STORYMIRROR

Shivam Panchbhai

Others

4  

Shivam Panchbhai

Others

चाळलेलं आयुष्य

चाळलेलं आयुष्य

1 min
386

वय वाढतं तसं

जगणं चाळणी सारखं होत जातं

जाडं भरडं चाळत चाळत

फक्त फायद्याचं हाती उरतं


चाळलेले वर्ष

चाळलेले लोकं

सगळं बारीक बारीक चिद्र्यातून खाली पडत जातं

स्वच्छ होता होता आपलं स्वत्व सुध्दा चाळलं जातं


एखाद दुसरा खडा असू द्यावा आयुष्यात

असं चुकून सुद्धा आपल्याला वाटत नाही

जरा मळलेलं असावं माणसाने

स्वर्ग काय स्वछता बघून मिळत नाही!!



Rate this content
Log in