अपघातातून प्रेम बहरले..!
अपघातातून प्रेम बहरले..!


आज विवेकला कंपनीत निघायला जरा उशीरच झाला होता. विवेकच असं नेहमीच होतं त्याला सकाळी उठायला उशीर व्हायचा आणि अनेकदा त्याची कंपनीची बस सुटून जायची आणि मग त्याला त्याच्या मोटारसायकलने कंपनीत जावं लागायचं. विवेकच लग्न व्हायचं बाकी होत आणि जॉबसाठी तो शहरात एकटा राहत होता. तो एका खाजगी कंपनीत जॉब करत होता. आणि आज पण तो नेहमी प्रमाणे उशिरा उठला आणि तयारी करत करत त्याला बराच उशीर झाला होता. कंपनीची बस कधीचीच निघून गेली होती. आज विवेकला नेहमीपेक्षा बराच उशीर झाला. त्याची कंपनीची वेळ साडे नऊची होती. आणि रूम पासून त्याला कंपनीत जायला अर्धातास लागायचा. आज सव्वा नऊ ते रूमवरच झाले होते. कसं तरी घाई घाईत तो त्याची मोटारसायकल काढत तो कंपनीसाठी निघतो. रस्त्यावर बरीच ट्राफिक होती. अजून त्याला संताप येत होता की आधीच उशीर आणि अजून हि ट्रॅफिक. कसं तरी करत करत तो ट्रॅफिक पार केलं आणि उशीर झाल्या असल्याने मोटारसायकल खूप स्पीडने हाकत होता. सकाळी थोडासा पाऊस पडल्याने रस्ता ओला झालेला होता. अचानक काय झालं काय माहित त्याची मोटरसायकल स्लिप झाली. आणि विवेक मोटरसायकल पासून दूर पर्यन्त फेकला गेला. त्याला डोक्याला बरंच लागलं होतं आणि उजवा हाताला पण खूप लागलं होतं. तो पडला तसा लगेच बेशुद्ध झाला. त्याला काही लोकांनी जवळच असलेल्या सरकारी जिल्हा रुग्णलयात दाखल केले. त्याला बऱच गंभीर लागलेलं असल्याने त्याच्यावर ताबडतोब उपचार सुरु झाले. डोक्याला लागल्याने त्याला टाके पडले व उजवा हात फॅक्चर असल्याने त्या हाताला सिमेंट प्लास्टर दिले. जेव्हा विवेक शुद्धीवर आला तेव्हा त्याच्या नजरेसमोर एक सुंदर, सोज्वळ, एक मुलगी दिसली. ती नर्स कोमल होती. हो तीचं नाव कोमल होत तशीच ती सुंदर आणि कोमल होती. आणि विवेक ऍडमिट होई पासून तर शुद्धीवर येईपर्यंत कोमल त्याच्या जवळच होती. विवेक शुद्धीवर आला तसंच तिने विचारलं बरं वाटतय ना आता. डोकं खूप दुखतंय मॅडम.. अहो टाके टाकले आहेत ना म्हणून त्रास होतोय. थोडावेळ त्रास होईल पण हळूहळू त्रास कमी होईल. थांबा मी एक गोळी देते तुम्हाला त्याच्याने थोडा त्रास कमी होईल. तेवढ्यात त्याचे कंपनीचे मित्र पण दवाखान्यात पोहचले. विवेकशी विचारपूस करत होते तेवढ्यात नर्स (कोमल) औषध घेऊन आली. अहो थोडं आराम करू द्या त्यांना जास्त बोलू नका. आणि यांच्या घरचे नाही का कुणी आले अजून तेवढ्यात मित्रांनी त्या नर्स कोमल ला माहिती पुरवली की तो एकटा राहतो व आईबाबा गावाला राहतात. तेवढ्यात नर्स कोमल म्हणजे मग आता यांच्या जवळ आता कुणी थांबणार नाही..? तेवढ्यात विवेक नाही मॅडम मित्र थांबायचं म्हणतांयत पण मीच नाही म्हटलं.. कोमल ला वाईट वाटलं.. 'काही हरकत नाही तुम्ही काळजी नका करू आम्ही आहोत तुमची काळजी करायला.' कोमलने पण काय पाहिलं होत काय माहित विवेक मध्ये परत परत त्याच्या जवळ जात होती, काय त्रास होतोय का..? जेवण करता का..? आता दवाखान्यात विवेकला दोन दिवस झाले होते व विवेकला कोमल खूप आवडतं होती. कोमल पण त्याची खूप काळजी घेत होती. विवेकला राहून राहून विचार यायचा की हि नर्स (कोमल) एवढी काळजी का करते का ..? आता तर तिला विवेकने सांगितल्या पासून की माझे आईबाबा म्हातारे आहेत मी त्यांना नाही सांगितलं की माझा ऍक्सिडंड झाला आहे असं नाही तर ते खूप काळजी करतील गावाकडे.. हे एकल्यापासून आता तर विवेकचा डब्बा पण कोमल घेऊन येत होती. मॅडम तुम्ही का माझ्यासाठी एवढं करता अस विवेक कोमलला सांगत होता. तेव्हा कोमल त्याला म्हणायची की मी तुझी सेवा करते ते माझे कर्तव्य आहे एक नर्स म्हणून आणि तुला जेवायला डब्बा घेऊन येते ते एक माणुसकी म्हणून तुझे आईवडील गावाला आहेत तुझं इथे कुणी नाही म्हणून माणुसकी म्हणून माझं कर्तव्य आहे की तुला एवढी मदत करावी आणि तुला तिची गरज आहे. हे विचार ऐकून विवेला खूप बरं वाटतं आणि सहज कोमलला बोलून जातो की तुमचे विचार किती ग्रेट आहेत कोमल पण लाजत दुसऱ्या वॉर्ड कडे निघून जाते.. उद्या शेवटचा दिवस होता कारण विवेकला उद्या दवाखान्यातून सुट्टी मिळणार होती. आणि हे विवेकला नको होत कारण कोमलचा सहवास खूप हवा होता. पण विवेकच नाही तर या चार दिवसात कोमलला पण विवेक पण खूप आवडायला लागला होता. त्याच ते मनमोकळे पणाने बोलणं त्याच ते गालातल्या गालात हसणं. ती जी स्वप्नात जीवनसाथी साठी ज्याला पाहायची तो विवेकच तर नाही असं कोमलला वाटत होतं. सकाळी दहा वाजेला विवेकला सुट्टी मिळाली कोमलची ड्युटी नाईट होती.. इकडे विवेक रूमवर येतो.. पण त्याचं मन लागत नव्हतं कसा तरी दिवस जातो.. इकडे नाईट ला कोमल येते व चौकशी करते तर तिला कळते की विवकेला सुट्टी मिळली असं. पण तिची मैत्रीण तिला सांगत होती की विवेक जातांना तुला विचारत होता. तेव्हा तिच्या डोळ्यात एक आनंदाचा अश्रू आला आणि तिची मैत्रीण तिला म्हटली की विवेक सांगत होता की माझ्या बद्दल जर तिने विचारलं तर हा माझा नंबर तिला दे अस म्हणत कोमलला ती विवेकचा नंबर देते. व कोमल लगेच विवेकला फोन लावते विवेक पण तिच्या आठवणीत जागाच असतो. 'हॅलो, विवेला कसा आहेस..' 'मी बरा आहे गं पण तुझी आठवण खूप येत आहे..' ' मला पण खूप येतेय रे तुझी आठवण. तू औषध घेतली का..? ' 'नाही घेतली ग तुझ्या आठवणीने मी कासावीस होत होतो.' 'आता पटकन औषध घे बरं..
पण तू मला सकाळी भेटशील का..? ' कोमल विचार करत.. हो तू मला तुझा रूमचा पत्ता सेंड कर आपण उद्या भेटू.. कोमलला पण हेच पाहिजे होतं. दोघेजन खूप आनंदी होतात.. सकाळी कोमलची ड्युईटी संपते तिच्या घरी जाते फ्रेश वैगरे होऊन विवेकसाठी डब्बा घेऊन विवेकच्या घरी जाते. विवेक वाटच पाहत असतो. दारावरची बेल वाजते तशी पटकन दरवाजा उघडतो आणि कोमलला मिठी मारतो कोमल पण त्याला मिठी मारते आणि दोन तीन मिनिटं ते तसेच मिठीत राहतात.. एकमेकाला सावरून बसतात. विवेक तू मला खूप आवडतो मला राहून राहून वाटतं की मला जसा जीवनसाथी हवा होतो तो व्यक्ती मी तुझ्यात पाहते. तुझं बोलणं तुझे विचार मला खूप आवडतात... तू माझ्याशी लग्न करशील? विवेक थोडावेळ काहीच बोलत नाही, मी नाही आवडत का तुला कोमल विवेकला विचारते, तस नाही गं कोमल तू खूप सुंदर देखणी मुलगी आहेस. तुला पहिल्यांदा पाहताच मी तुझ्या प्रेमात पडलो. मला तर आनंदच होईल जर लग्न झालं तर पण मी एका खाजगी कंपनीत जॉब करतो व तू एक सरकारी कर्मचारी आहेस व माझ्या पेक्षा तुला तीनपट पगार जास्त आहे. म्हणून मी विचार करतोय. तेव्हा कोमल विवेकचा आत आपल्या हातात घेत विवेकला समजावते की आयुष्य जगायला फक्त पैसा लागत नाही किंवा संसारात पैसाच महत्वाचा नसतो. संसारासाठी एकमेकांवर प्रेम, एकमेकांचे विचार, एकमेकांना समजून घेणं महत्वाचं असतं. तुझा पगार कमी असला म्हणून काय झालं? मी आहे ना लग्न झाल्यावर माझं ते तुझंच राहणार आहे. आपलंच राहणार आहे म्हणून माझ्यासाठी तूझा पगार किती आहे ते मला महत्वाचं नाही. मी तुझ्या विचारांवर आणि तुझ्यावर प्रेम करते. असं म्हणत कोमल विवेकला मिठी मारते व विवेक पण कोमलला मिठी मारत दोघेही सुखी संसाराची स्वप्ने रंगवतात..