STORYMIRROR

Savita Tupe

Tragedy

3  

Savita Tupe

Tragedy

भाग ३ . वारस !

भाग ३ . वारस !

2 mins
233

 पोलिस पाटील साबळे बातमी कळताच तत्काळ तिथे पोहोचले . मृतदेहाचा पंचनामा करून त्यांनी , ती कोणाच्या ओळखीची आहे का ते जमलेल्या गावकऱ्यांना विचारले. कोणीच पुढे आले नाही .जो तो एकमेकांच्या तोंडाकडे बघत बसला .

  कोणाला काही कळल्यास सांगा , असे बोलून साबळे तिथून चौकीत गेले . मृतदेह पोस्ट मॉर्टम साठी पाठवला आणि पुढील तपासासाठी ते सक्रिय झाले .

  दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या मुलीचा रिपोर्ट आला . तिच्यावर पाशवी बलात्कार झाला होता आणि मग तिला विष पाजून नदीत फेकले होते .

 साबळे एकदम शॉक झाले .हे असं या गावात पहिल्यांदा घडत होतं . 

   चौकशी दरम्यान दोन दिवसांनी शेजारच्या गावातल्या चौकातून एक फोन आला की , तिथल्या एका गावकऱ्याने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे . तिचा फोटो ,आणि इतर माहिती मिळताच साबळे समजून गेले की ती हीच मुलगी होती .

  तिचे काही प्रेम प्रकरण आहे का ? ह्याचा तपास घेत असताना त्यांना कळले की , मुलगी एकदम सालस होती .घरकाम आणि रानातले काम या शिवाय कधी कुठे जात नव्हती .ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हा ती नदीवर कपडे धुवायला गेली होती . ती लवकर आली नाही म्हणून तिचे आईवडील तिला सगळीकडे शोधून मग चौकीत तक्रार नोंदवायला आले होते .

  खुप तपास करून सुध्दा साबळे यांना काहीच हाती लागले नाही . मुलीच्या आई वडिलांनी देखील जास्त सहकार्य केलं नाही . त्यांचं म्हणणं पडलं की , " आता काही केलं तरी मुलगी तर परत येणार नाही ."

   केस बंद झाली . गावाला विसर पण पडला या गोष्टीचा. गावकर्यांवरच भीतीचं सावट हळूहळू कमी होत गेलं .

  आणि बरोबर दोन महिन्याने पुन्हा अजून एका मुलीचा अश्याच पद्धतीनं बळी गेला .

    

क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy