प्लास्टिक - एक प्रेमकथा
प्लास्टिक - एक प्रेमकथा


Break-up, प्रेमभंग अश्या कितीतरी गोष्टीवर कवी, शायर, लेखक यासारख्या लोकाच पोट भरतं..
माझाही तसचं कायतरी झालं आहे असा समजा पण मला ना प्रेमभंगावर सगळ्यात जास्त आवडलेली कविता
आपलं जे प्रेमाचं दुःख आहे ना ते असं एकदम न काढता हळु हळु काढायचं जसं आपण जखमेवरची पट्टी काढतो ना अगदी तसच, तो होणारा त्रास सहन करत करत जगायचं..
ती मला सोडून गेली खरं पण आजही ती मला जाणवते, माझ्या जवळ असल्याच भास होतात..
का जाणे माहीत नाही पण आजही तिचा तो स्पर्श, ती दिसली की माझं खुश होण, हातात तिला घेतलं की हळूच होणारं स्मित हास्य
अजूनही नाही विसरलेलो मी...
खूप आठवण येतेय आज तिची, ती लांब असली तरी तो तिचा सुळसुळ येणारा आवाज आजही खूप miss करतोय मी तिला...
खर तर आमचं तस officially Break-up झालाय कधीच पण तिच्यावरच ते प्रेम आयुष्यभर विसरणार नाही मी...
परवाच तीच दर्शन झाल, बघून तिला मन एकदम भरून आल, डोळ्यात सुखाच अश्रू होते...
अणि दिसली ते पण कोणा तरी दुसर्या सोबत, मला बघून लपत चाललेली.
आता एवढ सगळा वाचून झाल्यावर तुमाला वाटत असल की पोरगा गेला की वाया राव...
पण मी हे कुठल्या मुली बदल नाहिये लिहत
मी हे सगळा लिहिलेय ते आत्ताच काही दिवसा आधी आपल्यातून नाहीशी झालेली
"Plastic Carrybag"
ती बंद होऊन खूप दिवस झाले पण अजुनहि ती लपून छापुन याला त्याला सारखं भेटत असती
मग खरच आपला तिच्याशी Break-up झालाय का.
मला माहितेय हे दुःख विसरणे अवघड आहे पण खरच आपल्या सगळ्यांच्या भविष्यासाठी हे खूप गरजेच आहे.... म्हणुन तिला लपून, चोरून भेटणा बंद करा आणि असा बोला की तुझ्या सारख्या भरपूर येतील न जातील(जस आपण पोरं, पोरी ना बोलतो)