भावना
भावना


शेवटाची चाहूल कधीच लागलेली..
अगदी पुढच्या क्षणी ही खेळ खल्लास होऊ शकतो,
सतत ही भीती....
जो ह्या वेळी जवळ हवाय, तो तर स्वतः मध्येच मग्न..
म्हणून येणारा प्रत्येक क्षण जणू खायला येतोय ही भावना....
करावं काय तिनं ह्या वेळी??
समोरच्या तबकडीवर निरंतर एक गाणं ऐकत रहावं..
"कैसी ये ज़िंदगी, कि साँसों से हम ऊबे
कि दिल डूबा, हम डूबे
इक दुखिया बेचारी, इस जीवन से हारी........"
प्रत्येक शब्दाला काळजाला चरे पडेपर्यंत आत घुसू द्यावं....
जास्तच असह्य झालं की डोळे पुसून घट्ट मिटून घ्यावेत,
पुन्हा उघडायलाच नकोत ह्या अपेक्षेने….
ती काय नि मी काय
चेहरे बदलतात फक्त
भावना नाही...…
तिच्यासारखेच डोळे घट्ट मिटून घ्यावेत,
हेच गाणं हेडफोन घालून फुल्ल आवाजात लावून द्यावं...
ऐकत राहावं पुन्हा पुन्हा...
पुन्हा पुन्हा…
पुन्हा मध्येच कधीतरी जाग यावी,
अरेच्चा 'आहे अजून' म्हणून हसावं गालातल्या गालात....
मध्येच कधीतरी गुणगुणावं....
"जब हम ना होंगे, जब हमारी खाक पे तुम रुकोगे, चलते-चलते
अश्कों से भीगी, चांदनी में, इक सदा सी सुनोगे, चलते-चलते"
आणि...…
चेहऱ्यावरच्या मंद मंद हास्यासहीत झोकून द्यावं स्वतःला,
त्या कायमच्या चिरनिद्रेत....