STORYMIRROR

Vidya Bhadake

Abstract

3  

Vidya Bhadake

Abstract

तुळशी विवाह

तुळशी विवाह

1 min
470

तुळस माझ्या अंगणी,

शोभून दिसते खरी,

हिरव्यागार मंजुळा,

श्रीकृष्णाला आवडे भारी. (1)


 सांजसकाळी लावी दिवा,

करी प्रार्थना प्रत्येक नारी,

घालून पाणी तुळशीला,

दिवसाची सुरुवात करी नारी (2)


आरोग्यदायी तुझी पान खोड,

ऑक्सीजन ठेवी अंगणात,

सर्दी खोकल्यावर पानांचा काढा,

तुझे अस्तित्व प्रत्येक दारात. (3)


पांडुरंगाला , कृष्णाला प्रिय,

जगी तू सर्वात श्रेष्ठ असती,

तुलसी विवाहास प्रथम मान,

तूच सर्वांसाठी पवित्र असती. (4)


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract