वाट तुझी पहाताना !
वाट तुझी पहाताना !


मनातले अंतर ,
मैलात मोजता येत नाही,
दूर कितीही गेलीस तरी ,
जवळीक संपत नाही .
वाटते जवळच कोठे तरी आहेस ,
कालच तर रुसून गेली होतीस ,
तरी आज पुन्हा भेटणार आहेस ,
नजरेत आहेस ,
पण नजरे समोर हवीस .
अजून ही वाटते आस,
अशीच तू येशील खास,
अलगत खांद्यावर ठेवून हात,
हळूच विचारशील ,
"कसा आहेस?"