STORYMIRROR

Manisha Awekar

Comedy

1  

Manisha Awekar

Comedy

अन् मला हसू आले

अन् मला हसू आले

1 min
149

लॉकडाऊनमधे आम्ही चौघे म्हणजे माझा नातू अनुराग, सून गौरी, मी आणि माझे मिस्टर रोज दुपारी कॅरम खेळतो.

खेळात मजा येण्याचे कारण अनुरागला छोट्या छोट्या गोष्टींनी हसू येते. त्याला साथ दिली की तो अजून हसतो. दिवस हसतखेळत जातो.


माझे मिस्टर सोंगटी जावी म्हणून जोरात मारतात त्याने सोंगटी जाते पण ड्यू होतो. मी लहानपणी डिव डिव डिव डिव णिव णिव णिव णिव असे म्हणायची. आता तसेच गाऊन म्हटल्यावर मला व अनुरागला एकदम हसू येते व त्या आनंदातच आम्ही त्यांची सोंगटी काढतो.


जवळची सोंगटी घेताना माझे मिस्टर कोपर आत जाईपर्यंत ढकलून सोंगटी घेतात. तेव्हा ओ ढकलम ओ ढकलम असे मी म्हटल्यावर मी व अनुराग यांच्याकडे बघून पोट दुखेपर्यंत हसतो.


अनुराग लहान आहे. सहाच वर्षाचा आहे. आख्खा दिवस घरात काढायचा असतो. या विनोदांनी हसण्यानी घरातले वातावरण हसरे खेळकर व आनंदी राहाते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Comedy