kanchan chabukswar

Tragedy

4.5  

kanchan chabukswar

Tragedy

भय इथले संपत नाही (भाग 2)

भय इथले संपत नाही (भाग 2)

5 mins
227


      "आर्या, आर्या," मागून हाक येत होती, कंपनीच्या गाडीमध्ये बसताना, अचानक परिचित आवाज मागून आला. मागे वळून बघितलं तर कोणीच नाही.

दुर् वर एक बुरखा घातलेली स्त्री उभी होती, मला हाक मारत होती, हात दाखवत होती. मला कोणीही पहिल्या नावाने हाक मारत नसे, कंपनी सेक्रेटरी म्हणून नावाजलेल्या कंपनीमध्ये काम करताना एटिकेट्स म्हणून सगळे मला आर्या मॅडम म्हणत. मग ही कोण? माझ्या ओळखीची मुसलमान स्त्री तर कोणीच नव्हती. आवाज तर ओळखीचा वाटत होता.

      मी थांबले, ती धावत माझ्यापाशी आली, चेहऱ्यावरचा बुरखा तिने वर केला,"ओळखलस मला?"

मी आश्चर्याने अवाक् झाले,"मेधा तू?" मी ओरडले. मेधा अजून जवळ आली, आणि मला घट्ट मिठी मारली.

"हे काय? हा बुरखा कशाला? काय करते सध्या?" मी प्रश्नांचा भडिमार केला.

"अगं हो हो सांगते." इथल्या एका ऑफिसमध्ये मी नोकरी शोधायला आले."

"अगं पण तू तर सीए होणार होतीस ना? नोकरी कशाला पाहिजे.?"

हसली आणि म्हणाली,"नाही ग, बीकॉमची परीक्षा झाल्यावर मी अमीरबरोबर पळून जाऊन लग्न केले. आणि त्याचे परिणाम भोगते आहे."

"मेधा! तू आमिर बरोबर लग्न केलं? पण का? तुला माहिती नव्हतं, त्याचं ऑलरेडी लग्न झाले म्हणून. काय मिळाले तुला? का हा वेडेपणा केला?"

आता मात्र मला मेधाचा संताप येऊ लागला. एवढी गुणी हुशार मुलगी, लग्न करून फसली होती. हात धरून मी तिला गाडीत बसवले, म्हटलं चल कुठे तरी बसू आणि बोलू. मेधा तयारच नव्हती, मी जबरदस्तीने तिला ओढून घेऊन गेले.


मेधा गुप्ते आणि मी शाळेपासूनचा मैत्रिणी. बास्केटबॉल आणि अथलेटिक्स त्यामुळे आमची मैत्री अधिक दृढ झाली. सातवी ते दहावी आम्ही दोघी एकच टीम मध्ये, 200, 400, 800 मीटर धावण्याची शर्यत, किंवा बास्केट बॉल ची मॅच, आमच्या दोघींचे नंबर मागेपुढे असल्यामुळे शाळेमध्ये आम्ही कायमच शाळेच्या टीम मध्ये आम्हा दोघींची जागा ठरलेली. खेळांमध्ये प्रावीण्य असल्यामुळे आम्ही दोघींनीही दहावीनंतर कॉमर्स कॉलेज जॉईन केले, मेघाला सीए करायचं होतं, आणि मला सी एस.,तडाखून अभ्यास आणि खेळ. कॉलेजमध्ये ॲथलेटिक्स मध्ये सातत्य राखण्यासाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये जाऊन सराव करायला सुरुवात केली. स्टेडियम मध्ये बरेचसे प्रोफेशनल कोच होते आणि आमचं सर्वांगीण व्यक्तिमत्व घडवण्यासाठी ते आम्हाला मदत करत. बरं कॉलेज तर्फे तयार होणाऱ्या टीममध्ये आमच्या दोघांचे पण निवड झाली असल्यामुळे, बाकी सर्व मुलांबरोबर आम्ही पण पहाटेच स्टेडियममध्ये जात असू. कॉलेजचा पहिलं आणि दुसरं वर्ष फारच मजेत गेलं. बास्केट बॉल मध्ये आम्ही दोघी सेंटर फॉरवर्ड खेळायच खेळायचो, एकदा का बॉल हाता हातामध्ये आला फक्त आमच्या दोघींकडे राहून त्याला फक्त बास्केट मध्येच जायची परवानगी असे. प्रतिस्पर्धी पक्षाला हे माहीत होतं, म्हणून आमच्या दोघींच्या भोवती विरुद्ध पक्षाची एक फळीच उभी केली जायची. खूप मजा यायची. अथलेटिक्समध्ये पण, पहिले तीन राऊंड सावकाश पळून शेवटच्या राऊंड साठी स्टॅमिना ठेवण्याची पद्धत आम्हा दोघींची. कधी ती पहिली तर कधी मी. पण कधीही दुसऱ्या कॉलेजला आम्ही पहिला आणि दुसरा नंबर घेऊन दिला नाही.


आमच्या दोघींचा डिस्ट्रिक्टनंतर स्टेट आणि आता नॅशनलसाठी सिलेक्शन झाले होतं. नॅशनल प्लेयर म्हणजे एक गोळाबेरीज असायची. विविध प्रांतातले प्रख्यात खेळाडू मिळून नॅशनल टीम तयार व्हायचे. प्रत्येक वर्षी नॅशनल च्या आधी आम्हाला तयार करण्यासाठी विशिष्ट कोच यायचे. बहुतेक सगळे शिक्षक मध्यमवयीन असायचे, पण या वेळेस मात्र अमीर बेग हा तरुण आम्हाला प्रशिक्षण द्यायला आला होता आमीर स्वतः नॅशनल चॅम्पियन होता, आणि आता खेळाडूंचा फिटनेससाठी म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.


खेळाडूंमध्ये जात-पात, रिलिजन, धर्म असं काहीच नसतं, खेळ ही जात आणि धर्म. अमीर आल्यानंतर आमच्या टीममध्ये जरा वेगळीच हालचाल झाली. त्याचे ट्रेनिंग उत्तम होतं, फिटनेसवरती त्याचा भर असायचा, एवढेच काय तर आमच्या जेवायच्या वेळेसदेखील तो लक्ष ठेवून असायचा की आमच्या कॅलरीज बरोबर येतात की नाही. हाताचे मसल्स, पायाचे स्नायू, मांडीचे, पोटरीचे स्नायू, बळकट कसे बनवायचे, पडतानादेखील कसे पडायचे की आपल्या शरीराची हानी कमीत कमी होईल, हे सगळेच आम्हाला नवीन होतं. त्यामुळे टीममधल्या मुली अमीरमध्ये फारच रस घेऊ लागल्या. कॉलेजची शेवटची दोन वर्ष अशीच भुरकन उडून गेली. स्टेडियम, बास्केटबॉल, मॅचेस, अभ्यास, त्याच्यामुळे इकडे-तिकडे बघण्यासाठी मला वेळ नव्हता. कधीकधी वाटायचं हे अभ्यास सोडून फक्त खेळाकडे लक्ष द्यावं, नॅशनल प्लेयर म्हणून जर सतत राहिले, तर कुठेतरी चांगला जॉब पण मिळेल. सीएस व्हायची काय गरज नाही.


आजी म्हणायची, "अशी किती वर्ष खेळू शकशील? एकदा का लग्न झालं, संसार, मुलेबाळे, मुलींचे खेळ वगैरे मागेच पडतात. अभ्यासाकडे लक्ष दे,

 बास्केट इन करताना कसं लक्षपूर्वक करतेस ना, असंच अभ्यासावरदेखील कॉन्सन्ट्रेट कर. सीएस झालीस ही चांगली नोकरी मिळेल. उत्तम आयुष्य जगशील."सीएस व्हायचं म्हणजेदेखील फारच कठीण होतं, 1,1 ग्रुप सोडवता सोडवता नाकीनऊ यायचे.


आमचं मध्यमवर्गीय घर, अभ्यासावर अतिजास्त भर. मी देखील ठरवलं होतं, आई बाबा आणि आजी योग्य सल्ला देता येत ना, त्यांचा ऐकायचं, खूप मेहनत करायची. मेघादेखील अभ्यासामध्ये मेहनत करायची. पण कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला, स्टेडियममध्ये जाणं जास्तच वाढलं होतं. आमच्या ग्रुप प्रोजेक्ट, किंवा ग्रुप स्टडीसाठी ती कधीच येत नसे. शेवटीशेवटी तर अभ्यासाच्या नावाखाली तिने कॉलेजमध्ये येण्यास सोडलं. एक-दोन वेळा फोनवरती विचारलं, तर म्हणाली घरी बसूनच अभ्यास करते.


