तुझ्याबद्दल...
तुझ्याबद्दल...
तुझ्याबद्दल काय लिहू...?
लिहायचं ठरवलं की
कागद अपूर्ण वाटतो...
अस फक्त वाटतंं तुझ्या
सवयींना कागदाला समजावून सांगावं
त्या काळ्याभोर डोळ्यात सामावून जाव
पाण्याला ना मिटवता येणार प्रतिबिंब बनाव
त्या घट्ट मिठीत हवेसारखं विरून जावं
स्वप्नात तुला वेचून कायमचं माझं करावं

