तुझ्या प्रेमात झालो...
तुझ्या प्रेमात झालो...
तूझ्या प्रेमात झालो वेडा अन मी दिवाना
कधी झालो शायर कधी झालो शहाणा ...
तुला मी पाहिले नजरेच्या एका टप्यात
तुझी मुर्ती बसली माझ्या डाव्या कप्यात ..,
तुझ्याच मुर्तीची भक्ती मी रोज करतांना
कधी झालो शायर कधी झालो हाणा...
मग ठरवुन दिवस प्रेमाची मागनी केली
तु हि हसुन मज गालात संमती दिली
अन गुलाबाची भेट रोज तुला देतांना
कधी झालो शायर कधी झालो शहाणा ...
नजरा नजरेत गेले महिने सहा त्यात
लग्न पत्रीका तिची पडली माझ्या हातात
पाहिले स्वप्न मी माझे धुळीस मिळतांना
कधी झालो शायर कधी झालो शहाणा .
तूझ्या प्रेमात झालो वेडा अन मी दिवाना
कधी झालो शायर कधी झालो शहाणा ...

