kanchan chabukswar

Tragedy

3  

kanchan chabukswar

Tragedy

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही...

6 mins
274


प्रवीण गेल्याचं व्हाट्सअपवरून कळलं. अजून एक मुलगा, नाहक मेला. वय 20 वर्ष. तारुण्याच्या उंबरठ्यावर. आई वडीलांवर आभाळच कोसळले. काय झालं? झालं? केव्हा झालं? आधी काय सवय होती? केव्हापासून चालू होतं? काय उपयोग अशा प्रश्नांचे? लंडनच्या इकॉनॉमिक्स कॉलेजमध्ये शिकणारा तरुण, प्रवीण, ह्या जगातून गेला. त्याच्याबरोबर पार्टी करणारे मित्र आता एकदम गप्प आहेत. कोणीही काहीही सांगायला तयार नाही.


उत्तम शाळेतून दहावी व बारावी झालेला मुलगा. दहावीला 95 टक्के मार्क, त्याची गाडी बारावीला घसरली. आई-वडिलांच्या काय काही लक्षात आले नाही? बदललेल्या सवयी, रात्रीचे जागरण! मित्रांबरोबर घालवलेल्या रात्री, कोणी कधी आडकाठी केली नाही. तरीपण रसिका मधून मधून प्रवीण ची बँक तपासे. रमेश दिलेलं एटीएम कार्ड, बँकेचा अकाउंट, याच्यावर रसिका आणि रमेश दोघेही नजर ठेवून असत. प्रवीण से मित्र बरेच वेळेला घरी येत, त्यामुळे रसिका आणि रमेश ना हे माहीत होते. सगळे लहानपणापासूनचे मित्र आणि मैत्रिणी. एकविसावं शतक, स्वातंत्र्य, तारुण्याची रग , रमेश आपले दिवस आठवून प्रवीणला मोकळीक देत. चार वर्षांनी लहान असलेला भाऊ नवीन हा पण प्रवीणच्या पार्टीमध्ये सामील होत असे.


    लंडनच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी मात्र प्रवीणने जिवापाड मेहनत केली होती. बारावीचे मार्क जरी कमी असले तरी त्याला co-curricular ऍक्टिव्हिटीमध्ये मिळालेली सर्टिफिकेट, त्याची मैदानावरील गुणवत्ता, आणि जनरल नॉलेज याच्यावरती प्रवीण ने बाजी मारली. रसिका आणि रमेशला तर आभाळ ठेंगणं झालं. संपूर्ण कुटुंबामध्ये पहिला मुलगा लंडनला जाणार. रमेश सगळं कुटुंब बिजनेसमध्ये. परदेशी जाऊन शिक्षण वगैरे काही माहितीच नव्हत. प्रवीण आणि नवीन उत्तम शाळेमध्ये जात आहेत, चांगले मित्र आहेत, त्याच्यामुळे रसिका आणि रमेश अगदी खुश होते. रूपाने देखणा असलेला, बुद्धिमान, उंच, लाघवी बोलणारा, सगळ्यांशी दोस्ती ठेवणारा प्रवीण मैत्रिणी, मित्रांमध्ये फारच पॉप्युलर होता.


चाळीस चाळीस मुलांच्या क्लासमध्ये नको म्हणून रसिका आणि रमेशने दहावीला त्याला खाजगी शिकवणी लावली होती. शिकवणीचे ठिकाण थोडे आडबाजूला होते, रस्ताही थोडा वेगळा होता, पण शिक्षक उत्तम असल्यामुळे आणि पाच मित्र त्याच्याबरोबर असल्यामुळे रसिका आणि रमेश निर्धास्त होते. मधूनमधून शिक्षकांचा रसिकाला फोन येई, प्रवीण पाच दिवसांपैकी तीनच दिवस येतो. त्यावेळेस मात्र त्याचे मित्र त्याची बाजू घेऊन सांगत की कोणाच्यातरी घरी हे प्रोजेक्ट करत बसले होते. बरं प्रत्येक वेळेला दुसऱ्याच्या आईवडिलांची साक्ष काढणे हे देखील योग्य वाटत नसे.


बारावीलादेखील याच मित्रांचा ग्रुप प्रवीण बरोबर होता. मात्र प्रवीणच्या वागण्यामध्ये फारच बदल घडला होता. आता तो खोलीचे दार लावून गप्प बसत असे. रसिकाला वाटे की तो अभ्यास करतोय. रात्र-रात्र कंप्युटर वरती काहीतरी शोधणे आणि नवीनच जुळलेल्या मित्रांबरोबर गप्पा मारणे मध्ये प्रवीण वेळ घालवत होता. अकरावीला तर प्रवीण नापास होता होता वाचला. तेव्हा मात्र रसिका आणि रमेश ने त्याला खडसावून विचारले. प्रवीणने अभ्यासक्रम फार अवघड असल्याचे कारण केले.


एम यु एन, बॅडमिंटन, मैदानी खेळ, यामध्ये भरभरून भाग येत असल्यामुळे प्रवीण बारावीला देखील कॉलेजचे दिवस भरू शकला नाही. तरीपण तो अभ्यास करत होता. आता मात्र रसिका त्याच्यावर बारीक लक्ष ठेवून होती. मात्र दर पंधरा दिवसांनी, प्रवीण चे मित्र त्याला ग्रुपस्टडीसाठी बोलवत आणि रात्रभर त्यांच्याबरोबर राही. पायजमा पार्टी, ग्रुप स्टडी, ट्रीप, दुसऱ्या ठिकाणी असलेले डिबेट. ही सगळी नुसती कारणं होती. मात्र सगळ्या मुलांनी अभ्यास करून लंडनच्या इकॉनॉमिक्स कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर रसिका आणि रमेशला वाटले की उगीचच त्यांनी प्रवीण वर संशय घेतला.


गाडीची किल्ली उचलून प्रवीण बेधडकपणे आपल्या मित्रांसोबत पिकनिक म्हणून निघून जात असे. लंडनमध्येदेखील सगळे मित्र होस्टेलमध्ये राहण्याऐवजी स्वतंत्र घर घेऊनच राहत होते. आता मात्र प्रवीण चे खर्च जरा जास्तच वाढले होते. प्रवीण आपल्या आई-वडिलांची समजूत घाले लंडनमध्ये खर्च पावंडांमध्ये मध्ये करावा लागतो. युनिव्हर्सिटीमध्ये जाण्या-येण्यासाठी सगळ्या मुलांनी मिळून एक गाडी घेतली होती.


फेसबुकच्या चित्रांवरून मुले कुठे कुठे फिरायला गेले याची बित्तंबातमी लागत होती. पहिल्या वर्षभर सगळं काही ठीक होता. दुसऱ्या वर्षी मात्र फेसबुकमध्येपण काही मुलींची चित्र यायला लागली. बेधडक रुबाबदार बसलेला प्रवीण, आणि त्याच्या मांडीवरती बसलेली प्रियांका. समुद्र किनाऱ्यावरचे फोटो तर फारच उत्तान होते. प्रियांका बहुतेक फारच पुढारलेली होती. प्रवीण आणि त्याच्या सगळ्या मित्रांना बरोबर तिचे तेवढेच बेपर्वाईचे फोटो फेसबुक वरती झळकत होते प्रियंका सुद्धा युनिव्हर्सिटी मध्ये कसला चा कोर्स करत होते. सनीने प्रियांकाला प्रवीण बरोबर मैत्री करून दिली होती. इंटरनेटवर असलेल्या डेटिंग साईटवरून प्रियंका, विनया, मधु, या मुली सगळ्यांची मैत्री करून होत्या. बिनधास्तपणे सिगरेट ओढणे, अल्कोहोलिक ड्रिंक घेणे याबद्दल त्यांना काहीच वाटत नसे.


      अभ्यासापेक्षा आता नियमितपणे डान्स पार्टी, होत असे. दहावीपासून चटक लागलेली असल्यामुळे आणि आता लंडनमध्ये कोणाचाच धाक नसल्यामुळे प्रवीण आणि त्याचे मित्र अगदी बिनधास्त होते.  दुसऱ्या वर्षी ठरवून रसिका आणि रमेश नवीन ला घेऊन प्रवीण ला भेटायला गेले. त्याच्या घरीच राहिले, सगळं काही ठीक ठाक, आलबेल वाटलं. प्रवीणचे मित्र कुठेतरी फिरायला गेले होते, मात्र एका मित्राच्या खोलीमध्ये, विचित्र डब्बे पडले होते. असा एक वेगळाच गोड उग्र वास घरामध्ये कोंडून राहिला होता.


रसिकाला वाटले साफसफाई नाही म्हणून असेल कदाचित. प्रवीण थोडं विचित्र वागत होता.. शनिवार रविवार तो काहीतरी कारण सांगून घराबाहेरच राही. युनिव्हर्सिटीच्या ग्रेड देखील त्यानी दाखवले नाहीत. बाहेरच्या देशांमध्ये शिक्षकांना भेटणे सोपे नसते रसिका आणि रमेश भरपूर ओळखपाळख काढून प्रवीणच्या प्रोफेसर ची गाठ घेतली. प्रवीण तर त्यांनI माहिती पण नव्हता. मित्रही त्यांना भेटले नाहीत. आता मात्र रसिका आणि रमेश घाबरले. प्रवीण नक्की युनिव्हर्सिटीमध्ये जातो का अजून काय करतो? चिडचिड वाढतच होती, प्रवीण, रसिका आणि रमेश च्या हातापाया पडत होता, त्याला लंडनमध्येच राहायचं होतं. पण प्रोफेसरच्या मते प्रवीण ने दुसऱ्या वर्षीचा एकही क्लास अटेंड केला नव्हता. प्रोजेक्ट पण सबमिट केले नव्हते. रसिका ला वाटले की प्रवीणला पश्चाताप होतोय, पण एकंदरीत घराच्या अवतारावरून आणि प्रवीणच्या वागण्यावरून तसं काही वाटत पण नव्हतं.


प्रवीण परत परत म्हणत होता, की मी त्यांच्या जाळ्यात अडकलोय, मला इथेच राहून सुटायचे आहे. पण “ते” कोण होते? प्रवीण काहीच बोलायला तयार नव्हता. रमेश ने पाठवलेले पैशाचं काय झालं? प्रवीण पाशी काही उत्तर नव्हतं. त्याच्या मित्रांचा पण काही थांगपत्ता नव्हता. मित्र फक्त फोनवरून रमेश शी बोलत होते, प्रत्यक्ष कोणाची भेट झाली नाही. मुलींपैकी देखील प्रियंका, विनया, मधु कोणीही रसिका आणि रमेश ला भेटायला आले नाही.

शेवटी ते तिघेजण त्याला घेऊन घरी आले. 


थोडे दिवस विश्रांती घेऊन प्रवीणला डॉक्टरांकडे दाखवले. चिडचिड वाढतच होती, आता तो मारामारी पण करू लागला. रक्ताचा रिपोर्ट काहीतरी वेगळेच दाखवत होता, प्रवीणच्या रक्तामध्ये ड्रग्स सापडले होते. रक्ताचा रिपोर्ट बघून रसिका आणि रमेश यांच्या पायाखालची जमीनच हादरली. प्रवीण ड्रग ॲडिक्ट झालाय याची बातमी त्यांच्या सगळ्या कुटुंबांमध्ये पसरली. रमेशच्या मोठ्या भावांनी प्रवीणला डॉक्‍टरांच्या सांगण्यानुसार रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये टाकले. सहा महिने झाले, प्रवीण हळूहळू सुधारत असल्याचे चिन्ह दिसू लागले डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, अजून सहा महिन्यांमध्ये प्रवीण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता होती. घरचाच कापड बिजनेस असल्यामुळे, प्रवीण ला काही कुठे नोकरी करायची नव्हती, त्यामुळे रमेश ने ठरवलं होतं की प्रवीण घरी आल्यावर त्याला आपल्याबरोबर दुकानावर न्यायचे.


दिवस हळूहळू जात होते. प्रवीण डॉक्टरच्या उपचारांना व्यवस्थित रित्या सहकार्य करत होता, त्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा तर होत होती. रसिका आणि रमेश आता थोडे थोडे निर्धास्त होत होते. मुलगा परत मिळवण्यासाठी दोघेजण वाटेल ते प्रयत्न करायला तयार होते. आठ महिने झाल्यावर डॉक्टरांच्या परवानगीने प्रवीणला घेऊन रसिका आणि रमेश घरी आले. प्रवीण परत परत म्हणत होता, वचन देत होता, तो आता काहीही असं करणार नाही यामुळे सगळ्या कुटुंबाला त्रास होईल.


अचानक रसिकाच्या आईची तब्येत बिघडली. हार्ट अटॅक आल्यामुळे, ताबडतोब अँजिओप्लास्टी करायचे ठरले रसिकाची अतिशय धावपळ व्हायला लागली. त्यामुळे रमेशने रसिकां ला तिच्या आईजवळ बॉम्बे हॉस्पिटलमध्येच राहायला सांगितले. रसिकाचा जीव प्रवीणमध्ये आणि आईमध्ये, तिच्या जीवाची नुसती फरफट होत होती. अँजिओप्लास्टी च्या दिवशी रमेश आणि रसिका दोघेजण हॉस्पिटलमध्ये थांबले.


मध्यरात्रीनंतर त्यांना शेजाऱ्यांचा फोन आला आणि रमेश ताबडतोब घरी आला. प्रवीणचा धाकटा भाऊ नवीन शेजाऱ्यांच्या घरी थरथरत बसला होता, आई-वडील रात्री येणार नाहीत हे कळल्यानंतर, प्रवीण ने त्याला घराबाहेर हाकलून दिले होते, आणि आपल्या मित्र मंडळाला बोलावून जणूकाही तो आठ महिन्याचा उपवास सोडत होता. घरातल्या दृश्य बघून रमेशचा संताप अनावर झाला. चित्रविचित्र कपडे घातलेल्या, मुला-मुलींनी घर भरले होते. कोणाला कोणाची शुद्ध नव्हती. बसलेले, पडलेले, आडवे झालेले.


अर्धवट कपड्यांनी अंग झाकलेल्या मुलामुलींना नीट बघितले, सगळे प्रवीण चे मित्र-मैत्रिणी होते. कसलातरी गोड दूर धूर घरामध्ये कोंडला होता. फक्त बर्मुडा घातलेला प्रवीण अस्ताव्यस्तपणे पलंगावर पडला होता, रमेशने त्याला गदागदा हलवले, आणि हाका मारल्या. प्रवीण शरीर गार पडले होते. त्याच्या मित्रमंडळाला प्रवीण मेला आहे हेदेखील कळलं नव्हतं. सुधारत असलेला प्रवीण परत त्याच नादाला लागून आपला जीव, सोन्यासारखा आयुष्य, गमावून बसला होता.


डॉक्टरांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये प्रवीणने ड्रग्स ओव्हरडोस घेतला होता. पोलिसांनी बाकीच्या मुलांना ताब्यात घेतले, चौकशी चालू आहे. चांगल्या घरातली हुशार मुलं बळी कशी पडतात? प्रत्येक पालकाला वाटणारे भय संपणार केव्हा?


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy