STORYMIRROR

Shivam Panchbhai

Romance

2  

Shivam Panchbhai

Romance

वीज उरते तशी..

वीज उरते तशी..

1 min
54

तू सोबत असल्याचं 

एक एक दृश्य 

पावसातल्या विजेसारखं वाटतं

हातात न येणारं

आसमंत व्यापून टाकणारं

तरीही भास असणारं


आधी वीज चमकेल

मग पाऊस पडेल

गार वारा गाडलेलं सगळं ताजं करेल

मग निघून जाईल

ताजेपणा..पाऊस...वारा सुद्धा


आणि गडगडत उरतो

मी माझ्या आत

जसे ढग गडगडतात

पाऊस संपल्यावर सुद्धा!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance