आईला मिठी मारतो.

अरे बाळा कोणीचं नाहीये,

तु भितीदायक स्वप्न पाहिले असणार,

पहिले तु तुझे हॉरर पिक्चर बघणे बंद कर - सुमित्रा

नाही आई हे भास नव्हते, मी स्पष्ट ऐकले, उघड्या डोळ्यांनी पाहिले - राजन

तो वरच्या मजल्याचंही सांगतो.

त्यावर जाऊन पाहतात पण तो तर बंदचं असतो.

त्या खाली येतात व त्याला सांगतात की तो बंदचं आहे

चल तु झोप बरं आधी मी आहे इथंचं... - सुमित्रा

राजनला गाढ झोप लागते, मग त्या ही झोपायला जातात.

सकाळी आईच्या आवाजाने त्याला जाग येते.

त्याला रात्रीची आठवण येते.

माझे भासचं असणार, आईला बरं काही दिसले नाही.

तो फ्रेश होतो, आई त्याला नाश्ता देते, व सांगते कि

कामानिमित्त ती बाहेरगावी जात आहे, रात्री घाबरणार नाही ना.

आई मी एवढा पण भित्रा नाही आहे,तु जितकं समजते.

मी आधी यामागील कारण माहिती करून घेईल... - राजन

आणि मग घाबरशील का ?

त्या हसत बोलतात.

तो पण हसतो, काय आई तु पण

आता मस्ती मजाक करायला लागलीस. - राजन

यावर दोघेही मनसोक्त हसतात.

आई बाहेरगावी जाते तर राजन कॉलेजला जातो.

राजन रात्रीची घटना विकीला सांगण्याचे कटाक्षाने टाळतो.

कारण विकी त्याला आणखी घाबरवून द्यायचा असं त्याला वाटतं.

राजन आणि विकी दिवसभर शहरात भटकतात, बार मध्ये ड्रिंक घेतात व हॉटेल मध्ये जेवतात.

संध्याकाळ झालेली असते

तरी ते भटकत असतात,

राजन वाईन शॉप मधुन चिल्ड बिअर घेतो, रात्री पिण्यासाठी,

तो विकीला अॉफर करतो पण विकी बापाचे नाव सांगुन टाळतो.

विकी त्याला घराजवळ सोडतो व घराकडे बघतो तर बंगला काळोखात बुडालेला असतो.

तो आवंढा गिळतो आणि राजनला सांगून कलटी मारतो.

राजन डोअरलॉक उघडून आत जातो व लाईट लावतो.

त्याची नजर जिन्याकडे जाते, तो जिना मिट्ट काळोखात असतो.

तो दुर्लक्ष करून बाथरूम मध्ये जातो.

बेसीन जवळ जाऊन थंड पाण्याचे सपकारे तोंडावर मारतो

तेव्हा कुठे त्याला तरतरीत वाटते.

तो फ्रिज मधुन बिअर काढतो व ग्लासात घेऊन पेग मारतो.

तो सोफ्यावर बसून पेग मारत असतो.

त्याला पानांची फडफड ऐकू येते,

जसे एखादे पुस्तक उघडे आहे व हवेने त्याची पाने फडफड करून वाजत आहे.

आवाज सोफ्या खालून येत असतो.

राजन सोफ्या खाली बघतो तर एक पुस्तक असते, तो पुस्तक काढण्यासाठी हात घालतो तर एक हात त्याचे मनगट पकडते.

राजन वाकून पहातो तर एक सडक्या हाताने त्याच्या मनगटाला पकडलेले असतात.

तो जोर लावून हिसका देतो.

तर तो पुस्तकासोबत पाठीमागे पडतो.

तो सोफ्याखाली मोबाईल टॉर्च लावून बघतो तर तिथं काहीचं नसतं

हा तोचं सोफा असतो, ज्यावर निशा मृतावस्थेत आढळून येते.

तो पुस्तकावर नजर टाकतो तर ते एक भयकथेचं पुस्तक असते.

त्या पुस्तकावर शापित हे शिर्षक असते.