  स्टेडियमच्या नावाखाली बाहेर पडणारी मेधा, आमिरला भेटायला जात होती. त्याच बास्केटबॉल खेळ, त्याच्या हाताचे स्नायू, त्याची एकंदरीतच

शरीरयष्टी, मेघाला या सगळ्या गोष्टीची भुरळ पडली होती. त्यांच्या भेटीगाठी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला फारच वाढल्या. आमची टीम जेव्हा बाहेरच्या प्रदेशांमध्ये खेळण्यासाठी जात, तेव्हा मेधा आणि आमीर दोघेजण वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये जाऊन बसत ते परतच येत नसत. बास्केटबॉल कॅप्टन असल्यामुळे अमीर सर तिला खेळाच्या विशिष्ट सूचना देत आहेत, असे मेधा म्हणत असे.


माझं लक्ष सीएस पुस्तकामध्ये असल्यामुळे मी काही कधी तिच्याकडे लक्ष देत नसे. आमीरच्या गोड बोलण्यावर मेधा पूर्णपणे फिदा झाली होती. एवढेच की शेवटचा पेपर झाल्यावर ती कोणालाही न सांगता घरातील दागिने घेऊन पळून गेली होती. आमीरने तिचे धर्मांतर करून तिला आपली बायको म्हणून घरी नेले होते.


आतापर्यंतचे गोड दिवस संपले. आता मात्र मेघाला घराबाहेर पडण्याचीदेखील मुभा नव्हती. मेघाचं नाव बदलून ती आता शायना झाली होती. गेले दोन वर्ष तिने भरपूर छळवाद सोसला होता आणि आमिरच्या पहिल्या बायकोची जणूकाही ती नोकर झाली होती. अमीरचे तिच्यावर प्रेम असले तरीही कुटुंबप्रमुखासमोर तो हतबल होता, मेघाला पश्चात्ताप झाला होता पण फार उशीर झाला होता. या दुष्टचक्रातून तिची सुटका होत नव्हती. तिला काळजी वाटत होती की तिला होणाऱ्या बाळाचे काय आणि कसे होईल.


परत परत म्हणत होती,"मला खूप भीती वाटते गं, मी काय करू? आई-वडिलांनी घर तिच्यासाठी बंदच केले होते. तिच्या कुटुंबामधली कोणीही तिला विचारत नव्हते आणि आमिरच्या कुटुंबामध्ये तिची जागा एखाद्या नोकरासारखी होती. काय होईल आता.? 


नोकरी शोधण्याच्या बहाण्याने ती घराबाहेर पडली होती, आणि तिची परत घरी जायची तयारी नव्हती. मेघाला मदतीची गरज आहे.


तरुण मुला-मुलींमध्ये जीवनसाथी निवडताना हा विचार का येत नाही, खरंच आपण ज्याच्यावर प्रेम करतो तो आपल्याला व्यवस्थितरित्या वागवेल? प्रेम हे फक्त क्षणभंगुर आहे? आपण ज्याच्याबरोबर पळून जाणार आहोत त्याची खरोखरच तेवढी लायकी आहे? आपल्या वागणुकीमुळे आपल्या आई-वडिलांवरती किंवा कुटुंबावरती काय परिणाम होणार आहेत? आपल्या पुढच्या पिढीचे काय?" जर त्या जमातींमध्ये बाहेरून आलेल्या मुलींच्या धर्माला काही जागाच नसेल तर तिथे लग्न करावेच का? का निकाह नाम्यावरती सही केल्यावर ती मुलगी पूर्ण स्वातंत्र्य गमावून बसते? 

तरुणपणाच्या निसरड्या वाटेवरून चालताना जरूर कोणाचातरी सल्ला घ्यावा की आपण काय करतोय ते बरोबर आहे की नाही. नाहीतर त्यांच्या वाट्याला भय इथले कधी संपतच नाही...


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy