आई
आई
1 min
207
आईविना मी म्हणजे,
आत्माशिवाय शरीर,
मंदिराविना देव,
माणसाशिवाय घर..(1)
माझ्या अंधारमयी जीवनात,
प्रकाश आणला तू,
निराश माझ्या मनात,
आशा जागविली तू.....(2)
दिलेत असे संस्कार तू,
जन्मभराची ठेव मजला,
करीन नाव तुझे अमर,
साथ देईल मी तुजला (3)
मागेन एकच वरदान देवाला,
साथ मिळू दे तुझी सात जन्माला,
कसे फेडू उपकार तुझे मी,
अंतच नाही तुझ्या प्रेमा ला....(4)
अस्थिर माझ्या जीवनाला,
तुझ्याविना जगणेच असह्य मला,
कसे फेडू ऋण तुझे मी,
अंतच नाही तुझ्या प्रेमाला......(5)