राजनला भितीदायक कथांची भारी आवड,तो पुस्तक वाचण्यास घेतो.

तो पुस्तक वाचून संपवतो.

शेवटच्या पानावर चेतावणी असते.

"हे पुस्तक वाचू नका...वाचल्यास जीवाला धोका आहे "

त्याला हे वाचून हसू येते पण त्यांच्या या हसण्या सोबत त्याला आणखी एक खसखस ऐकू येते

जी वरच्या मजल्यावरील रूममधुन येत असते.

तो जीन्या जवळील लाईट लावतो

पण असते फक्त शांतता....

अचानक त्याचा मोबाईल वाजतो,

तर विक्याचा विडिओ कॉल असतो.

तो कॉल रिसिव करतो,मग भाई पार्टी जोरात का ? - विकी

विक्या साल्या तु असता तर आणखी मजा आली असती. - राजन

इतक्यात विक्या त्याच्या मागच्या बाजूला बघुन म्हणतो,

राजा मावशी घरी आल्या का ?

नाही रे घरात मी एकटाचं आहे, का रे ? - राजन

अरे तुझ्या मागच्या बाजूला कोणीतरी बाई सारखं दिसलं, जे मोकळे केस सोडलेले होते, तुझ्या पाठीमागून गेलं. - विकी

राजन हे ऐकून चपापतो.

कुठे ? आय मीन कोणत्या दिशेला ? - राजन

अम्म... राईट - विकी

अरे तिकडे तर बाथरूम आहे.- राजन

तितक्यात शॉवर चालू होण्याचा आवाज येतो, राजन दचकतो.

विक्या बाथरूम च्या शॉवर चालू झाल्याचा आवाज आला. - राजन

राजन एक दांडा हातात घेतो व हळूहळू बाथरूम कडे जातो.

तो दारावरच्या हॅण्डल वर हात ठेवतो, त्याचा श्वास फुलून आलेला असतो.

तो धाडकन दरवाजा उघडतो पण आत सर्व शांत असते.

तो विक्या वर वैतागतो, साला हा विक्या माझ्या मनात नको नको ते भितीदायक विचार टाकतो, मग मलाही तसलेचं भास होतात.

तो बाहेर येऊन मोबाईल उचलतो

साल्या विक्या माझी फिरकी घेतोस का ? मला घाबरवतोस. - राजन

पण विक्या त्याच्या कडे एकटक पहात असतो.

हरामी बास की आता मस्करी करायची पण एक लिमिट असते चु** - राजन

विक्याच्या चेहर्यावर विकृत हसू पसरते, तो दोनच शब्द बोलतो.

" टिंग टॉन्ग "

त्याचं वेळी दारावरची बेल वाजते.

राजन चा मोबाईल हातातून खाली पडतो व बॅटरी कुठे तर मोबाईल कुठे असा विभागतो.

तो बॅटरी घेऊन मोबाईल मध्ये टाकतो तर पुन्हा बेल वाजते.

तो दारावरच्या होल मधुन बाहेर बघतो तर विजा कडाडत असतात, मुसळधार पाऊस पडत असतो पण बेल वाजवणारे कुणीही बाहेर नसते.

गुडूप अंधारा शिवाय काही ही नजरेस पडत नाही.

मात्र बाहेरच्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडा खेरीज.

कोणीचं नाही मग बेल कोणी वाजवली असेल.

तो वळतोचं की पुन्हा बेल वाजते

यावेळी तो प्रचंड दचकतो.

तो पुन्हा होल मधुन बाहेर बघतो तर एक मुलगी भिजलेल्या अवस्थेत बाहेर उभी असते.

आता थोडावेळ आधी पाहीले तर कोणीचं नव्हते. मग ही कुठून टपकली, पावसासोबत ही पण आभाळातून पडली की काय ?

त्याला स्वतःच्या चं विचारांचे हसू येते.

हॅलो कोणी आहे का आत, प्लिज हेल्प मी... बाहेरून आवाज येतो

राजन भानावर येत दरवाजा उघडतो.

अहो माझी स्कुटी बंद पडली आहे, माझा मोबाईल पण भिजलाय,मी पाऊस थांबला की जाईल,मी थांबू शकते ना ? - ती मुलगी

हो...हो...का नाही या ना आत या, नाही तर थंडी वाजेल तुम्हाला. - राजन

तो तिला टॉवेल देतो, ती चेहरा व हात पुसत असते.

तुमचा मोबाईल देता का ?

आईला कळवते तरी ती काळजीत असेल. - ती मुलगी

तो आपला मोबाईल तिला देतो

ती मोबाईल वर बोलत असते.

त्याच्या मनात अचानक विचार चमकतो.

हि हडळ किंवा चेटकिण तर नाही ना ?

तो तिचे पाय बघतो पण ते सरळ असतात, तो सुस्कारा सोडतो.

ती त्याला मोबाईल परत करते.

मग तो तिला तिचे नाव विचारतो.

ओह...सॉरी सॉरी

माझे नाव संजना आहे - ती मुलगी

मग तो देखील स्वतः चे नाव सांगतो.

ती म्हणते,मला पाणी मिळेल का ? - संजना

तो किचन मध्ये जातो व फिल्टर मधुन ग्लासात पाणी घेत असतो.

त्याच्या कानाजवळ आवाज येतो.

थंड पाणी द्या बरं का ?

ग्लास पडता पडता तो सांभाळतो

आणि मागे वळतो तर मागे संजना उभी असते,एकदम त्याच्या खुप जवळ,तो खुप घाबरतो.

अहो सॉरी मला थंड पाणी हवे होते म्हणुन सांगायला आले होते. - संजना

आणि तितक्यात लईट जाते, संपूर्ण घर अंधारात बुडून जाते.

तो ग्लास ठेवून मोबाईल टॉर्च लावतो तर त्याच्या समोर कोणी ही नसते.

त्याला दरदरून घाम फुटतो.

तो तिला आवाज देतो

संजना... संजना...

त्याला वरच्या मजल्यावर किंचाळी ऐकू येते.

तो किचन बहेर येतो.

जिन्यावरून काही तरी गडगडत खाली येते व त्याच्या पायाजवळ येऊन थांबते.

हि घटना खुप वेगात घडते.

तो टॉर्च तिकडे मारतो तर

ती संजनाची मुंडकी असते.

राजन धडपडत मागे पडतो, कोणी तरी जिन्यावरून

ठप...ठप...ठप...ठप

आवाज करत खाली उतरत असते.

जिन्यावर बघण्याचे

त्याचे धाडस होत नसते पण बघावे तर लागणारचं ना...

तो त्या दिशेने उजेड करतो.

ते संजना चे बिना मुंडक्याचे धड असते,ज्याच्या हातात धारदार चाकू असतो.

ते धड चाकू उगारून त्याच्या अंगावर धावून येते.

राजन किंचाळून हाताने तोंड झाकतो.

"अहो काय झाले तुम्हाला ?"

त्याला आवाज येतो तर समोर संजना उभी असते.

राजन आजूबाजूला बघतो, तो त्याचं ठिकाणी सोफ्या जवळ उभा असतो.

"हा घ्या तुमचा मोबाईल",संजना बोलते.

"माझा मोबाईल तुमच्याकडे कसा ?" - राजन

"असं काय करता तुम्ही ?

तुम्हीचं तर मला दिला होता ना

आईला कॉल करण्यासाठी",

*एवढ्यात विसरले पण

तुम्ही गजनीचे अमिर खान सारखे रिअॅक्ट होताय", संजना हसुन बोलते.

यावर कसं व्यक्त व्हावे हेचं राजनला कळत नसते.

"आणि हो तुम्ही माझे पाय पहात होता ना" - संजना

"नाही तर बिलकुल नाही" - राजन

"अहो हडळ आपले पाय सरळ ही ठेवू शकतात आणि उलटेही" - संजना

"म्हणजे ?" - राजन

थंडीतही त्याला दरदरून घाम येतो.

"माझ्या पायाकडे बघा" - संजना

त्याच्या समोर तिचे पाय उलटे होतात.

