anjali Bhalshankar

Classics Inspirational Children

3.3  

anjali Bhalshankar

Classics Inspirational Children

आईचे बालपण!

आईचे बालपण!

3 mins
167


8 मे जागतिक मातृत्व दिन.आईचा दिवस!आईसाठी जगाने ठरवून दिलेला एक दिवस.खरेतर आई स्वतःच एक जग असत.अस जग जे केवळ प्रेमाण भरलेल भारलेल परिपूर्ण मुक्त पणे मायेचा शिडकावा करणार एक अस पांघरूण असत जे आपल आयुष्य व्यापून टाकत अशी कुस असते जिथुन आपल्याला कुणिही दुर करू शकत नाही.सार्या जगाने झिडकारल अहवेलना केली वेदना दिल्या एकाकी केल तरीही आई मात्र अशी व्यक्ती आहे जिच्या सहवासात सावलीत असल्यास कोणाचिच गरज ऊरत नाही.या दुनियेत येण्याअगोदर नऊ महीने जास्त आपण तिच्या सहवासात असतोच पुढेही जन्म देताना सोसलेल्या असहय वेदना सोसून प्रत्येक आई सुद्धा एक नवा जन्म घेत असते मुलाला जन्म दिल्याची भावनाच तिला इतकी सुखावुन जाते की स्वताला झालेला त्रास यातना ती बाळाला पाहता क्षणी विसरून जाऊन त्या इवल्याशा जीवाची भुक शमवतानाच नव्या जबाबदारीला सिद्ध होते.पुढे संगोपन करताना ते रात्रभर जागरण दुखण खुपण स्वच्छता अंघोळ कपडे आजार खाणं इत्यादी गोष्टी ओघाण आल्याच प्रत्येक जन्मदात्या स्त्रीला या सार्या गोष्टी चुकलया नाहीत चूकणारही नाहीत जग कीतीही फॉरवर्ड झाले नि नव्या काळानुसार कीतीही सोईसुविधा आल्या तरीही आईच्या लेकराविषयीच्या भावना मात्र निरतंरच रहाणार हे निर्विवाद शाश्वत आहे. जन्म दिल्यापासून अगदी मोठे होऊन पूढे लग्न व मुलाबाळं झाल तरीही आईसाठी तिच मुल लहानच आणि प्रेमही तितकच निस्वार्थी निर्मळ निरतंरच असत यात शंका नाहीच.परंतु आईच्या या त्याग ऊपकार व प्रेमाला सध्याच्या अलीकडच्या काळात किती मुल न्याय देतात?आपल्या आईचा योग्य सन्मान करतात तिच्या इतकेच शक्य नाही तरीही काही प्रमाणात का होइना प्रेम,माया जिव्हाळा व्यक्त करतात.तिला धन दौलत तुमचा पैसा नाही तर वेळ हवाय अगदी थोडा वेळ तिला तुम्हाला डोळे भरून पहायचय, डोक्यावरून मायेने हात फीरवायचाय,गोंजारून,माथ्यावरून बोटे मोडून इडा पीडा घालवायचीय तुमची.लहान पणी अगदी छोट्याश्या गोष्टी साठी तुम्ही आंकडताडव केलेली असते प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही आईकडेच धाव घेतलेली असते खेळताना झालेली छोटीशी भांडण ज्यात तुमची चूक असेल तरीही तुम्हाला आईने तुमची बाजु घेऊनच बोलने अपेक्षित असते आणि खरोखर आई तसेच करणार हेही माहीती असतं कारण ती आई असते. तिला आपल मुल चुकीचे नाही वागणार हे जगाला ठणकाऊन सांगायचे असतं पुढे शाळा काॅलेजात जाताना बाबा पर्यंत आपल्या गाडी मोबाइल, पोकेटमनी दूरच्या सहलीला वा इतर अनेक गोष्टी बाबा पर्यंत पोहोचविणारीही आईच असते ना!मोठे झालयावर कमवायला लागलयावर कीती मुल विचारतात आई तुला काय हवय ग!हा प्रश्न विचारावासा वाटतो जेव्हा एकाच घरात राहुन कुठलयातरी अंधारया खोलीत आई पडून असते पंरतु मुलांना तीला भेटायला वेळ नसतो आयुष्यात आपण कीतीदा चुकतोय, अशा गोष्टीही घडतात लोक,समाज, नातेवाईकापासून कायमचे दुरावतात परंतु आई कधीही कीतीही,कशाही प्रकारे वागलात तरीही थोडया वेळापूरती रागवेल तुम्हाला चार गोष्टी सुणावून परखड कानऊघडणी करेल पण काही क्षणात पोटाशी धरेल.बोटावर मोजण्याइतकी मुल असतील जगात किंवा मुलीही जे लग्न झाले संसाराला लागले तरीही आईला अंतर देत नाहीत कींवा बायकोला काही बोलली तरी जाब विचारत नाहीत.आईला शब्दात देवत्व देण तिचे गुणगाण करण तिच्यासाठी वाटेल ते करण या गोष्टी बोलण्यात ठीक वाटतात पंरतु वृद्धाश्रमात फेरफटका मारताना तिथल्या थरथरते हाथ किलकिले डोळे सुरकूतलेलया चेहर्यांवरचे निस्तेज खोल गेलेले डो॓ळे आणि शून्यात पाहून सारया भूतकाळात हरवलेल्या एकाद्या वृद्ध आईला पाहील की काळजात चर्र होऊन जातं तुमच लहानपण आठवत नसेल ना ती?अस लहानपण ज्यावेळेस तुम्ही काहीही करण्यास असमर्थ होतात ना जेवन ना ऊठू शकत ना शी शु साफ करू शकत नाहीत कपडे बदलु शकत ना एकटयाने चालू शकत ना आजारात औषध घेऊन शकत ना रात्रभर नीट झोपू शकत तेव्हा सार घर झोपेत असेल परतु ती जागी असेल तुमची झोप पुर्ण व्हावी म्हणून.हेच आठवत असेल ना ती!आणि भूतकाळातून आजच्या वर्तमानात आलयावर स्वतःवरच हसत असेल कारण आज तीची अवस्था तीच असेल जी लहानपणी तुमची होती पंरतु तुमचे लहानपण तिच्यासाठी सोहळा होता तुम्हाला जन्म देऊन मोठे होताना पहतानाचा प्रत्येक क्षण तीला डोळयात साठवायचा होता तिच्या वृद्धावस्थेत तीच्या दुसर्या बालपणात तुमच्याच बालपणीच्या खोलवर दडलेलथा आठवणीत रमुन शेवटही गोड करायचा असतो ना तिला !पहा विचार करून ज्यांनी तिला वृद्धाश्रमात सोडल एकट सोडल अपमान केला तिच्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठीच हा दिवस सूरू केला असावा कदाचित या एका दिवशी तरी असंख्य फालतु डे साजरा करणाऱ्यांनी आईचा दिवस आईसाठी चा दिवस म्हणुन केवळ तिच्यासाठी द्यावा पहा विचार करून..


Rate this content
Log in

More marathi story from anjali Bhalshankar

Similar marathi story from Classics