STORYMIRROR

Amruta Gadekar

Inspirational Children

3  

Amruta Gadekar

Inspirational Children

अनुभव माणसाला खूप काही शिकवतो...!

अनुभव माणसाला खूप काही शिकवतो...!

2 mins
348

एक खूप श्रीमंत माणूस असतो. त्याच्याकडे ५-६ बंगले, महागड्या गाड्या त्याला कोणत्याच गोष्टीची कमी नसते. प्रत्येक दिवशी तो खुप सारा पैसा कमवत असे💳💰. एका रात्री त्याला नेहमीच्या वेळे पेक्षा लवकर झोप आली आणि तो झोपी गेला. सकाळी डोळे उघडले तर समोर यमराज उभे.👹 तो माणुस थोडा दचकला. यमराज म्हणाले चला आता तुमची जाण्याची वेळ आली आहे🕛. त्यावर तो माणुस खुप घाबरला आणि म्हणाला की मी तुम्हाला १० करोड रुपये देतो मला आजचा दिवस द्या. त्यावर यमराज म्हणाले की, तुम्ही तुमचा आणि माझा वेळ वाया घालवत आहात. तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. त्यावर परत तो माणुस म्हणाला मी तुम्हाला ५०💰 करोड रुपये देतो मला फक्त एक तास द्या. मला माझ्या कुटुंबाला एकदा भेटायचं आहे.👪 त्यावर परत यमराज म्हणाले की खरंच तुम्ही वेळ वाया घालवत आहात.तुम्हाला आत्ताच माझ्याबरोबर यावं लागेल. परत तो माणुस म्हणाला माझी सगळी संपत्ती मी तुम्हाला देतो मला फक्त ५ मिनिट द्या.त्यावर परत यमराज म्हणाले. तुम्हाला एक मिनिटही नाही देऊ शकत मी,तुम्हाला आता या क्षणाला माझ्याबरोबर यावं लागेल. तो श्रीमंत माणुस खुप रडू लागला आणि म्हणाला मला काहीच संकेड द्या मला माझ्या मित्रांना एक पत्र लिहायचं आहे. यावर यमराज म्हणाले हा लवकर लिहा जे लिहायचं आहे ते, त्यावर त्या श्रीमंत माणसाने लिहिलेलं ते पत्र.

     

 *आज माझ्याकडे खुप पैसा आहे. मला कश्याचीच कमी नाही आहे. पण तो पैसा काय कामाचा ज्याने मी माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा विकत नाही घेऊ शकत. मी माझ्या आयुष्यात एन्जॉय नाही करू शकलो. प्रत्येक दिवस, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट मी पैसा कामविण्यात घालवला. आज तोच पैसा माझ्या आयुष्यातला एक मिनिट सुद्धा मला देऊ नाही शकला. म्हणुन सांगतोय तुम्ही एन्जॉय करा. कुणी वेडा म्हटलं तरी चालेल पण आयुष्य बालपणासारख एन्जॉय करून जगा. शेवटी कमावलेल्या पैशाने सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझी साथ सोडली. जगा मनसोक्त जगा.*

     *मित्रानो माहीत नाही उद्या आम्ही असू की नसू म्हणून आज जे आपल्याकडे आहे ते भरभरून जगा. आयुष्यात पैसा तर नक्कीच कमवा पण तो एवढाही साठवून ठेऊ नका की आयुष्याची खरी मजा आपण कधीच घेऊ नाही शकत.*

 ➖➖➖➖➖➖➖

  *घरातून बाहेर पडताना आपल्या* *देवघरातील देवाला* *नमस्कार* *करूनच बाहेर पडा आणि घरी* *परत आल्यावरही देवाचं दर्शन* *घ्या. कारण तो भगवंत तुम्ही घरी* *यायची वाट पहात असतो.* *आपल्या घरी असा नियम बनवा* *की जेव्हा कधी तुम्ही घरातून* *बाहेर पडता, तेव्हा देवासमोर* *क्षणभर थांबून 'हे परमेश्वरा* *तुम्हीही माझ्यासोबत चला' अस* *म्हणां कारण* *- तुमच्या* *हातामध्ये* *भलेही* *लाखांच* *घड्याळ* *असेल परंतू त्यावर दाखवणारी* *वेऴ* *ही फक्त त्या* *भगवंताच्याच हातात आहे...*🌺🌺 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational