तुझा शोध...
तुझा शोध...
शोधू मी तुला कुठे कुठे
आभास हा तुझा जिथे तिथे
शोधतो मी तुला उमलत्या फुलांत
खुलते जशी तू माझ्या मनात
शोधतो मी तुला खळाळत्या झऱ्यात
सापडते तुझे अवखळ हास्य तयात
शोधतो मी तुला मोत्यांच्या माळेत
आरास मोत्यांची सापडते तुझ्याच दंतमाळेत
शोधतो मी तुला अथांग सागरात
पण तोच अवतरलाय तुझ्या टपोऱ्या डोळ्यात
शोधतो मी तुला इंद्रधनूच्या रंगात
पण तोच पसरलाय तुझ्या कोमल कायात
शोधतो मी तुला कोवळ्या सूर्यप्रकाशात
तो तर पसरलाय तुझ्या सोनेरी केसात
शोधतो मी तुला फुलांच्या सुगंधात
अनुभवच देतेस याचा तुझ्या मोहक सहवासात
तुला शोधतो मी नभात...तुला शोधतो मी चराचरांत
पण भेटते नेहमी मला तू माझ्याच अंतरंगात !!!