हे बघुन त्याला त्याच्या डोळ्यांवर विश्वास होत नाही.

"हे तर काहीचं नाही, आता हे बघा"

ती त्याच्या कडे पाठ करते पण तिचा चेहरा जागेवरचं असतो.

हे बघुन त्याच्या पायाखालची जमीनच सरकली असे त्याला वाटते.

"मीचं निशा वेलणकर"

हे ऐकून त्याची मतीचं कुंठीत होते.

याचं घरात मी राहत होते पण ते शापित पुस्तक वाचले आणि माझी ह्याचं सोफ्यावर गळा दाबून खून झाला.

कोणी केला माहित आहे, संजना म्हणजेचं निशा बोलते.

"को...को...कोणी केला ?"

राजनची बोबडीचं वळते.

मी ते पुस्तक वाचले आणि ती चेटकीण आली ना या घरात, निशा विचित्र हसत बोलते.

"को...को...कोणती चेटकीण ?"

राजनच्या तोंडातुन कसेबसे शब्द बाहेर येतात.

जी आता जिन्यात उभी राहून तुला घुरत आहे. - निशा

तेव्हढ्यात त्याला...

टक...टक...टक... काठी टेकवत जीना उतरत असतानाचा आवाज येतो.

पण त्याची नजर घाबरून निशा वरून हटतचं नसते.

कोणीतरी त्याच्या मागे येऊन उभे राहतं.

तो धाडस करून बघतो.

त्याच्या मागे तीच म्हातारी बाई असते.

आता ती बाई त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहते.

तिने पांढरेशुभ्र साडी घातलेली असते,

पांढरे केस असतात.

दोन दात सुळ्यासारखे बाहेर आलेले असतात.

हातांची नखे भरपूर लांब व टोकदार असतात.

तिचे डोळे हिरवेगार चमकतात.

राजनचे तो अवतार पाहून अवसान चं गळून पडते.

"निशा पोरी हा त्या दिवशी त्याच्या आई मुळे वाचला,

कारण तिच्या गळ्यात देवाची माळ होती पण आज

हा नाही वाचणार".... - ती म्हातारी

"खिहिहिहि...खिहिहिहि...."

"पोरी हि तुझी पहिली शिकार आहे मार याला" - म्हातारी

निशाचा चेहरा पांढरा फटक पडतो,तिचे डोळे पांढरेशुभ्र चमकतात,केस मोकळे सुटतात, आकाशात वीज कडाडते

त्या प्रकाशात तिचे ते अमानवीय रूप खुप भयानक दिसते.

ती किंचाळी फोडते.

निशाचे दात

कट...कट...कट..कट...कट...

वाजतात.

राजन किंचाळून रूमकडे धावतो व दार आतून बंद करतो.

तो बेडवर पाय जवळ घेऊन बसतो.

दारावर जोरजोरात थापा पडू लागतात,

राजन आपले कान झाकुन घेतो.

इतक्यात, धाडकन दाराच्या चिरफाळ्या उडतात,हवेच्या वेगाने काही तरी मध्ये घुसते.

बेड हवेत उडून खाली आदळतो.

त्यासरशी राजनही फर्चीवर आपटतो.

कोणी तरी सरपटत वेगाने त्याच्या दिशेने येत असल्याचे त्याला जाणवते.

राजन चेहरा वर करून पाहतो

एका क्षणात निशा सरपटत त्याच्या जवळ येते.

त्याला काही समजायच्या आत तिचे धारदार नखे खुप वेगाने त्याच्या डोळ्यात घुसतात व डोळे घेऊनचं बाहेर येतात.

ती त्याची जीभ उपटून बाहेर काढते.

त्याला ओरडण्याचीही संधी मिळत नाही.................

तिला घर्रघर्र ऐकू येते,ती मागे बघते.

ती म्हातारी चेहर्यावर आसुरी हास्य घेऊन तिच्याकडे पहात असते.

सोफ्याच्या समोर जमिनीवर ते पुस्तक फडफडत शांत होतं.......राजन सारखं


Rate this content
Log in

More marathi story from nilesh morade

Similar marathi story from Horror