ती
ती
आसुसलेले रूप तिचे, सोनेरी किरणाहून तेज
नाजूक नाजूक ओठ जसे उमलते पंकज
दूरचा वाहता वारा, डोळ्यांना स्पर्शून जाई
अन नजरेला माझ्या, 'ती' आल्याचा भास होई
खळाळतं मुखात हास्य, तिला पाहून रोज
वाटत होतं मनात, बोलावं तिच्याशी आज
बोलणं दूर साधं नाव विचारणं नाही झालं
मी मात्र तिला, नावच 'ती' ठेवलं
मध्यंतरी मला 'ती', कुठे दिसलीच नाही
तिला एकदा पाहण्याची हुरहूर लागून राही
खूप दिवसांनी तिची भेट, एकत्र गाठून आली
अन हातात माझ्या हळूच, काहीतरी (चिठ्ठी) ठेवून गेली
मनात आनंदी तुषार, इतके (म्हणून) उधळले होते
ती निघून गेली याचेही भान राहिले नव्हते
वाचायची आतुर इच्छा अन उत्कंठा वाढत होती
चोरीच्या ऐवजवाणी चिट्ठी उघडून धरली हाती
वाचता वाचता मन बेचिराख झालं होतं
कारण प्रेमपत्राऐवजी ते लग्नाचं आमंत्रण होतं

