kanchan chabukswar

Tragedy

4.0  

kanchan chabukswar

Tragedy

अघटित

अघटित

3 mins
205


अकाल मृत्यु हरणम, सर्व व्याधी विनाशनम,

गुरु पादु पादौदकम तिर्थम, जठरे धारियामी हम.

राम रक्षा म्हटल्यानंतर थरथरत्या आवाजात सासूबाईंनी नेहमीचा मंत्र म्हटला. आमच्या सगळ्यांच्या हातावरती रामरक्षेचा तीर्थ घातलं. केवढा गुढ अर्थ होता या मंत्रांमध्ये. अकाल मृत्यु हरणं---- कोणाचाही अकाली मृत्यू होऊ नये. असा विचार मनात येतोच तोच फोन वाजला.


पलीकडून असिस्टंट टीचरचा फोन होता. "वाईट बातमी आहे..."

"अरे बापरे, सगळे ठीक आहेत ना?" माझा सवाल,

"फारच वाईट बातमी आहे, दहावी ब मधला राहुल विसाव्या मजल्यावरून पडून गेला.".... टीचर म्हणाली.

"असं कसं? विसाव्या मजल्यावरून पडलाच कसा? यांच्या बाल्कनीला ग्रील नसतो का?" मी विचारले.

"अजून नक्की काही कळलं नाही, सकाळी शाळा त्याने नेहमीप्रमाणेच हजेरी लावली होती, दुपारी पालकांबरोबर पण भेट झाली होती, राहुल व्यवस्थित अभ्यास करत होता, कुठलीही तक्रार नव्हती. आई-वडील समाधानी होते. कोविडच्या महामारीमुळे गेले दीड वर्ष सगळ्या शाळा ऑनलाईन पद्धतीने चालू होत्या. मुलं घरात कंटाळली होती. त्यातून राहुल तर एक उत्तम फुटबॉल पटू. घरातल्या घरातच खेळायचा. त्याची आई आणि वडील त्याला कुठे जाऊ देत नव्हतं नव्हते."


" अगं, पण घरातून कसं काय कोणी पडेल? आणि कळलं कसं?" माझा सवाल.


"राहुल हॉलच्या बाल्कनीतून खाली पडला, पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनी वरती बरंच मोठं प्लास्टिकचे शीट घातलेलं होतं. त्याच्याखाली डेकोरेटिव्ह काचेचे तावदान लावलेलं होतं. एवढ्या उंचावरून पडल्यावर ती, तो काचेवरती आदळला, जोराचा आवाज झाला म्हणून पहिल्या मजल्याच्या फ्लॅटमधल्या आजोबांनी डोकावून बघितले तर त्यांना कोणी तरी पडलेले दिसले. ताबडतोब वॉचमनला बोलवलं, आणि राहुलच्या घरी इंटरकॉमवरून फोन केला. फोन बराच वेळ वाजत राहिला, राहुलची आई गाढ झोपेत होती. काळ झोप म्हणतात ना तशी. त्याची आई भयंकर शॉकमध्ये आहे. तिला कळलेच नाही, मुलगा कधी खाली पडला." टीचर म्हणाली.


शाळेमधल्या टीचर, राहुलचे दोस्त सगळे भयंकर तणावाखाली आले. ही काय आत्महत्या नव्हती, कारण तसं काही कारणच नव्हतं. मग काय झालं असेल?


एवढ्या उंच इमारती बांधून, गॅलरीला ग्रील नव्हतं, काचेची तावदाने, कमरेपर्यंतच्या उंचीची, खाली पडायला वाव होता. कसले फालतूचे डेकोरेशन, आणि कसले नियम?


राहुलचा फोन बाल्कनीमध्ये पडलेला होता. त्याच्यावरती फुटबॉल ट्रिक्स प्रोग्राम चालू होता/ कसले तर फुटबॉल ट्रिक्स, खुर्चीवर उभे राहून उडी मारून उलटकडून बोलला ठीक किक मारायची, उलट्या उड्या, हवेतल्या हवेत फुटबॉल खेळवायचा, डोक्यावरती, छातीवरती, आणि मग मागे वळून, हळूच बोलला मागच्या मागे किक मारायची. सगळे स्टंट्स. अशीच काहीतरी प्रयोग बहुतेक बघत बघत राहुल करत असावा.


शाळा संपल्यावरती जेवण झाल्यावरती राहुल आणि शेजारचा मुलगा एकत्रच व्हिडिओ गेम खेळत होते, दोघेही फुटबॉल प्लेअर, मित्राच्या घरामध्ये बरेच उलटेपालटे ट्रिक्स करून त्यांचा खेळ चालू होता, तेवढ्यात मित्राचे आईवडील घरी आले आणि मग राहुल परत आपल्या घरी आला. पोलिसांनी मित्राला पण विचारले की नक्की काय बघत होते? मित्राच्या पण मोबाईलमध्ये तसाच व्हिडिओ गेम होता आणि तशाच फुटबॉलच्या ट्रिक्स होत्या. राहुलचा मित्र उंचीने बुटका होता त्यामुळे त्याला खुर्चीवर उभे राहून प्रयत्न करावे लागायचे, पण राहुलचा तसं नव्हतं राहुलची उंची पाच फूट आठ इंच होती, खुर्चीवर उभे राहून उडी मारल्यावर त्याचं डोकं सरळ सिलिंगला लागत होता, हॉलमध्ये झुंबर, आणि बाकीच्या नाजूक गोष्टी असल्यामुळे राहुल बाल्कनीमध्ये प्रॅक्टिस करत असे. बालकनी बरेच उंच असल्यामुळे राहुलला उड्या मारायला काहीच अडचण नव्हती.

पोलिसांना बाल्कनीमध्ये, झाडाची कुंडी उलटी ठेवलेली दिसते, म्हणजे राहुल त्याच्यावरून उड्या मारत होता. बाल्कनीच्या काचेवरून दरवाजापर्यंत एक आडवा लावलेल्या बांबू होता, उंच उडी खेळामधली मुलं बांबू वरून कशी उड्या मारत, तशी काहीशी प्रॅक्टिस तर राहुल करत नव्हता? बाल्कनीची काच कुठेही फुटली नव्हती, फुटबॉल पण तसाच होता, एका पोलिसाने कुंडी वरती उभा राहून उडी मारायचा प्रयत्न केला, त्याला बाकीच्यांनी पकडले, नाही तर तो पण खाली जाऊन पडला असता.

याचा अर्थ साधा एक दीड फुटाच्या स्टुलावरती उभा राहून देखील, तोल जाऊन माणूस खाली पडू शकत होता. कसले हे भयानक आर्किटेक्चर. एखादी स्त्रीदेखील कपडे वाळत घालायच्या वेळेला स्टुलावरवरती उभा राहून खाली पडू शकत होती.


14 वर्षाच्या मुलाचा हकनाक जीव गेला. स्टंटबाजी करणारे व्हिडिओ गेम्स, किंवा स्टंट करणारे लोक, ऑनलाइन कंपन्यांनी बोकाळलेले जाहिरात तंत्र मुलांच्या मनावर किती खोल परिणाम करतात. राहुलचा तर जीव गेला, त्याची आई दुःखामुळे जवळ जवळ मरणप्राय झाली आहे, वडिलांना आणि बहिणींना कळत नाही की काय करावे, दुपारपर्यंत जिवंत असलेला राहुल, संध्याकाळी अस्थीच्या रुपाने घरी आला.


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy