विरह
विरह
1 min
6.9K
एकमेकांची ओढ आपण असे रे
तरी असे का वियोग सदा ,
विरहात प्रेम वाढते सख्या रे
मनाला हे समजावे कितीदा |
प्रेमात तुझ्या मी अखंड बुडाले,
कशाचेच आता भान नसे रे ,
श्वासात श्वास गुंतला प्रिया
मला न येई सोडवता रे |
प्रयत्न करते मिळवाय सहवास
व्यर्थ ठरते सर्व रे ,
कमी कर आता या अंतराला
हवे फक्त आता प्रेम रे |