अंजली (Anjali) बुटले (Butley)

Tragedy

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Tragedy

अपराधी भावना

अपराधी भावना

2 mins
1.7K



स्वःताच घर असावे म्हणुन धडपड चालू होती विकासची.

होम लोन घेवून स्वःताचे घर त्याने घेतले. पुढचा विचार करुन २ बीएचके फ्लॅट घेतला ज्याचे बांधकाम चालू होते.


लग्न झाले, २-३ वर्षात एक मुलगा झाला..

अजूनही घराचे बांधकाम पूर्ण झाले नव्हते. भाड्याच्याच घरात राहावे लागत होते. कर्जाचे हप्ते भरावेच लागायचे...


जबाबदारी, व घरातले खर्च वाढले होते... हाती येणारा पैसा व जाणारा पैसा यांचा मेळ बसत नव्हता.


खूप विचार करून विकासने ठरवले बाहेरच्या देशात जावून नोकरी करायची. बायको व मुलगा इथेच राहणार..

आपल्या स्वःताच्या घरात रहायचे स्वप्न पूर्ण करायचे होते न.


खूप लांब न जाता, त्यातल्या त्यात जवळचा देश म्हणुन दुबईची जॉब ऑफर स्विकारली.


रोज त्यांचे फोनवर बोलने व्हायचे.

वर्ष झाले... घराचे बांधकाम झाले नव्हते... 


 मुलाला शाळेत सोडायला बस लावली होती. रोज शाळेत जायला यायला बसने मुलगा जात असे.

आई स्टॉपवर त्याला घ्यायला जात असे.


 एक दिवस आईला समोर बघुन बसमधुन उतरला... बस चालकाच लक्ष नव्हते. काय होत आहे हे समजायच्या आत मुलाची जोरदार किंकाळीच ऐकू आली...

आई त्याला घ्यायला म्हणुन समोर झालेली ती पण खाली कोसळली...

एका क्षणात होत्याचे नव्हते झाले.


विकासला बोलवले, तो आला जड मनानेच सर्व सोपस्कार आटपले. नातेवाईंकाशी पण तो जास्त काही बोलला नाही...

परत कामावर रूजू झाला... मन कशातही लागत नव्हत.

२-३ वर्ष तो भारतात आलापण नाही.

घराचे हप्ते फेडत राहीला..


बिल्डरचा फोन आला... पण तो त्यांच्याशी पण बोलला नाही..


घर तयार झाले, ताबा व किल्लया घ्याला या.


एक दिवस तो आला किल्या ताब्यात घेतल्या.. बिल्डरचा माणुस त्याला घरा बद्दल माहिती सांगत होता. पण त्याचे लक्ष बोलण्याकडे नव्हते... 

आपल्याच विचारात मग्न होता... हातातल्या किल्या कधी एकमेकांपासून वेगळ्या झाल्या हे त्याला कळलेही नाही...

घराचे हप्ते फेडण्यासाठी दूर गेलेला तो... 

घरपण देणाऱ्या बायको मुलाला मुकला.


कसे टाकायचे पाऊल त्या नवीन घरात ? हा प्रश्न त्याला सतावत होता..

स्वःताचं घर आहे पण त्याला घरपण देणारी माणसे आता आपल्यात नाही ही अपराधी भावना त्याला छळत होती.


Rate this content
Log in