तुला काय वाटतं?
तुला काय वाटतं?
मी तुला भेटले नाही
मला तू भेटला नाही
आपण कुजबुजतो अंतर मनात....
कदाचीत गाठी जुळल्या असतील नभात...
भविष्याची शाश्वती नाही
वेळ गेल्याचा खेद नाही...
सहवास असेल तर शिखराएवढा उत्तुंग
जेव्हा गहिवरला असेल समुद्रा एवढा अथांग....

