STORYMIRROR

chaitanya sonawane

Inspirational Others

3  

chaitanya sonawane

Inspirational Others

ती

ती

1 min
361

माणसा तुला कस कळत नाही,

अरे तिच्या शिवाय,तुला काही वळत नाही

विचार कर ती नसती तर,

तुझे काय झाले असते,                          

या जगात तुझे पाऊल पडलेच नसते...


माणसा तू ठिणगी असशील तर, आग ती,

तू लाट असशील तर, समुद्र ती,

तू फूल असशील तर,फुलबाग ती,

माणसा तुला कसं कळत नाही

तुझ्या जीवनातील सारं ती......


तुझ्या हाती तलवार देणारी , जिजाऊ ती,

संस्काराचे धडे देणारी शामची आई ती,

बुरुज सर करणारी हीरकणी ती,

माणसा तुला कसं कळत नाही

सप्त सुरातील राग ती.........


हक्क मिळवणारी सावित्री ती,

अनाथांची सिंधू ती,

नभात भरारी घेणारी कल्पना ती

माणसा तुला कसं कळत नाही

तुझ्या भरकटलेल्या आयुष्याची 

सुबोध वाट ती........


भक्तीतील मीरा ती,अग्नीला साक्ष सीता ती

निस्वार्थ प्रेमाची राधा ती,

माणसा तुला कसं कळत नाही

तुझ्या एकाकीपणातील साथ ती,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from chaitanya sonawane

ती

ती

1 min वाचा

ती

ती

1 min वाचा

Similar marathi poem from Inspirational