विषय.. *खरेदी* शीर्षक:- *बाजार*
विषय.. *खरेदी* शीर्षक:- *बाजार*
देह विक्रीचा ....
येथेच भरतो,
बाजार सजतो,
तो खरेदीचा //१//
कातर वेळी...
दिवस संपता,
विक्रय मांडता,
रंगते खेळी //२//
काय सांगावे ...
कसा खरिदार,
कोण ठेकेदार,
कसे वर्णावी //३//
गिऱ्हाईकांच्या ...
विकृत नजरा,
हातात गजरा,
सजतो त्यांच्या //४//
दारुड्या कुणी ....
शोधत फिरतो,
मस्तीत धुंदतो,
काढत उणी //५//
या खरेदीचा ...
अंदाज वेगळा,
आनंद आगळा,
मिळे तृप्तीचा //६//
बोली लागते ...
येथे यौवनाची,
खरेदी तनाची,
येथे चालते //७//
नारी गुलाम ....
जणू बाजारात,
या व्यवहारात,
होते नीलाम //८//
खरिददार...
खरेदी करतो,
भडास काढतो,
होतो उदार //९//
संवेदनांचा....
फडशा पडतो,
बाजार संपतो,
वारांगनांचा //१०//
