Ramkrushn Patil

Inspirational

1.5  

Ramkrushn Patil

Inspirational

आई वडिलांना वृद्धश्रमांत ..?

आई वडिलांना वृद्धश्रमांत ..?

5 mins
7.5K


आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतांय..?

प्रत्येक आई वडिल सतत मुलांबद्दल एक विचार करत असतात कि आपण आयुष्यात जेवढी मेहनत केली, जेवढा त्रास आपण भोगला हे सर्व आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये. आपले मुलं खूप शिकावीत व त्यांना चांगली नोकरी लागावी म्हणून ते बिचारे वेडी आशा घेऊन शहरात असेल तर कापड गिरणी किंवा इतर कुठल्याही ठिकाणी ग्रामीण भागात असतील तर शेतात राब राब राबतात व त्यांच्या जोडीला आई पण तेवडीच महत्वाची भूमिका बजावते तिला वाटते की खरंच माझा मुलगा खूप शिकावा असं म्हणून ती पण चार पाच घराची धुनी भांडी किंवा शेतात दिवस भर काम करते. जो तो रात्रदिवस काम करून आपल्या मुलांना लहानांच मोठं करतांना दिसतात. ते आपल्या मुलाला शाळेत घालतात, त्याला चांगले शिक्षण मिळावे त्याला चांगले कपडे मिळावे यासाठी आपले जीवाचं रान करतात अश्यातच त्यांचं आयुष्य जात. मुलं शिकतात कॉलेजला जातात व आपल्या आई वडिलांच्या मेहनतीच्या पैशावर तो मुलगा बूट, नवं नवीन कपडे अशी ऐश पेश जीवन जगतो व बिचारे आई वडील पण तेच स्वप्न पाहतात कि आपल्याला कितीही मेहनत करावी लागली तरी चालेल पण आपल्या मुलांचं जीवन चांगले जायला पाहिजे. मुलं चांगली शिकली पाहिजे व नोकरीला लागली पाहिजे व मुलं पण चांगली शिकतात व नोकरीला पण लागतात तेंव्हा आई वडिलांच्या मनाला कुठे तरी शांतता मिळते आपल्या मेहनतीला फळ आले अस त्यांच्या मनाला वाटतं. आता आपला मुलगा शिकला नोकरीला लागला आता त्यांना उत्सुकता असते त्याच्या लग्नाची मग त्याच्या शिक्षणा योग्य मुलगी पाहून आपल्या मुलाचे ते लग्न करतात मग आता आई वडिलांना जग जिंकल्यागत वाटत. थोडे दिवस सर्वकाही नीट व्यवस्थित चालत राहतं,

परंतु इथून तर खरं आयुष्याशी संघर्ष करायची वेळ आता ते म्हातारे झालेल्या आई वडिलांवर येते कारण घरात सुनबाई आल्यावर मग नवीन नऊ दिवस चांगले जातात मग सुरवात होते लहान लहान गोष्टीवरून सासू सुना मध्ये भांडण होतात. सुनेला मग ते म्हातारे बिचारे घरात सहन होत नसतात मग, मुलगा आई वडिलांनी एवढी मेहनत करून आपल्याला इथपर्यंत पोचवले व आपल्याला कधी दुसऱ्याच्या शेतात कामाला पाठवलं नाही हे सर्व बायकोच्या प्रेमापोटी हे सर्व क्षणात विसरून आई वडिलांना वृद्धआश्रमात पाठवण्याच्या निर्णय घेऊन टाकतो, मुलाची बायकोला तर खूप आनंद होतो की म्हातारे म्हातारी वृद्धआश्रमात जाणार म्हणून, एखादा किल्ला सर केला असे तिला वाटतं.

परंतु त्या आई वडिलांनी रात्रंदिवस जीवाचं रान करून मुलाला शिकवलेलं असतं इथं पर्यन्त पोचवलेलं असतं आणि तोच मुलगा आता त्यांना वृद्धआश्रमात पाठवण्याच्या गोष्टी करतोय याचा विचार करून त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन काय म्हणत असेल, किती दुःख होत असेल त्यांच्या हृदयाला. तरी ते बिचारे आई वडील वृद्ध आश्रमात जायला तयार होतात खूप जड अंतकरणाने वृद्ध आश्रमाची वाट धरतात. त्यांना आश्रमात जातांना खूप दुःख होत परंतु आपण वृद्ध आश्रमात राहून जर आपला मुलगा सुखी राहत असेल तर ते पण त्यांना मान्य असतं किती त्याग करतात ते आपल्या मनाचा फक्त आपल्या मुलांसाठी, मुलाच्या सुखासाठी आई वडील काहीपण करायला तयार होतात. परंतु मुलांना अस करतांना जरा पण दुःख होत नसेल का ? बायकोच्या प्रेमापोटी तो खूप आंधळा झालेला असतो. मी तर म्हणेन आपली संस्कृती काय आणि आपण आज आई वडिलांसोबत कसं वागतोय याचा विचार करायला हवा. पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धती असायची लहान मोठे करून वीस पंचवीस माणसं घरात राहायची, दिवसभर घरातली काम पुरायची आता ती संस्कृती कुठेतरी लोप पावतांना दिसत आहे. प्रत्येक जण आता आई वडिलांना वेगळं ठेऊन नवरा बायको राजा राणीचा संसार करू पाहत आहे, परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे आपलं काही अस्तित्व नाही जे काही आहे ते सर्व आपल्या आई वडिलांच्या कर्तृत्वा मुळे आहे आणि आपण ज्यांच्यामूळे आज इथपर्यंत आहोत त्यांनाच वृद्धा आश्रमात पाठवुन राजा राणीचा संसार कसा करू शकतो याचा विचार केला पाहिजे. आई वडिलांच्या उतार वयात आपण आधार बनलं पाहिजे. परंतु दिवसेंदिवस वृद्धा आश्रमाची संख्या वाढत चालली आहे. कारण कि आजच्या परिस्थितीत आई वडिलांना सोबत ठेवण्याची कुणाचीच ईच्छा दिसत नाही. मी अस अजिबात नाही म्हणत कि सर्व मुल सारखी असतात परंतु आई वडिलांना वृद्धा आश्रमात पाठवणाऱ्याची संख्या पण कमी दिसत नाहीय. वृद्धा आश्रमात जर आपण गेलात तर त्या म्हाताऱ्या आजी बाबांचा तो निरागस चेहरा पाहून आपल्याला रडायला येईल. त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्यावर कळतं की एका बाबांचा मुलगा डॉक्टर कुणाचा इंजिनिअर तर काहींची मुलं परदेशी नोकरी करतात. येतात वर्षातून एकदा भेटायला, बाकीचे महाशय तर त्यांना वृद्धा आश्रमात जसे टाकून परदेशात गेले तसे परत भेटायलाच येत नाही. काय म्हणत असेल हो त्या म्हाताऱ्या आई वडिलांचं मन, लहानपणी हेच आई वडील आपलं पोरगं शाळेतून उशिरा घरी आल नाही म्हणून सर्व गाव पालथं घालायची मुलाला शोधण्यासाठी, एक तास जरी उशिरा झाला तर मुलाला घरी येण्यासाठी तरी त्या आई वडिलांचं मन लागत नव्हतं आणि आज पोरगं मोठं झाल्यावर आई वडिलांना ढुकुन सुद्धा पाहायला येत नाही. खूप वाईट वाटतं हे सर्व पाहून, काही मुलं ठेवतात आई वडिलांना घरात पण त्यांना म्हातारपणात त्यांना नीट दिसत नसल्याने रात्री अपरात्री बाथरूमला जाण्यासाठी मुलाला उठवतात आणि आणि मुलाला या गोष्टीचा खूप राग येतो. रात्री उठायची कट कट नको म्हणून ते मुलं त्या म्हाताऱ्या आई वडिलांना रात्री पोटभर जेवण सुद्धा देत नाही कारण त्यांना रात्री त्रास नको म्हणून. खरंच खूप दुःख होत हे सर्व पाहिल्यावर. चार पाच दिवसांपूर्वी एका वर्तमान पत्राला बातमी वाचली होती की एका सोसायटी मध्ये आजी वारली होती व तिचा मुलगा व मुलगी परदेशात नोकरी करतात, त्यांना जेव्हा आजी राहत होत्या त्या ठिकाणच्या शेजारी राहणाऱ्या लोकांनी त्या मुलांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की आमच्या कडे वेळ नाही तुम्हीच त्यांचं अंतिम संस्कार करून टाका असं, काय म्हणावं या अश्या लोकांना आपली संस्कृती काय आणि आज आपण कसे वागत आहोत याच आत्मचिंतन करायला हवं. आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी किती वाईट दिवस काढले असतील ते आपण विसरू नये. आई वडिलांना वृद्धा आश्रमात पाठवण्या अगोदर दहा मिनिटं शांत डोक्याने विचार करून आपले लहानपणी त्यांनी आपल्यासाठी काय काय त्रास सहन केलाय तो आठवून बघा. नक्कीच आपलं मन परिवर्तन होईल बायकोला पण समजावून सांगा कि आपण आई वडिलांसोबत जे करतोय किंवा करायला जातोय हे योग्य नाही. नक्कीच असं केल्याने यांच्यातून मार्ग निघेल व आपले आई वडिलांना देवा सामान वागणूक दया त्याच्या उतार वयात त्यांना तुमची खूप गरज आहे. आई वडिलांची सेवा केल्याने पुढचे येणारे दिवस तुमचे नक्कीच चांगले येतील. नाही तर आई वडिलांना वृद्धा आश्रमात टाकून जर कुणी आनंदात राहण्याचं प्रयत्न करत असेल तर ते खूप चुकीच आहे असं करून तुम्ही आयुष्यात कधीच सुखात राहणार नाही एवढं मात्र नक्की आहे..


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational