STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

तू अन मी

तू अन मी

1 min
300

तू चंद्र आकाशातला......

मी चांदणी साथ देणारी 


तू पान गुलमोहराचं......

मी झुळूक त्याला हलवणारी 


तू लकेर नशीबाची......

मी विश्वास मनातला 


तू चाल डगमगणारी......

मी हात थांबणारा


तू चेहरा निरागस......

मी हास्य त्या वरील


तू डोळे मृगनयनीचे......

मी स्वप्न त्यातील 


तू नदी खळखळणारी......

मी थंड वारा 


तू आस धगधगणारी......

मी श्रावणातल्या धारा 


तू शेवटचा श्वास......

मी जगण्याची आस


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance