उणीव
उणीव
असे वाटत होते जाऊच नये तिने कधी
पण विधात्यालाही ही असावी गरज तिची
रिक्त झालेले स्थान भरणारच नाही कधी
पण पदोपदी जाणवत राहील सतत उणीव तिची
मायेची हाक आता कानावर येणार नाही कधी
पण चव तिच्या हाताची जिभेवर रेंगाळत राहील कायमची
डोक्यावरून हात तिचा फिरणार नाही कधी
पण मनात आहे भरलेली ऊब तिच्या मायेची
ठाऊक आम्हाला आमची "आई" भेटणारच नाही कधी
पण हृदयात तेवत राहील ज्योत सदैव तिच्या आठवणींची
आवाज आता तिला देता येणारच नाही कधी
पण ठेच लागता जीवाशी कळ उमटसे आईच्या नावाची
