Sushma Chavan

Fantasy Others

4.0  

Sushma Chavan

Fantasy Others

अद्रूश्य : एक शक्ती

अद्रूश्य : एक शक्ती

2 mins
307


अवि माझा मुलगा  दिसायला अगदी गोड , अभ्यासात हुशार कॅलेजला जयला लागला तेव्हा केवढा आनंदी असायचा ,

 मागचे सहा महिने झाले काही वेगळा वागायला लागलाय , सतत घाबरलेला असतो कॅालेज मधून आला कि स्वताला रूम मधे जवळ ,जवळ लॅाकच करून घेतो , डोळे खोल जाऊ लागले , चेहर्यावरचे हसू तर केव्हाच गायब झाले, काय झाले आहे काहीच कळत नाही , त्याच्या काळजीने जीव तुटतोय पण विच्यारले तर काही सांगतही नाही , 

 आजहि तसाच घाबरलेला घरात धुसला आणि आपल्या रूममध्ये गेला , त्या रात्री मि देवाला अगदी विनवनी केली " देवा मला फक्त एक दिवस अद्रूश्य होण्याचि शक्ती दे. माझ्या मुलाला मला परत आनंदी झाले पाहू दे , देव पण माझ्या वर प्रसन्न झाला आणि एक दिवसा साठी मला अद्रूश्य होण्याचि शक्ती दिली.

दुसर्या दिवशी सकाळी मि अविच्या मागे निघाले. मि कोणीलाच दिसत नव्हते.

 अवि कॅलेजच्या जवळ तर गेला पण कॅलेज मधे न जाता तो शेजारच्या एका हॅाटेलच्या मागे गेला , तेथे एक जुनाट आणि अगदी कमी लाईट हॅाल होता, तिथले द्रुष्य पाहून तर माझे सगळे अवसान गळाले , 

तेथे अगदी अठरा ते त्या पासून सगळ्याच वयाचि मुले, मुली , वेग ,वेगळी वेसने करत होती , अंमली पदार्थाच्या सेवनाने अगदी अर्थ मेली होऊन पडलेले कित्येक जन होते , तर काही मुलांना जबरद्स्तीने अंमली पदार्थाची इंजेक्शन दिली जात होती  ज्याच्या जवळ पुरेसे पैसे नव्हेत ते अगदी गया वया करत होते , हे सगळे पाहून मन सुन्न झाले , 

 

पण लगेच मोबाईल फोन मध्ये सगळे शुटींग केले मला माहिती होते हे शुटींग मि पोलीसांना दाखवले तर माझा " अवि " यात अडकेल पण मला हे सगळे करावेच लागणार होते माझ्या मुला साठी व ईतर अनेक मुलानं साठी आणि माझ्या सारख्या असंख्य पालकांन साठी , 

 

संध्याकाळी "अवि" घरी आला तेव्हा त्याला प्रेमाने जवळ बोलावले त्याला विश्वासात घेऊन सगळे सांगितले शुटींग दाखवले तसा तो रडायला लागला आणि आपल्याला कसे जबरदस्तीने वेसन लावले व कसे ब्लॅकमेल करून अंमली पदार्थ ठराविक ठिकाणी पोहचवायला लावतात याची संपूर्ण हकिकत सांगितली , व यातून सुटण्या साठी व्यसन मुक्ती केंद्रात यायलाही तयार झाला होता आता त्याच्या बरोबर त्यांच संपुर्ण कुटुंब होतं ,

 सकाळी आम्ही दोघे पोलीस स्टेशनवर निघालो आणि अविच्या सांगण्या वरूण अनेक तरूण , तरूणी आमच्या बरोबर तक्रार करायला आले , 

 सबळ पुरावे असल्या मुळे पोलीसांना लगेच करयाई करायला सोपे गेले , 

 मला जे एकदिवस अद्रूश्य होण्याचे वरदान मिळाले त्या मुळे कित्येक घरात आनंद परत आला आणि कितीतरी विद्यार्थी व्यसनाधिन होण्या पासून वाचले  . 


माझी कथा वाचल्यावर आवडला तर लाईक ,फॅालो आणि कमेंट्स जरूर करा ,काही बदल सुचवावेसे वाटल्यास कळवावे .  


Rate this content
Log in

Similar marathi story from Fantasy