Sushma Chavan

Inspirational Others

4.0  

Sushma Chavan

Inspirational Others

अग्नीपरीक्षा

अग्नीपरीक्षा

3 mins
346


एक दिवस अचानक बाबा गेल्याचा फोन आला दोन तासाचा प्रवास करून मि आणि हे गावाकडे गेले जाताना गाडीत सतत माझं रडणं चालू होतं बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येत होता त्यांच बरोबर आई, आणि छोटी आई ही डोळ्यासमोर येत होत्या, मी घरात पोचताच त्या दोघी आणि दादा एकदम गळ्या पडून रडू लागले बाबांच्या जाण्याने आम्ही सगळेच खुप दुःखी झालो , संपुर्ण घर उदास झाले होते पण छोटीआई मात्र पुर्ण पणे बदलली होती सतत शांत बसून होती खाण्यापिण्यात तिचे बिलकुल लक्ष नव्हते सतत कसल्यातरी काळजीत , विच्यारात दिसत होती ,

 

बाबांचे सर्व कार्य झाल्यावर मि घरी परत येताना आईला आणि छोट्याआईला माझ्या बरोबर काही दिवसान साठी घेऊन आले आई हळू , हळू सावरत होती पण छोटीआई मात्र अजूनच उदास होत चालली होती तसं पाहता बाबा आणि आई जास्त जवळ होते कोठे बाहेर जाताना फिरायला जाता दोघे बरोबर असायचे, आम्ही छोट्याआईला कधीच बाबांन बरोबर जास्त बोलताना किंवा बाहे कुठेच जाताना नाही पाहिले आता तिच शांत होणे जरा जास्त जानवत होतं , 


मी एक दिवस तिच्याशी बोलायला गेले तिचा हात हातात घेतला आणि बोलू लागले छोटीआई कसली येवढा काळजी करतेस काही असेल मनात तर बोल मोकळे पणाने ति म्हणाली तुझे बाबा गेले आणि मला एकदम माझ्या डोक्या वरचा वडील धारा हात गेल्या सारखे झाले, बेटा तु आणि दादा लहान होता तेव्हा तुझ्या आईला म्हणजे माझ्या ताईला एक अपघात झाला होता बर्याच ठिकाणी जखमा आणि फ्रयाक्चरस झाले होते त्यात तुम्ही दोघे लहान होतात , अश्या वेळेला तुमची आणि ताईचि काळजी घ्यायला कोणी पाहीजे होते, माझे नुकतेच लग्न झाले होते ,मि सासरच्यांचि परवानगी घेऊन तुमची काळजी घ्यायला आले जवळ ,जवळ दिड महिना मि ताई कडे राहिले तिला बरे वाटू लागल्यावर तुझ्या बाबांनी मल घेऊन जाण्याचा निरोप दिला पण ते आलेच नाहीत ,मग अरे दिवशी तुझे बाबीच मला सासरी घेऊन गेले पण सासरच्यांनी मला घरात घेतले नाही , माझ्या नवर्याने साफ सांगितले येवढे दिवस तुमच्या कडे राहीली आणि आता तुमचं मन भरलं तर माझ्या सोडताय तुझ्या बाबांनी खुप विनवन्या केला मि शुध्द आहे म्हणून शपता घेतल्या , माझ्या वर केलेल्या अपोपांनी मि तुझे बाबा आणि आई पुर्नपणे कोलमडून गेलो मि आणि ताई नुसत्या रडत बसायचो, आणि तुझे बाबा काळजी नी खंगत चालले होते त्याच्या मुळे माझे आयुष्य ऊदवस्त झाले असे त्यांना वाटत होते , 


आपल्या दोन्ही मुलींची काळजी वाटत होती म्हणनून माझ्या वडिलांनी एक उपाय सुचवला आणि तुझ्या बाबांच्या आणि ताईच्या संमतीनेच माझे आणि तुझ्या बाबांचे लग्न झाले , हे लग्न फक्त एक तडजोड होती माझ्या आयुष्या साठी , कारण आमचे नाते येवढे शुध्द असुनही माझ्या नवऱ्याने ते समज़ुन नव्हते घेतले तेथे समाज काय घेणार होता त्या साठी त्या नात्या लग्नाचे लेबल लावने गरजेचा होते , पण या लग्ना नंतरही आमचे नाते शुध्दच होते आणि त्याच मुळे ते गेल्यावर माझा आधार गेल्या सारखे वाटू लागले आहे मला , मि तीला जवळ घेतले आणि तिला सांगितले हे बघ तु कसलीच काळजी करू नको मि आणि दादा आहोत ना आम्हाला जशी आई आहे तशीच आमची छोटीआई आहे आमच्या प्रेमावर तुझा ही तेवढा हक्क आहे , 

 आपला समाज कसा आहे ना त्याने सीतेला सुध्दा लंकेतुन परत आल्या वरती अग्नीपरीक्षा द्यायला लावली होती आणि माझ्या छोट्याआईने तिच अग्नीपरीक्षा आयुष्यभर दिली... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational