तुझ्या सोबत चालते
तुझ्या सोबत चालते
तुझ्या सोबत चालते
तुझ्या सोबत चालते सुखाची ही वाट
प्रेमभावे बांधली ह्दयात ही गाठ
सजवुन भारी केला मी श्रृंगार
रांगोळीने सजवून टाकीला मी पाट
तुच मला सखा मिळो केला मी धावा
किती केले उपवास किती वाचले मी पाठ
मन फिरे वणवण लागे तुझी त्याला ओढ
विश्वासाने हातात हात मिरवीते मी थाट
पुन्हा नको हा विरह आणि तो दुरावा
शेवटी केला या दुखाचा मी नायनाट
दुर्गा देशमुख

