STORYMIRROR

Madhu Patil

Tragedy

4  

Madhu Patil

Tragedy

तो पाऊस

तो पाऊस

1 min
382

तो पाऊस नव्हेत हा

ज्यानं सृष्टी सजविलीय,

या पावसानं नुकसानीचा

उच्चांक मोठ्ठा प्रस्थापिलाय. 


त्या पावसाच्या आगमनाने

प्राणिमात्रांस हर्ष होतसे,

या पावसाच्या आगमनाने मात्र

जीवाचा थरकाप उडतसे .


काही जीव वाहून गेले

तर काही बिचारे बुडून मेले,

प्राणिमात्रांची झाली दैना

तर अनेक जीव उपाशी मेले.


बळिराजाची बुडाली दुनिया 

पिकं सारी पाण्यात गेली,

चारा सारा कुजून गेला

गाई गुरे दावणीलाच मेली.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Madhu Patil

Similar marathi poem from Tragedy