चूक कोणाची ??
चूक कोणाची ??
काल असंच सुट्टी असल्यामुळे बाहेर पडलेलो असताना अचानक कोणाचा तरी आवाज कानावर पडला. थोडा ओळखीचा वाटला म्हणून मग मागे वळून बघितलं तर काय ती माझ्या समोर. २ मिनिटं मला सुचेना की आज इतक्या दिवसांनी का बरं ? अन् ते पण दुसरा कोणी सापडलं नाही मीच का ?
पण म्हटलं चल बोलू तरी ना. काय म्हणते ते म्हणून मग विचारलं की कशी आहेस ?
हे ऐकून तिला असं पटापट काहीतरी सांगून टाकावं असं वाटलं पण ती मनातच बोलली असावी, कारण तिच्या डोळ्यातलं पाणी सोडलं तर न रडण्याचा आवाज सोडून दुसरं काही दिसले नाहीच. मग माझा मन म्हणालं हिला शांत करायला पाहिजे म्हणून थोडं जवळ गेलो, काय झाले नीट सांग आपण बघू काय जमलं तर करू.
तिने मला फक्तं एकच प्रश्न विचारला. "माझं काही चुकले का ?"
आता हे ऐकून तुमचं जे झालं अगदी तसचं माझं झालेलं की ही मला का विचारत आहे
म्हणून तिला नीट विचारलं अरे थोडं समजून सांग काय झालं ?
ती डोळ्यातलं आसवं पुसून बोलली - " हे सगळं तुम्ही लोकं करता. आंदोलने, रस्ताबंदी, जाळपोळ, म
ोर्चे... जात, पंत, प्रांत, देश... गरीब, श्रीमंत, उच्च, नीच... मराठी, अमराठी, भैया, बिहारी... हिंदू, मुस्लिम, सिख, इसाई... यांचं आरक्षण, त्यांचा हक्क, आमचे कायदे, तुमचे कायदे... लाठी चार्ज, दगडफेक, गोळीबार... पोलिस, मिल्ट्री, आंदोलक... आत्महत्या, बलात्कार, रेप, छेडचाड... मंदिर, मस्जिद, चर्च.... काळा, गोरा, शहरी, गावठी... आस्तिक, नास्तिक, देव-धर्म... मुलगा, मुलगी, अभिमान, स्वाभिमान... बंद, बहिष्कार, एकी, भाववाढ...
राजकारण..."
मग या सगळ्यामध्ये माझं काय चुकलं ?
खरं सांगायचं झालं तर खरंच मी काही क्षण हैराण झालेलो की खरंच हीचं काय चुकतंय ? हे सगळं तर आपण आपल्या स्वार्थासाठीच तर करतो ना आणि हा ती कोण होती माहीत आहे ?
एका रस्त्याच्या कडेला पडलेली, अर्धी जळलेली, काचा फुटलेली आपली बस, एसटी...
तिने मला एकच छोटासा प्रश्न विचारला पण अगदी अर्थपूर्ण होता तो... मला तरी त्याचं उत्तर अजून मिळालं नाहीये...
काही उत्तरं तुमच्याकडे असतील तर सांगता का ? माझं काय चुकलं ?