स्वप्नाचे विश्व
स्वप्नाचे विश्व
रात्रीच्या काळोखात
चांदण्यांच्या मैफलित
स्वप्नांची पालखी येते
पापण्यांच्या कुशीत
सारे कसे शांत
निजलेला आसमंत
कुजबूज मात्र होई
हृदयाच्या स्पंदनात
स्वप्नी भेटते ती ही
जी दिसा भिते जगाला
चूंबून ओठ माझे
देते आव्हान प्रणयाला
इथेच भेटतो मजला
तो सागरी किनारा
प्रियसीच्या भेटीसाठी
प्रियकर आसूसलेला

