STORYMIRROR

Shivam Panchbhai

Others

3  

Shivam Panchbhai

Others

पाऊस

पाऊस

1 min
186

आज बरस इतुका 

कर नभास पोरका

तुझ्या सरीत पावसा 

जरा होतो मी ही बोलका


आज मिटू दे व्रण

सार्या जन्माचे उठले

आज वाहू दे जीव

पाय मुठीत बोलले


नाळ तुटली कधीची 

जखम सुकत नाही

गोष्ट छोटी अंगणाएवढी

का रे सडा टाकत नाही


तुझ्या सरीत पावसा

पाखरे ही बोलती

झुंबडात राहतो 

तरी जात तुझीच पोरकी


Rate this content
Log in