शीर्षक... प्रदूषण मधुसिंधू काव्य रचना
शीर्षक... प्रदूषण मधुसिंधू काव्य रचना
1 min
172
जे आवरण...
धरेच्या पृष्ठाचे
नाव आहे त्याचे
पर्यावरण //१//
जतन करू ...
पर्यावरणाचे,
ते संरक्षिण्याचे,
उपाय स्मरू //२//
सर्वात आधी ...
टाळू प्रदूषण,
साधू क्षणोक्षण,
किमया साधी //३//
सुका नी ओला ...
वेगळा करूया,
खत बनवूया,
पुरू पाचोळा //४//
चला टाळूया ...
प्लॅस्टिक वापर,
करून जागर,
क्रांती करूया //५//
रसायनांचा ...
वापर थांबवू,
प्रयोग वाढवू,
त्या सेन्द्रीयांचा //६//
घातक फार ...
जैविक कचरा,
नियमे निचरा,
करू निर्धार //७//
जलाशयाचे
टाळू प्रदूषण,
करूया रक्षण,
जीवा - जीवाचे //८//
वर्ज्य करारे
दूषित घातक,
असती मारक,
घटक सारे //९//
वन क्षेत्राचा ...
विकास करूया,
सर्वच घेऊया,
ध्यास तयाचा //१०//
