Sushma good Chavan

Drama Others

3  

Sushma good Chavan

Drama Others

भातुकलीच्या खेळामधले राजा,राणी

भातुकलीच्या खेळामधले राजा,राणी

3 mins
11.7K


आरती प्रेमळ अण खुप लाघवी मुलगी , दिसायला सुंदर, शिकलेली,  तशीच सुभानरावांचि लाडकी , सुभानराव म्हणजेच असगळ्याचे अण्णा  कोल्हापूर जिल्ह्यातले एक सुप्रसिद्ध आणि सधन शेतकरी, तसेच एक सामाजिक कार्यकर्ते, सामाजात त्यानां खुप मानसन्मान आहे,

    आज आरतीचा साखर पुडा , कोल्हापूरच्या प्रसिद्ध राजकिय घरातील विक्रमराज यांच्यबरोबर, विक्रमराज सुध्दा दिसायला देखना शिक्षण पूर्ण करुन घरातली व्यवसाय हातभार लावत होता, आरती आणि विक्रमराज यांचा जोडा खुप शोभत होता, 

  पण या सगळ्यात आरतीच्या चेहर्यावर मात्र उदासीनता होति , तिचे अश्रूंनी भरलेले डोळे राहुलला शोधत होते, 

     राहुल तिच्या दूरच्या आत्याचा मुलगा, साधारण दहा वर्षाचा असताना त्याचे वडील वारले, घरची परीस्थीती हालाकिची होती, म्हणुन सुभानराव त्याला आपल्या बरोबरच आपल्या घरी घेऊन आले, 

    राहुल अभ्यासात हूशार होता मेहनती होता, तो येथे हळूहळू रुळु लागला घरात कुटुंबातील एक घटक बनला, पण त्याच बरोबर त्याचा अंगात एक बुजरे पणा आला , आपण बर आण आपली शाळा बरी असा तो घरात रहात असे, कोणी काहीही काम सांगितले तरी लगेच तो ते करत असे, हळूहळू वया बरोबरच त्याचा स्वभाव अजून शांत अण समजदार होत चालला होता, आपण या घरातील आश्रीत आहोत, आपल्यावर या घराचे खुप उपकार आहे, असे त्याच्या वागण्यात दिसत होते, 

      आरतीला मात्र तो आपला सवंगडी वाटायचा, ति त्याच्या बरोबर खेळत असे , शाळेत बरोबर जात असे मळ्यात जाताना बरोबर जात असे, आपण या घरात परके आहोत असे राहुलला अजीबात वाटू नये असे प्रयत्न आरती करत असे, हळूहळू त्यांची खुप चांगली मैत्री झाली ,

            राहुल आणि आरती बरोबरच मोठे होत होते , राहुल अण्णाला बर्याच कामात मदत करत असे, तो त्याचा विश्वासातला होता घरचा होता,  ते बिन्दिकत त्याला कुठलीही जबादारी देत असत आणि तो पण ति जबादारी मोठ्या निषटेने पार पाडत असे, त्यामुळे तो आण्णाचा हि खुप लाडका झाला ,

     

 पण बालपण सरताणा आरती काळजी घेता घेता कधी राहुलच्या प्रेमात पडली ते तिला देखील कळाले नाही, ति त्याच्या जेवणाच्या वेळा संभाळायला लागली, त्याला कधी काय लागतं , कसं काय आवडतं याकडे पहिल्या पेक्षा जास्त लक्ष देऊ लागली,

   राहुलला पण आरती आवडत होती त्याला तिच्या वागण्यातला फरक दिसत होता, त्याची काळजी करणारी आरती त्याच्या समोर आली कि लाजत होती. डोळ्यांनीच काहीतरी सांगत होती , पण आपल्याला यातलं काहीच कळत नाही असं तो दाखवत होता, तिच्या पासून लांब लांब राहत होता,

आणि अचानक एके दिवशी विक्रमराज्यांच मागनं अलं आणि एकाच बैठकीत आरतीच लग्न ठरलं, घरात सगळे खुप आनंदी होते, आरतीला तर काय करावे हेच समजत नव्हते, सगळ्यांना वाटले लाजतीये अचानक सगळं झाल्यामुळे गांगरली आहे,

     हे येवढ अचानक झालं कि दोघांन पुढे काहीच उपाय नव्हता, तो आपले दुखं दुर ठेऊन अण्णांना साखर पुड्याच्या कामात मदत करत होता,

         आज साखरपुडा आहे , वधु वेषातिल आरती डोळ्यातील पाणी पुसत देव दर्शना साठी गावाबाहेरच्या मंदिरात निघाली, आणि नेहमी सारखं अण्णांनी राहुलला गाडी घेऊन तिच्याबरोबर पाठवले, मंदिराच्या आवारात पोचल्यावर आरतीने संयम सोडला आणि राहुलला म्हणाली तुला खरच कळाले नाहीका कधीच कि मि तुझ्यावर प्रेम करते , मला वाटलं होतं तु बोलशील. मला प्रपोज करशील, आण्णा तुला पसंत करतात ते लगेच हो म्हतील आणि आपले लग्न होईल, पण येवढं बोलून ति रडायला लागली तिला या पुढे बोलणे बिलकुल शक्य नव्हते, 

            त्याने तिला शांत केले प्यायला पाणी दिले आणि तो बोलु लागला म्हणाला " आरती तु माझी सगळ्या जास्त जवळची व्यक्ती, मैत्रीण आणि सगळं काही, पण आण्णाचा विच्यार कर त्यांनी माझ्या सारख्या आश्रीताला जीव लावला आपल्या पोटच्या मुला सारखं संभाळलं, माझं शिक्षण केलं, मला त्यांच्या विश्वासाला तडा जाईल असं काहीच करायचं नाही, माझ्यावर त्यांचे खुप उपकार काहेत, आणि आपण दोघेही त्यांची माण खाली जाईल असे कधीच वागणार नाही, तु लग्न करुन सुखी हो, माझे पण सुख त्यातच आहे, चल आता उशीर होतोय, घरी सगळे आपली वाट पहात असतील,"  आणि दोघे देवदर्शन घेऊन घराच्या दिशेला निघाले, 

  दोघांच्या मनात त्यांचे एके काळचे आवडते गाणे येत होते

, " भातुकलीच्या खेळा मधले राज्या आणिक राणी, "

           



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama