STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance Fantasy

3  

Sanjay Ronghe

Romance Fantasy

आजार - राणी भाग पाच

आजार - राणी भाग पाच

4 mins
180

  दिवसामागून दिवस जात होते. आता नाईक आणि राणी मध्ये संवाद सुरू झाला होता. नाईकांना राणी आणि राणीला नाईक आवडायला लागले होते. नाईक वेळ मिळेल तसे राणीला घेऊन बाहेर कुठेतरी फिरूनही यायचे. दोघनमध्ये प्रेम जिव्हाळा हळू हळू वाढत होता. नाईकांची आवड निवड आता राणीलाही कळायला लागली होती. त्यांना जे जे आवडते ती तसे करायची. तिलाही त्यात आनंद मिळायचा. मुलांसोबत ती नाईकांना ही खुप जपत होती. नाईकही राणीला हवे नको सारे करायचा प्रयत्न करायचे. नाईकांचा संसार आता फुलायला लागला होता. घरात नेहमी आनंद उत्साह असायचा. 


   अचानक एक दिवस नाईकांची तब्येत बिघडली. अंगात थंडी वाजून ताप भरला. तशी राणीला खूप काळजी वाटायला लागली. लागलीच तिने डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि नाईकांना घेऊन ती डॉक्टरांकडे पोचली. डॉक्टरांनी चेक करून काळजी चे कारण नाही , व्हायरल फिवर असल्याचे सांगितले, पण तीन दिवस काढावे लागतील असे सांगितले. काही औषधे त्यांनी लिहून दिले. राणीने परत येता येताच ती औषधे घेतली आणि ते घरी आले. नाईकांना बेड वर झोपवून ती कामाला लागली. नाईकांसाठी तिने सोजी आणि वरणाचे पाणी काढले. आणि ती नाईकांच्या रुम मध्ये गेली. नाईक शांत पणे झोपले होते. ती तिथेच नाईकांकडे पहात बसून राहिली. थोड्या वेळात नाईक जागे झाले. तसे राणीने त्यांना थोडे खाऊन घेण्यासाठी विनवले. नाईकांना खाण्याची इच्छाच होत नव्हती पण राणीच्या आग्रहाखातर त्यांनी थोडी सोजी आणि वरण घेतले. नंतर राणीने त्यांना औषधे दिली. आणि ती नाईकांच्या शेजारी बसून राहिली. नाईकांनी राणी चा हात घेऊन तो आपल्या कपाळावर ठेवला. तसे राणी समजली की नाईकांचे डोके दुखत आहे, तिने ते दाबायला सुरवात केली. आता नाईकांनाही बरे वाटत होते. राणीने नाईकांचे कपाळ, डोके, हात पाय. दाबून दिले, तसे नाईकांना बरे वाटायला लागले. ते सारखे राणीकडे टक लावून बघत होते. राणी मात्र मन लावून नाईकांची सेवा करण्यात मग्न होती. तिच्या चेहऱ्यावर नाईकांची काळजी पूर्ण पणे दिसत होती. नाईकांना तिची ती सेवा घेण्यात खूप समाधान वाटत होते. त्यांनी मग हळूच राणीचा हात आपल्या जवळ घेतला . आणि तिच्या हातरुन ते आपला हात कितीतरी वेळ फिरवत राहिले. राणीलाही त्यात खूप समाधान मिळत होते. आज पहिल्यांदाच दोघे इतक्या जवळ येक दुसऱ्याचे हात हातात घेऊन नजरेत नजर टाकून बघत होते. दोघनच्याही चेहऱ्यावरून प्रेम भाव व्यक्त होत होता. 


    आता सायंकाळ होत आली होती. तशी राणी आपल्या कामात लागली. मुलंही खेळण्यात मग्न झाली होती. राणीने आपला स्वयंपाक आटोपला. आणि परत ती नाईकांच्या जवळ जाऊन बसून राहिली. सायंकाळचे आठ वाजायला आले तसे राणीने मुलांना जेवायला वाढून दिले आणि नाईकांसाठी गरम गरम खिचडी घेऊन गेली. नाईकांना आता बराच आराम वाटत होता. राणीनेच नाईकांना चमच्या चमच्याने नाईकांना खिचडी भरवली. त्यांना पाणी देऊन ती मुलांकडे आली. मुलांचे जेवण आटोपले होते. तिने मग स्वतःसाठी वाढून घेतले आणि जेवण करून सगळी ठेव रेव करून मुलांचे बिछाने व्यवस्थित केले. मुलं ही आता झोपायच्या तयारीला लागले होते. थोडा वेळ ती मुलांच्या रुम मधेच बसून मुलांना थोपटत राहिली. मुलं आता झोपी गेले होती. तशी ती परत नाईकांच्या रुम मध्ये आली. नाईक तिला बघून हळूच हसले. तिने नाईकांचे औषध काढून नाईकांना त्यांच्या हातात दिले आणि त्यांच्या साठी पाणी घेऊन आली. नाईकांनी औषध घेतले. आता त्यांना खूप बरे वाटत होते. तापही उतरला होता. त्यांना चांगले पाहुन राणीलाही बरे वाटत होते.


नाईकांनीच तिला आपल्या बाजूला कॉटवर बसवून घेतले. राणी नाईकांकडे बघत बसून राहिली. मग नाईकांनीच तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावरून आपला हात फिरवत राहिले. त्यातच राणीचा साडीचा पदर थोडा खाली गेला. ते राणीच्या लक्षात आले नाही. नाईकांच्या मात्र ते लक्षात आले. राणी आता खूप सुंदर दिसत होती. तिच्या शरीराची ठेवणही तिच्या रुपाला अजून खुलवत होती. नाईक आज पहिल्यांदाच राणीला इतकं जवळ घेऊन तिचे रूप न्याहाळत होते. राणी खूपच आकर्षक आणि सुंदर दिसत होती. तिच्या साडीचा रंग तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होता. नाईकांनी राणीला आपल्या अजून जवळ घेतले. आणि त्यांचा स्वतः वरचा ताबाच सुटला. नाईकांनी हळूच तिला आपल्या मिठीत घेतले. त्यांचे ओठ राणीच्या ओठावर टेकले. तशी त्यांची मिठी अजूनच घट्ट झाली. राणी नाईकांच्या प्रत्येक कृत्याला नकार देऊच शकली नाही. दोघांमध्ये आज प्रथमच स्पर्शाची देवाण घेवाण होत होती. नाईक आणि राणी सर्वस्वाने एक झाले होते. नाईकांच्या मिठीत ती केव्हा झोपी गेली ते तिलाही कळले नाही.


सकाळ झाली होती. पक्षांची किलबिल सुरू होती. तशातच राणीला जाग आली. ती अजूनही नाईकांच्या मिठीतच होती. आणि त्याच स्थितीत दोघेही झोपी गेले होते. ती मिठी अजूनही सैल झाली नव्हती. राणीने हळूच नाईकांच्या मिठीतुन स्वतःला सोडवून घेतले. नाईकांना ती बराच वेळ त्याच अवस्थेत निरखत राहिली. तिने हळूच त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. मग हलकेच तिने नाईकांच्या अंगावर पांघरूण घातले. पांघरून व्यवस्थित करून मग उठून तिने आपली साडी व्यवस्थित करून घेतली आणि आंघोळीला गेली. आज प्रथमच नाईकांनी राणीला सर्वस्वाने स्वीकार केले होते. राणीही पूर्णपणे नाईकांची झाली होती. दोघांच्या मधे असलेला पडदा पूर्णपणे दूर झाला होता. ती खुशी तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. तिचा उत्साह द्विगुणित झाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance