आई...🙏
आई...🙏
कालपासून नवरात्री पण चालू झाली.
आता जे लोक कधी कधी चांगल्या नजरेने पोरीकडे बघत पण नसतात तेच देवीची प्रतिष्ठापना मस्त DJ वगरे लावुन करतील.
आता खरी देवी कोण.??
हिला ना ना नऊ हात आहेत ना कुठले शस्त्र हातात आहे पण ही सगळी कामं अस करते की जणू दहा जणांचा बळ हिच्या मधेच आहे..
घरातील कुठलाही अडचणी, समस्या, भांडण
ही अगदी एका क्षणात दुर करणारी मग त्यासाठी तीला स्वतःला किती त्रास झाला तरीपण कधीच ना झुकणारी, कुठल्याही प्रॉब्लेम ला खडसावून सांगणारी की आधी मी मग माझे कुटुंब 😊
पण पण पण........
एवढ सगळे करून मिळत काय तिला.???
ना कुठला आदर, ना प्रेम, ना जिव्हाळा..
तिने फक्त करत रहायचे का तर ते तीच कर्तव्य
हे बोलणारे लोक पण आहेत समाजात आपल्याच...
स्वतःच्या पोटाला चिमटा काढुन बाकीच्या पोटाची खळगी भरवणारी ही अजून पण उपाशी चा आहे रे...
एवढ सगळ शोषून जी आपल्या जागी ठाम उभी आहे, सतत फक्त प्रेम च करणारी
ही ना कुठली देवी आहे, ना कुठले तीर्थक्षेत्र,
ही आहे
" आई"🙏👏🙌
हो आई....
ती ना माझी आहे ना तुझी आहे, ना याची ना त्याची... आई ही आई चा असते 💓❤️
म्हणुन माझ्याकडून त्या आईला खरच मनापासून
नमस्कार 🙏
तुझ्यासारख पवित्र ना कोणी होत ना कोणी होईल तू फक्त तूच आहेस..
तुझ्या कडूनच घडलेला तुझाच एक लेक
- रत्नदीप रंगनाथ कागदे 🙃