STORYMIRROR

sant dnyaneshwar

Classics

2.3  

sant dnyaneshwar

Classics

तुज सगुण म्हणों कीं

तुज सगुण म्हणों कीं

1 min
20.5K



तुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे ।

सगुण-निर्गुण एकु गोविंदु रे ॥१॥


अनुमाने ना अनुमाने ना ।

श्रुति 'नेति नेति' म्हणती गोविंदु रे ॥२॥


तुज स्थूळ म्हणों कीं सूक्ष्म रे ।

स्थूळसूक्ष्म एकु गोविंदु रे ॥३॥


तुज आकारु म्हणों कीं निराकारू रे ।

आकारुनिराकारु एकु गोविंदु रे ॥४॥


तुज दृश्य म्हणों कीं अदृश्य रे ।

दृश्यअदृश्य एकु गोविंदु रे ॥५॥


तुज व्यक्त म्हणों कीं अव्यक्तु रे ।

व्यक्तअव्यक्त एकु गोविंदु रे ॥६॥


निवृत्ती प्रसादें ज्ञानदेवो बोले ।

बाप रखुमादेविवरू विठ्ठलु रे ॥७॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics